Skip to main content

राजयोग - १५

लेखक रातराणी यांनी रविवार, 08/07/2018 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
रघुपतीने विचारलं, "काय चालू आहे हे?" नक्षत्रराय डोकं खाजवत म्हणाला, "नाच चालू होता." रघुपती तिरस्कारानं म्हणाला, "छि छि." नक्षत्रराय अपराध्यासारखा उभा राहिला. रघुपती म्हणाला, "उद्या इथून जायचंय. तयारीला लाग." नक्षत्रराय म्हणाला, "कुठे जायचंय?" रघुपती - "ते सगळं नंतर सांगेन. आता फक्त इथून जायचंय." नक्षत्रराय - "मी इथेच ठीक आहे." रघुपती - "ठीक आहे!? राजकुळात जन्म झालाय ना तुझा? तुझ्या सगळ्या पूर्वजांनी राज्य केलं आणि एक तू आहेस इथं या जंगलात कोल्ह्यांचा राजा झालायस! आणि म्हणे ठीक आहे!" रघुपतीच्या कठोर शब्दांनी आणि लालबुंद डोळ्यांनी सिद्ध केलं की नक्षत्रराय ठीक नाहीये.

Make At Home: एक नवीन आणि उपयुक्त मोबाईल ऍप

लेखक आपला निखिल यांनी रविवार, 08/07/2018 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी बऱ्याच जणां कड़े विशेष कलगुण, छंद असतात परंतु काही मोजके जण त्यांचे कलगुण, छंद चांगल्या पद्धतीने जोपासतात तर काही जण त्या मधुन उत्पन्नाचे साधन निर्माण करतात. असे हौशी लोक प्रामुख्याने आपल्या घरा मधुन छोटे धंदे चालू करतात. आवड़ आणि कौशल्या आसल्या मुळे चांगल्या प्रतिच्या वस्तु हे लोक घरात तयार करुन विकतात. ह्या मध्ये उत्तम घरगुती खाद्यपदार्थां पासुन कपड़े, घर सजावटी च्या वस्तु, आरोग्य व सौन्दर्य प्रसधाने, घरगुती शिकवणया अशा नानाविध प्रकारच्या गोष्टी विकल्या जातात. परंतु आजच्या स्पर्धेच्या युगात हे घरा मधुन चालणारे छोटे उद्योग अभावनेच टिकतात.

तो आणि ती.... देवकी!

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 08/07/2018 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
तो आणि ती............. देवकी! "यादवा, आज आयुष्याच्या उत्तरार्धात मागे वळून बघते तेव्हा वाटत अनेकविध घटनांनी भरलेलं आयुष्य जगले मी. वडिलांची आणि मोठ्या भावाची लाडकी होते मी. कितीतरी कौतुकाने कंसदादाने माझं लग्न तुझ्या वडिलांशी लावून दिलं होत. त्यादिवशी आम्ही सगळेच कितीतरी आनंदात होतो. मात्र त्याचवेळी ती आकाशवाणी झाली आणि माझ्या आयुष्याचे फासेच फिरले. कारावासात असताना अनेकदा मनात येऊन गेलं; जर ती आकाशवाणी झालीच नसती तर; कदाचित् आयुष्य वेगळं असत. कंसदादाच्या वधानंतर तू स्वतःचा राज्यभिषेक न करता हट्टाने तुझ्या वडिलांना सिंहासनावर बसवलंस; त्यावेळी मला तुझी माता असण्याचा अभिमान वाटला.

तो आणि ती..... प्रस्तावना भाग १

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 07/07/2018 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
तो आणि ती............... प्रस्तावना तो जगद्नियंता.......... विश्वनिर्माता......... बंसीधर........ गोपाल.......... यदुकुलनंदन.......... देवकीपुत्र............... कृष्ण..... मधुसूदन............ मोहन............ आणि वासुदेव! असा खूप काही.... आणि तरीही उरणारा! सर्वांमध्ये असूनही नसलेला.......... चमत्कार करूनही मानवी रुपात रमलेला. अशा त्या विश्वरुपी मानवाशी त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीची भावनात्मक गुंतवणूक वेगवेगळ्या स्तरावरची होती.

प्लेग, रँड, चापेकरबंधू आणि टिळक-बदनामीचे नवे षडयंत्र!

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 07/07/2018 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्लेग, रँड, चापेकरबंधू आणि टिळक-बदनामीचे नवे षडयंत्र! गेली काही म्हणजे खरेतर अनेक वर्षे २२ जून १८९७ ही तारीख तशी लोकांच्या विस्मरणात गेलेली होती. क्वचित कधीतरी दूरदर्शन वर लागणाऱ्या ‘२२ जून १८९७” ह्या नावाच्या आणि (त्या घटनेवरच्या/विषयावरच्या) एकमेव मराठी चित्रपटाखेरीज फार काही कुठे दाखवले जात नसे. अगदी ताणून ताणून किंवा बादरायण संबंध जोडून सांगायचे म्हटले तर मध्यंतरी पुणे आकाशवाणीवर “गोंद्या आलारे...!” ही कॅच फ्रेज असलेली एक जाहिरात ऐकवत असत.तिचा संबंध चापेकर बंधूंशी जराही नसला तरी त्या निमित्ताने काही लोकाना आठवण तरी होत असे. त्यापेक्षा अधिक काही नाही.

दुसरी कथा "गुलबानो....."

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 07/07/2018 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire कथा पहिली - "कुलसूम ज़मानी बेगम...."

गुलबानो

....गुलबानो पंधरा वर्षांची झाली. तारुण्याच्या रात्रींनी आता तिला कुशीत घेण्यास सुरुवात केली. आयुष्याच्या स्वप्नांनी मनाला गुदगुल्या होऊ लागल्या. मिर्ज़ा दाराबख्त बहादुर साबिक़ वली बहादुरशाहचा बेटा होता. म्हणजे भूतपूर्व राजकुमारच की.

मेघ बरसला

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 07/07/2018 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
मेघ बरसला विरही अश्रूंचा खारा खारा. मेघ बरसला प्रथम आषाढी प्रिय वार्तेचा. मेघ बरसला माळात रानात काळा काळा. मेघ बरसला भिजली धरणी हिरवी हिरवी.
काव्यरस

मेघ बरसला

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 07/07/2018 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
मेघ बरसला विरही अश्रूंचा खारा खारा. मेघ बरसला प्रथम आषाढी प्रिय वार्तेचा. मेघ बरसला माळात रानात काळा काळा. मेघ बरसला भिजली धरणी हिरवी हिरवी.
काव्यरस

हजारो बेटांचा देश... फिनलँड..भाग ५ (ब) स्टॉकहोम क्रुज ट्रिप

लेखक बरखा यांनी शुक्रवार, 06/07/2018 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/42878 भाग १ https://www.misalpav.com/node/42891 भाग २ https://www.misalpav.com/node/42898 भाग ३ https://www.misalpav.com/node/42906 भाग ४ https://www.misalpav.com/node/42947 भाग ५ (अ) सकाळी उठून नाष्टा करून पुढील ठिकाणे बघण्यास निघालो. आमचा कुठेही उतरा आणि चढा या बसचा पास अजूनही शिल्लक होता.