Skip to main content

इतिहास नावाची ऐतिहासिक समस्या

लेखक आकाश खोत यांनी रविवार, 14/10/2018 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी इतिहास शिकायला सुरुवात झाली तेव्हा इतिहास असतो काय आणि का शिकावा हे हि सांगितलं गेलं होतं. हा तर परीक्षेतला प्रश्नसुद्धा होता. आणि त्यांचं रटलेलं उत्तर काहीसं असं होतं कि..
इतिहास म्हणजे आजवर घडलेल्या घटनांची नोंद. ज्यातुन आपल्याला मानवजातीने आजवर केलेल्या प्रगतीची आणि चुकांची माहिती मिळते. पूर्वजांच्या पराक्रमाने आणि यशाने प्रेरणा मिळते. आणि त्यांच्या चुकांतुन शिकण्याची संधी मिळते.
उत्तरावर हल्ली घडत राहणाऱ्या घटनांमुळे पुन्हा विचार मनात येत होते. आणि जाणवत होतं कि हे उत्तर साफ चुकीचं आहे, किंवा अपूर्ण आहे. अर्थात लहानपणी असलेल्या आकलनापुरतं ठीक आहे.

रदीफ नाही कधी जुळला ...

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 13/10/2018 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
रदीफ नाही कधी जुळला न कधीही काफिया सुचला गजल जगण्यातला तरिही कैफ भरपूर अनुभवला जिव्हारी लागतिल ऐसे कितीतरी वार परतविले तरी एल्गार युध्दाचा जखम ओली असुन केला सदैवच लागले होते ध्यान हे ऐहिकापार इकडच्या ऊनछायेचा कधी अफसोस ना केला
काव्यरस

बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) १: प्रस्तावना

लेखक मार्गी यांनी शनिवार, 13/10/2018 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
बघता मानस होते दंग १: प्रस्तावना नमस्कार! कोंकणात सायकलीवर फिरणं माझं अनेक वर्षांचं स्वप्न होतं. एकदा त्याचा अयशस्वी प्रयत्नही केला होता. हे स्वप्न नुकतंच पूर्ण झालं. सायकलीवर कोंकणात फिरू शकलो- सोलो सायकलिंग करू शकलो. त्यासंदर्भात आता सविस्तर लिहिणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे ही मोहीम माझ्या नवीन हायब्रिड सायकलवर- मेरीडा स्पीडर 100 वर केलेली पहिली मोहीम आहे. ह्या सायकलीवर दोन शतकही केले होते. पण प्रत्येक वेळी पंक्चर झालं. माझी जुनी एमटीबी सायकल व ही हायब्रिड सायकल ह्यांच्यातला फरक जुन्या काळातील नोकिया शुद्ध फोन- 3315 आणि आत्ताच्या जनरेशनमधला आय फोन सेव्हन सारखा वाटत होता!

क्राईम डायरीज : एक शापित नातं : भाग १

लेखक कलम यांनी शुक्रवार, 12/10/2018 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सात वाजले तरी आपल्या अतिभव्य बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरच्या बेडरूमच्या टेरेस वर उभी राहून शांभवी विचार करत होती. समोर उधळणाऱ्या लाटा आज तिचं मन हलकं करत नव्हत्या. अथर्व च्या मागं लागून तिनं हा सी फेस बंगला विकत घेतला होता. शहराबाहेर दूर आणि समुद्र किनारी असलेल्या ह्या बंगल्यात दुसऱ्या मजल्यावर तिची आणि अथर्व ची शानदार बेडरूम होती. सोबतच साथ देणारा घोंघावता खारा वारा आणि लाटांचा उमदा आवाज तिला खूप आवडायचा. बेडरूमच्या टेरेस वर उभी राहून ती तासंतास समुद्राकडे बघत राही पण आज मात्र तिला तो आवाज भेसूर वाटत होता.

पावसाळी भटकंती : पेठ / कोथळीगड (Peth /Kothaligad)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 12/10/2018 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणातील प्राचीन बंदरातून म्हणजे डहाणु, नालासोपारा, चौल, महाड, दाभोळ इथून माल देशावरच्या पैठण, जुन्नर, तेर, करहाटक ( कर्‍हाड) , कोल्हापुर या शहरात व्यापारासाठी नेला जाई. हा माल बैल आणि गाढवावर लादून नेला जात असे. सहाजिकच हि जनावरे जिथे दमतील त्या चालीवर विश्रांतीस्थळे म्हणजेच, लयनस्थळे अर्थात लेणी कोरली गेली. या लेण्यांना आणि व्यापारी तांड्यना सरंक्षणाची गरज निर्माण झाली. Kothaligad 1 तेव्हा योग्य असे डोंगर पाहून या मरहट्ट देशात दुर्ग उभारणी झाली.

यंत्र (भाग ४)

लेखक गतीशील यांनी गुरुवार, 11/10/2018 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
यंत्र (भाग १) https://www.misalpav.com/node/43400 यंत्र (भाग २) https://www.misalpav.com/node/43408 यंत्र (भाग ३) https://www.misalpav.com/node/43412 परीक्षित अजयकडे आश्चर्यचकित होऊन बघत होता. अजय मात्र एकदम सहज आत आला.. "कसा आहेस परीक्षित?" "........" "अरे बोल ना" "तुला मराठी येतं?" " हा हा हा ..मला हिंदी आणि इंग्लिश सोडून भारतातील ६ भाषा येतात" "......" तेवढ्यात चव्हाणांनी त्यांचा मोबाइलला सायलेंट मोड वर टाकला.. "परीक्षित, well done.

'योग जिज्ञासा: एटलस सायकलीवर योग यात्रा विशेषांक'

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 11/10/2018 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. नुकतंच जालना येथे 'योग संमेलन' झालं. चैतन्य योग केंद्र जालना व निरामय योग प्रसार व संशोधन केंद्रातर्फे आयोजित ह्या योग संमेलनामध्ये 'योग जिज्ञासा: एटलस सायकलीवर योग यात्रा विशेषांक' प्रकाशित करण्यात आला. गेल्या मे महिन्यामध्ये परभणी- जालना- औरंगाबाद व बुलढाणा जिल्ह्यात ५९५ किमी सायकल प्रवासातून विविध योग साधकांसोबत झालेल्या भेटी, त्यांचे अनुभव, ठिकठिकाणची योग केंद्रे/ योग साधक ह्यांचे पत्ते व संपर्क क्रमांक ह्यांचे तपशील असलेला हा विशेषांक आहे. योगामुळे आयुष्यात काय फरक पडला, हे २७ साधक- साधिकांच्या अनुभवातून आपल्याला कळतं.

हिंदू चार्टर ऑफ डिमांड्स

लेखक साहना यांनी गुरुवार, 11/10/2018 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
https://hinducharter.org/ हिंदूंना त्यांच्या देशांत कायद्याच्या दृष्टिकोनातून "समान" अधिकार असावेत अशी अतिशय माफक मागणी काही प्रमुख विचारवंतांनी केली आहे आणि २०१९ मध्ये इलेक्शन मध्ये ह्याला एक प्रमुख मुद्दा करावा ह्या दृष्टिकोनातून हे पत्रक जाहीर केले आहे. १. भाजप खासदार सत्यपाल सिंग ह्यांचे खाजगी बिल पास करावे ज्याद्वारे हिंदूंना सुद्धा त्यांच्या शाळा आणि मंदिरे चालविण्याचा अधिकार प्राप्त होईल. २. FCRA वर संपूर्ण बंदी. फक्त प्रवासी भारतीयांनाच भारतीय NGO ला पैसे द्यायला मिळतील ३.

तू का राम??

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 10/10/2018 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
डॅशिंग आयएएस अधिकारी म्हणून परिचित असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या कारवायांच्या कहाण्या म्हणजे आजकाल अविश्वसनीयच वाटाव्यात असेच प्रकार असतात. नाशिक मनपाचे आयुक्त असलेल्या मुंढे यांनी आजही अशीच धडक कारवाई केली. नवरात्रीनिमित्त कालिका मंदिरात तुकाराम मुंढे आरतीकरिता पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी मंदिरात आणि प्रसाद स्टॉल्सवर त्यांना प्लास्टिक दिसले. राज्यात प्लास्टिकबंदी असूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पाहून, आयुक्त तुकाराम मुंढे चांगलेच भडकले.

बोनेदी बारीर पूजो

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 10/10/2018 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
“महालय आच्छेन. आजे चॊक्खू दानेर दिन !” (पितृपंधरवडा संपतोय आज, आज देवीच्या मूर्तींना डोळे रेखण्याचा - चक्षु-दानाचा दिवस आहे) माझे मित्र राधामोहन बाबू उत्साहात बोलले आणि मी मनातल्या मनात जुन्या कोलकाता शहराच्या अरुंद रस्त्यावरून कुमारटोली (कुंभारवाडा) भागात फेरी मारून आलो सुद्धा. कोलकात्याच्या दुर्गापूजेची महती आणि मोहिनीच तशी आहे. चला तर, तुम्हालाही माझ्यासोबत थोडे फिरवून आणतो. 'दुर्गापूजा' (बंगालीत फक्त 'पूजो') असा नुसता शब्द जरी ऐकला तरी समस्त बंगालीजनांचे डोळे लकाकतात आणि चेहऱ्यावर हमखास स्मिताक्षरे उमटतात.