ही हाक कुणाची आहे...!
लेखनविषय:
ही हाक कुणाची आहे...!
उमटती शब्द कागदावर
की तरंग खोल पाण्यावर,
अर्थ लावला त्यांना जरी
तरी,
हा डोह कुणाचा आहे?
बरसत्या धारांना पाहून
बरंच काही येतं दाटून,
थेंबांना समुद्र मिळतो जरी
तरी,
हा घन कुणाचा आहे?
साधेसुधे हे आयुष्यही
सोपे नाही जगणेही,
स्पंदते हृदय माझेच जरी
तरी ,
हा श्वास कुणाचा आहे?
मागे राहिल्या पाऊलवाटा
आता प्रवास एकटीचा
नाही कोणी सोबती जरी
तरी,
ही हाक कुणाची आहे?
फिकीर नाही मला जगाची
विरक्त माझ्या भावना
देहाला मोक्ष मिळेल जरी
तरी ,
हा आत्मा कुणाचा आहे?
-------फिझा.
वाचने
2731
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
जेव्हा जेव्हा अर्थ लागतो
तेव्हा तेव्हा अनर्थ होतो
आठवणींनी ऊर भरून येतो
माझ्यातला " मी " कुणाचा आहे ?
मी साद देतो
प्रतिसाद भरभरून येतो
तरीहि शुष्क, अंतरी मनमंदिरी
हि हाक कुणाची आहे ?
भर तो मला उन्हात छेडून गेला
एक सर नखशिकांत भिजवून गेली
रोमरोमांच फुलले , जीव व्याकुळ झाला
ती आठवण कुणाची आहे ?
सिद्धेश्वर विलास पाटणकर
In reply to सुंदर कविता , फार आवडली by खिलजि
खूप सुंदर !
"भर उन्हात तो मला छेडून गेला" असे वचा
आवडली
देहाला मोक्ष ? हे काय आहे बॉ ?
डोह, घन, श्वास, आत्मा, कुणाचा आहे ठाऊक नाही पण ती हाक मात्र खचितच 'त्या' स्त्रीची असणार...
सांभाळून रहा, घराबाहेर "ओ स्त्री कल आना" नक्की नक्की लिहून घ्या, आणि रात्रीचे अजिबात घराबाहेर पडू नका.


=))
जरा हाक मारली ३७७ बंदी आणली.
म्हणूनच उगाचच हाका मारू नये,मारल्यातरी मनातही ओ देऊ नये!
उच्छादी मारी हाका हाका नुडल्स नाखु
दिवसेंदिवस कविता प्रगल्भ होतेय.
खुप छान वाटलं.
लिहित्या रहा.
सुंदर कविता , फार आवडली