Skip to main content

दृष्टांत

लेखक भृशुंडी यांनी शनिवार, 22/09/2018 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
मला रोज रात्री स्वप्नं पडतात. कधी साधी, कधी विचित्र. पण रोज. नेमाने. बरेचदा मला स्वप्नं लक्षातही रहात नाहीत. सकाळी उठून डोळे उघडले की रात्रीची काहीच याद उरत नाही. आता मग असा प्रश्न पडू शकतो की स्वप्नं लक्षात रहात नसतील तर स्वप्नं पडतात हे कसं काय लक्षात रहातं? गुड क्वेश्चन. कारण स्वप्नात जे काही दिसतं, त्याचे अधिभौतिक परिणाम झालेले असतात. माझ्यासमोर, माझ्या अंगावरच. माझा फ्यूज उडालेला असतो. साध्या रानटी भाषेत किंवा मराठीत (एकूण एकच) सांगायचं झालं तर माझा वीर्यपात होऊन सगळं काही गारेगार झालेलं असतं. Embarrassing, right? You bet.

श्रीगणेश लेखमाला - आठवड्यातून फक्त एक दिवस....

लेखक हेमंतकुमार यांनी शनिवार, 22/09/2018 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
एडवर्ड मर्फी या अवकाश अभियंत्याचे एक वचन (मर्फीचा दुसरा नियम) प्रसिद्ध आहे : Nothing is as easy as it looks. खरेय, एखादी गोष्ट वरवर दिसायला जेवढी सोपी वाटते, तेवढी ती प्रत्यक्षात नसते. दुसऱ्याच्या एखाद्या कृतीकडे बघून बऱ्याचदा आपण सहज म्हणून जातो, “हे काय मीसुद्धा केले असते, त्यात काय एवढे?” पण जेव्हा खरेच ती कृती आपण करू पाहतो, तेव्हाच आपल्याला त्या उद्गारांमागचा फोलपणा कळतो. कोणत्याही कृतीतील सहजता ही परिश्रमाशिवाय प्राप्त होत नसते.

आठवणीतील काश्मीर : लालेदी छोले -पुरी

लेखक Sanjay Uwach यांनी शुक्रवार, 21/09/2018 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणीतील काश्मीर : लालेदी छोले -पुरी आता तसे पहिले तर या घटनेला अनेक वर्षे होऊन गेली .मला अजून देखील तो दिवस चांगला आठवतो .मी जेव्हा कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होतो, त्या वेळी मला, माझे सिनियर्स या लालाच्या दुकानात छोले पुरी खाण्यासाठी घेऊन आले होते .लाल चौकात पॅलॅडियम टॉकीज जवळ, जी भाजी मंडई आहे ,त्या मंडईत आत शिरल्या वर डाव्या बाजूला हे दुकान होते. दहा बाय दहा फुटाच्या छोटयाशा दुकानात,बाजूच्या तिन्ही भितींना साधारण आठ इंचाची सभोवती एक लाकडी पट्टी लावण्यात आली होती . त्या पट्टीवर आपली प्लेट ठेवून,उभे राहूनच लोक मोठ्या मज्जेने छोले पुरी,टिक्कीया,सामोसे,चाट याचा आनंद घेत असायचे.

बोली बोली बायका बोली

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 21/09/2018 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही बायका म्हणजे बोलीभाषा, बोलघेवड्या ! चुलीपासून फोनपर्यंत बडबडबड, गप्पागोष्टी.... लिपीबिपीचे बंधन नाही व्याकरणबिकरण... हे काय असते? आम्ही बोलतो अनंत बोलीतून .... कुजबुज जितकी थरथरणारी तितके भांडण कडकडणारे कठोरतेचा शीण आम्हाला मवाळतेचा शाप तसाही पण बोली आमची जपून ठेवतो.... अर्थाचा पण अनर्थ करू.... खिल्ली तुमची सहज उडवू निरर्थाला अर्थ देऊ...

एका गुरूची गोष्ट !

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 20/09/2018 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
एका गुरूची गोष्ट. दिवेलागणीची वेळ. मंदिराच्या गाभाऱ्यात मंदपणे तेवणाऱ्या समईच्या शांत प्रकाशाची संधिप्रकाशी तिरीप सोडली, तर मंदिराच्या सभागारात उजेडाचे अस्तित्वही नव्हते. भगवंताकडे पाठ करून गाभाऱ्याच्या द्वाराशी बसलेल्या महाराजांचा चेहरा त्या प्रकाशात काहीसा अधिकच उजळ भासत होता.

लीड्स ते लंडन ५ ते १५ जुलै २०१९

लेखक फोटोग्राफर243 यांनी गुरुवार, 20/09/2018 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार २०१९ च्या विश्व चषक स्पर्धे साठी लंडन आणी लीड्स ला जायचा प्लॅन आहे , हातात ५ जुलै ते १५ जुलै पर्यंत वेळ आहे, काय काय पाहता येईल, ट्रीप कशी प्लॅन करावी, बरोबर ऑफिस चे मित्र आहेत

आशाताई आणि आपलं भावगीत विश्व 

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 20/09/2018 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
आशाताई आणि आपलं भावगीत विश्व  आशाताईंच्या जन्मदिवसानिमित्त 'पिया तू अब तो आजा....' हा लेख लिहिला; त्याचवेळी मनात होतं की आशाताईंनी अजरामर केलेल्या मराठी भावगीत विश्वातल्या काही मोजक्या गाण्यांवर जर काही लिहिलं नाही तर आपल्यासारख्या रसिकांवर तो अन्याय असेल. म्हणून हा अगदी लहानसा प्रयत्न.... मानून घ्या! 'पिया तू......' या लेखात म्हंटल्या प्रमाणे हिंदी चित्रपटातील आशाताईंची गाणी ऐकताना आपल्या डोळ्यांसमोर ती अभिनेत्री उभी राहाते. मात्र मराठी भावगीतांच्या संदर्भात माझं मत थोडं वेगळं आहे. आशाताईंच्या गाण्यातून मला मीच त्या शब्दात विरघळताना दिसते....  'जिवलगा......