फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ७
फेस्टिव्हल डायरीज..!!
(Decorate your love..)
कथा - ७
वारी.. प्रेमाचे रिंगण..
ती बावरली होती.. तिच्यासाठी हा अनुभव नवाच होता शहरात.. पण तोच तिला तो दिसला आणि तिला बरे वाटले..
पुढे तो एकटाच चालत होता.. हा आपल्या ऑफिसमधला तर नाही ना.. ती विचार करतच होती की हाक तरी कशी मारायची.. तोच त्याने मागे वळून पाहिले.. तो तोच होता ह्याची तीला खात्री पटली.. तोही तिच्याकडे पाहून हसला.. चला कोणीतरी सोबतीला भेटले नाहीतरी एवढं अंतर चालणे तेही एकट्याने.. तिला जीवावरच आले होते..
मिसळपाव
