आपण साऱ्याच “हेलिकॉप्टर ईला”
आपण साऱ्याच “हेलिकॉप्टर ईला”
चाळीशीतील हुंकार
साप्ताहिक सदर
मुलाच्या अतिकाळजीने अस्वस्थ होतो, मुलं सक्षमपणे बाहेरच्या जगात वावरत असतानाही त्याच्या डोक्यावर ‘हेलिकॉप्टर’सारख्या घिरट्या घालत होतो. आमचं हे ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ त्यांच्या आणि आमच्यासाठीही त्रासदायक ठरतंय हे मान्यच करायला तयार नव्हतो आम्ही. काहीची मुलांच्या संगोपनाच्या नादात स्वतःची स्वप्नं मागे पडली होती, तर एखादी सिंगल पॅरेंटींगमुळे स्वतःलाच विसरली होती. एकीनं भरपूर आयुष्य जगलं पण आता तिला रितेपण जाणवत होत.
रफाल - भाग ३
ह्या आधीचे
https://www.misalpav.com/node/43446
https://www.misalpav.com/node/43450
भाग ३ - संरक्षण खरेदी प्रक्रियेबद्दल थोडेसे
आद्याक्षरांच्या शब्द समूहांची यादी
AoN - ऍक्सेप्टन्स ऑफ नेसेसिटी.
ASR - एअर स्टाफ रीक्वायरमेंट्स.
CAG - कंपट्रोलर ऑडिटर जनरल.
CCS - कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी.
DAC - डिफेन्स एक्विझीशन कौन्सिल.
DCS - डायरेक्ट कमर्शियल सेल्स.
आई
एक मनस्वी वादक होता. आत्मानंदी! कलेचा उपासक. रोज सकाळी उठून वाद्य खांद्यावर घेऊन गावाबाहेर दूरच्या डोंगरावरच्या एका कड्याच्या काठी बसायचा, आणि कलासाधनेत मग्न व्हायचा. डोंगरातला वाराही त्या तालावर फेर धरायचा, पक्षी सम साधत गाऊ लागायचे, सारे भवताल सचेतन होऊन जायचे. या वादकाला त्याचा पत्ताही नसायचा. त्याची जादूई बोटं त्या वाद्यावर थिरकत स्वर्गीय नादनिर्मितीत मग्न असायची...
अशा समाधीस्थितीत बराच वेळ जायचा. सूर्य डोंगराआड कलू लागला की पक्षी भानावर यायचे आणि नाखुशीनेच घरट्याची वाट धरायचे. वाराही मलूल होऊन शांत डुलकी घ्यायचा, आणि कधीतरी हा वादक भानावर यायचा... वाद्य नीट गुंडाळून उठून वाट धरायचा.
...
बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ३: सातारा- कराड- मलकापूर (११४ किमी)
बघता मानस होते दंग ३: सातारा- कराड- मलकापूर (११४ किमी)
८ सप्टेंबरची पहाट. बाहेर बघितलं तेव्हा पूर्ण आकाशात ढग आहेत. लवकरच पाऊस सुरू झाला. आज नक्कीच पाऊस असणार. पण थोड्या वेळाने जेव्हा तयार होऊन सायकल घेऊन निघालो, तेव्हा आकाश अगदी निरभ्र! श्रावण सरींची गंमत आहे ही. सातारा! गावातून निघताना समोर पहा-यासाठी उंच उभा असलेला विराट अजिंक्यतारा दिसतो! मागच्या वेळच्या सातारा प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या! त्या आठवत अजिंक्यता-याच्या जवळून निघालो. सातारा शहराचं सौंदर्य परत एकदा बघायला मिळालं. अजिंक्यता-याच्या मागच्या बाजूने हायवेकडे जाताना काय सुंदर नजारे दिसत आहेत!
पाकळी!
सकाळ झाली
कोवळी किरणे अंगावर आली
अन् पाकळ्यांनी हळूच
डोळे किलकिले केले
एक फुलपाखरू बागडतच
पाकळीवर येऊन बसले
अन् मिटलेल्या साऱ्या पाकळ्या
फूल फूल होऊन गेल्या...
किरणांनी न्हाऊन ताज्या झाल्या,
वाऱ्यासंगे डोलू लागल्या,
सुगंध उधळत झुलू लागल्या...
उमलत्या पाकळ्यांना
फुलपाखरांचे थवे
गुदगुल्या करू लागले
अन् हसूहसूं होऊन
पाकळ्या लाजल्या...
सारा दिवस तोच खेळ!
तिन्हिसांजा झाल्या
किरणांनी अलगद दडी मारली
पंख मिटून फुलपाखरांनी
पानाआड दडी मारली...
कोवळी पालवी मिटू लागली...
वाराही मिटून गेल्यागत
चिडीचूप होऊन बसला...
उजेडही मिटून गेला,
अन् दिवसभर डोळे मिटून बसलेल्या
अंधाराला जाग आली...
अचानक अंगावर आलेला
अं
दिवाळीत कोकण ट्रिप
नमस्कार सर्वांना....
मी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये म्हणजे 6 ते 11 नोव्हेंबर या कालावधी मध्ये मालवण , तारकर्ली आणि अजून काही माहिती मिळाली तर तेही करण्याचा विचार आहे, मी पुण्याहून कोल्हापूर मार्गे कोकणात उतरणार आहे, जाणकारांनी मदत करावी, काय पाहावे, कोठे राहण्याची व्यवस्था होईल, खासकरून खाण्याच्या बाबतीत कुठे छान जेवण ( नॉनव्हेज) मिळेल???
आणि सोबत dslr कॅमेरा असणार आहे, त्यामुळे कोकणच्या सौन्दर्याची लयलूट यथेच्छ करणार आहोत फोटोमार्फत, .....
ब्राह्मणेतरांचे नेते मात्र ब्राह्मण
सध्या राम आणि रावण यांच्या निमित्ताने निरनिराळे परस्पर विरोधी मुद्दे मांडले जात आहेत. ते ऐकताना सामान्य माणसाचा संभ्रम वाढतो आहे. रावण हा आदिवासींचा राजा होता त्यामुळे तो आमचा राजा आहे असे काही दलित संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे रामाने त्याची हत्या केली हे योग्य केले नाही आणि म्हणूनच दरवर्षी रावण दहन हेही त्यांना पटत नाही. मरणान्तानि वैराणि असं स्वतः राम म्हटले असतील तर दरवर्षी हा वाद उकरून काढून रावणाला का जाळायचं.
क्राईम डायरीज : एक शापित नातं : भाग 3
गोव्याच्या अंजुना बीचवर शांभवी हातात थंडगार मॉकटॆल घेऊन रिक्लाईनर चेअर वर पहुडली होती. समोरच सान्वी आणि इंदू वाळूत किल्ला बनवत बसल्या होत्या. इंदू ही बंगल्यावर काम करणाऱ्या शेवंताची मुलगी. वीस वर्षांची इंदू पण शेवंताबरोबर बंगल्यावर मदतीला येऊ लागली. हसरी, बडबडी पण कामसू अशी इंदू थोड्या दिवसात सान्वी ची इंदू ताई बनली.
"घरी हीचा बाप दारु पिऊन बडवतो आमास्नी आणि माह्या पोरीवर बी त्या भ***ची लई वंगाळ नजर हाये बगा. म्हनून म्या पोरीला बी माह्या संगट हिकडं घिऊन आली. भाईर ऱ्हाईली तर काय बी करू शकनार नाय त्यो.
टॅटू ...
टॅटू !
आॅपरेशन झालं. अगदी व्यवस्थित पार पडलं. शांत पहुडलेल्या त्या पेशंटकडे समाधानानं पाहात डाॅक्टरांनी मास्क काढला. ग्लव्हज काढून बिनमध्ये टाकले आणि बेसिनवर हात धुवून तोंडावर पाण्याचा सपकारा मारून ते तसेच ओटीमधल्या त्यांच्या आरामखुर्चीत बसले.
ती त्यांची सवयच होती. नेहमीच आॅपरेशन पार पडलं की ते इथे बसायचे. तोवर बाकीचा स्टाफ आवराआवर करायचा आणि आरामखुर्चीतून डाॅक्टरांची नजर पेशंटवर खिळलेली असायची.
आजची पेशंट वृद्ध असल्याने डाॅक्टरना थोडी काळजी वाटत होती.
मिसळपाव