Skip to main content

ही हाक कुणाची आहे...!

लेखक फिझा यांनी मंगळवार, 11/09/2018 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
ही हाक कुणाची आहे...! उमटती शब्द कागदावर की तरंग खोल पाण्यावर, अर्थ लावला त्यांना जरी तरी, हा डोह कुणाचा आहे? बरसत्या धारांना पाहून बरंच काही येतं दाटून, थेंबांना समुद्र मिळतो जरी तरी, हा घन कुणाचा आहे? साधेसुधे हे आयुष्यही सोपे नाही जगणेही, स्पंदते हृदय माझेच जरी तरी , हा श्वास कुणाचा आहे? मागे राहिल्या पाऊलवाटा आता प्रवास एकटीचा नाही कोणी सोबती जरी तरी, ही हाक कुणाची आहे? फिकीर नाही मला जगाची विरक्त माझ्या भावना देहाला मोक्ष मिळेल जरी तरी , हा आत्मा कुणाचा आहे? -------फिझा.

पाकोळी

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 10/09/2018 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
निळ्या-जांभळ्या आभाळाखाली, हिरव्यागार कुरणाच्या लुसलुशीत गवतावर निवांतपणे पहुडलेला असताना, पलीकडच्या, ताटव्यातल्या फुलांवरून एक नाजूकशी पाकोळी उडतउडत माझ्याकडे आली आणि मला म्हणाली… "बाबा, तू आज आपिशला ज्यावू नको, आपण गार्डनमध्ये खेळायला ज्यावू"
- संदीप चांदणे (१०/०९/२०१८)

खनिज-खजिन्यातील रंगीत धातू

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 10/09/2018 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
(खजिन्यांचा खजिना : लेखांक ६ ) लेखमालेच्या या भागात आपण लोह, तांबे आणि जस्त या तीन रंगीत धातूंबद्दल जाणून घेऊ. लोह शरीरातील लोह हे मुख्यतः हिमोग्लोबिन या लालपेशीतील प्रथिनात साठवलेले असते. हिमोग्लोबिनवर स्वतंत्र लेख मी यापूर्वीच लिहिलेला आहे. तो इथे आहे : https://www.misalpav.com/node/41474. त्यात लोहाचे स्त्रोत वगैरे माहिती विस्ताराने आहे. त्याव्यतिरीक्त असलेली लोहाची माहिती आता देतो. लालपेशीचे आयुष्य साधारण १२० दिवस असते. शरीरात रोज २०० अब्ज लालपेशी मरतात आणि त्यांची जागा नव्या पेशी घेतात.

शब्दांच्या घनगर्द सावलीत

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 09/09/2018 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
तार्‍यांनी गजबजल्या रात्री चांदणवर्खी प्रकाशलाटा शब्दांच्या घनगर्द सावलीत धूसरल्या अर्थाच्या वाटा त्या लाटांवर हरपे जाणीव त्या वाटांवर अगणित संभव जाणिवेतुनी ठिबके नेणीव संभव सरता उरे असंभव
काव्यरस

नं पाठवलेलं पत्रं

लेखक Pradeep Phule यांनी रविवार, 09/09/2018 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्लीज, इकडे बघ ना..! मला तुझ्या हातांकडून वचन हवय, कि तू हे पत्रं फाडणार नाहीस. या पत्रातुन जणू मीच तुझ्याशी बोलत आहे. प्रत्यक्ष बोलायचं तर खूप आहे, पण त्यासाठी हवा एकांत, आणि तोहि मिळणे कठीण, म्हणून हा सारा खटाटोप. लिहायचं खूप आहे, पण प्रत्यक्ष जेव्हा लिहायला बसतो, आणि मग शब्द ययाती मधल्या अल्के सारखे गट्टी फू करून बसतात. आणि मी सगळं काही विसरून जातो. मी तुला या शुल्लक पानासोबत एक छानस कार्ड ही देऊ शकलो असतो, पण असं केल्यामुळे मी तुला आणखी एकदा विनवणी करत आहे कि काय, असा तुझा गैरसमज झाला असता, आणि तू हे पत्र फाडून टाकल असतं.

पिया तू अब तो आजा.....

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 08/09/2018 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
पिया तू अब तो आजा..... रेडियोवर 'पिया तू अब तो आजा....' ची लकेर उठली की लालभडक फ्रिलच्या ड्रेस मधली हेलन डोळ्यासमोर येते.... आशाताईंचा आवाज जणूकाही हेलनसाठीच आहे असं वाटण्याइतपत हेलन आशाताईंच्या आवाजात विरघळते आणि आशाताई तिच्या नृत्यात! गाणं एकवेळ कोणीही सुरात म्हणू शकेल; पण आशाताई हे असं रसायन आहे की ज्यांनी श्वासाला देखील सूर-ताल-ह्रिदम दिला आहे. त्यांचं  ते 'आ.. आ... आआ....' आपण बाथरूममध्ये देखील करू शकणार नाही... मग इतर कोणासमोर तर प्रश्नच येत नाही. लता मंगेशकर हे भारताला पडलेलं एक नाजूक स्वप्न आहे; आणि आशा भोसले म्हणजे भारताचं चिरतारुण्य आहे!

कार्यकर्ता

लेखक आकाश५०८९ यांनी शनिवार, 08/09/2018 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
कार्यकर्ता ’कार्यकर्ता काय म्हनला? दिलं का?’ धापा टाकत हॉटेलात दाखल झालेल्या रमेशने सुरेशला विचारलं. ’आरं मग! मला देत नाई व्हय. आपली वटच तशी हाय.’ सुरेश म्हणाला आणि ’ ए! चा आनी दोन मिर्ची दी रे’ अशी हॉटेलवाल्या पोराला ऑर्डरही सोडली. ’कसं जमतं हो तुम्हाला?’ ’ह्ये बग, तुला पटणार न्हाई, परत्येकाला काय ना काय तरी खाज असतीच. कुनाला सवताला बरं म्हून घ्यायची खाज, तर कुनाला दुसर्‍याला नाव ठिवायची खाज. आत्ता हाच कार्यकर्ता बग. ह्येला अडलं नडलं त्येला पैसं देयाची लई खाज. प्रवचनं ठोकायची खाज. हितं तत्वज्ञानं ऐकायची होस कुनाला हाय? पन गावतात ना पैसं. आपण खाजवत र्‍हायचं.

मी कळीला फुले वेचताना पाहिले

लेखक आकाश५०८९ यांनी शनिवार, 08/09/2018 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनास पुन्हा जगताना पाहिले मी कळीला फुले वेचताना पाहिले सोडून फांद्या फुलेही झेपावली त्यांनी तुला फुले वेचताना पाहिले झाले बंद कुपीत दरवळणे जेव्हा मी अत्तरास गंध वेचताना पाहिले आकाश विखुरण्याचे दु:ख विसरलो जेव्हा तिला मी मला वेचताना पाहिले आकाश......

तो बोलला खरे

लेखक आकाश५०८९ यांनी शनिवार, 08/09/2018 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
मलाही पटले नव्हते, तो बोलला खरे सुळीवर त्याला दिले, तो बोलला खरे गणले नाही त्यांनी उगाच मूर्खात त्याला त्यांच्या सोयीचे नव्हते, तो बोलला खरे पिऊन अमृतासही बोलणे लटके त्यांचे प्राशिले मदिरेस त्याने, तो बोलला खरे घाबरला उगाच जन्मभरी ’आकाश’ तो त्यालाही कळले नव्हते, तो बोलला खरे ---आकाश

थांबला नसतास तू

लेखक आकाश५०८९ यांनी शनिवार, 08/09/2018 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
जशी थांबले मी तसा थांबला नसतास तू तुला घाई मरणाची, थांबला नसतास तू माझे ओथंबणे तुला कधी दिसलेच नाही ठेवून कोरडी मला का असा भिजलास तू पाहिले असतेस डोकावूनी जर या अंतरी असा परक्याप्रमाणे, वागला नसतास तू तुला शोधणे थांबवले आकाश शेवटी बदललास अवघा, हरवला नव्हतास तू आकाश........