Skip to main content

पुलं "दैवत"

लेखक MipaPremiYogesh यांनी शुक्रवार, 23/11/2018 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
आमचं कुलदैवत ~ पुलदैवत पुलंची जन्मशताब्दी असं वाचल्यावर जरा आश्चर्यचकित झालो. पुलं आज असते तर 100 वर्षाचे झाले असते. पण झाले असते? पुलं गेलेच कुठे आहेत..ते अजूनही त्यांच्या पुस्तकातून, वेगवेगळ्या व्यक्तीरेखांतून आजूबाजूलाच आहेत. परवा कोकणात फिरतांना अंतू बरवा दिसले..हेदवी ला शिवराम गोविंद दिसले, बेळगाव- कारवार ला रावसाहेब दिसले. पुलं त्यांच्या पुस्तकांमधून, नाटकांमधून अजूनही आपल्याला भेटतातच की.

गावपातळीवरची एक अफलातुन राजकारणी खेळी

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शुक्रवार, 23/11/2018 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
एका विधानसभेच्या निवडणुकीतील रणधुमाळीत जवळुन पाहीलेला किस्स्सा. अमुक अमुक दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी घड्याळात दुपारचे २-४५ झाले होते तेव्हा एक स्त्री तिचा उम्देवारी अर्ज दाखल करण्यासाठी नियमाप्रमाणे आवश्यक असल्याने तिच्यासोबत ४ सहकार्यांना घेऊन आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तिथे असलेले अधिकारी आधी चरफडले पण वरुन आदेश होते कि ३ वाजेपर्यंत येणारे अर्ज व्यवथित पडताळणी करुन एक तर जमा करुन घेणे अथवा परत पाठवणे. त्यानुसार अधिकार्यांनी अर्जाची छाननी करण्यास सुरवात केली.

विमानाचे नवे तंत्रज्ञान

लेखक सुधीर कांदळकर यांनी शुक्रवार, 23/11/2018 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
विमानाचे नवे तंत्रज्ञान विकसित होत आहे. अजून बाल्यावस्थेत असले तरी उपयोजिता यशस्वी झाल्यास हवाई वाहतुकीत क्रांती घडून येईल. https//www.theguardian.com/science/2018/nov/21/first-ever-plane-with-no-moving… इथे ही काही तपशिलांसह बातमी आहे. माझे ज्ञान पाजळण्यापेक्षा मूल बातमीचा दुवा देणे बरोबर वाटले म्हणून दुवा दिला आहे.

पानाची गोष्ट

लेखक मूखदूर्बळ यांनी शुक्रवार, 23/11/2018 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज झाड़ फार खुष होत. त्याच्या छोटयाश्या कोवळशा फांदीला नवीन पालवी फुटली होती. झाडाला अगदी नातवंड झाल्याचा आनंद होत होता. बाकीच्या पान, फांदया, नवीन बाळानतीणी सारख्या त्या कोवळ फांदीचे कौतुक करीत होत्या. त्यातही ते छोटेसे कोवळ पान खुप सुंदर दिसत होत. पोपटी रंगांच ते पान लहान गोंडस बाळा सारख वाटत होत. दिवसागणिक ते पान हळू हळू वाढत होत. पोपटी रंग जाऊन हिरवा रंग बाळस धरत होत. मुबलक सूर्यप्रकाश आणि पाण्याने त्याच तेज वाढत होत. त्याचा फांदीशी असलेला संबंध अधिकाधीक दृढ़ होत होता. हिरवा रंग अधिकाधीक घट्ट होत होता. झाड़ नियमित पणे त्या मोठ्या होणाऱ्या पानाच कोड कौतुक पुरवत होत.

बदामी सहल माहिती हवी आहे

लेखक झंप्या सावंत यांनी शुक्रवार, 23/11/2018 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार सर्वांना.... मी डिसेंबर 22 ते 25 नोव्हेंबर या कालावधी मध्ये मी आमची सौ आणि दोन मुले एक ११ वर्ष आणि दुसरा ३ वर्ष बदामी जाण्याचा विचार आहे, मी पुण्याहून रेल्वेने जाणार आहे, जाणकारांनी मदत करावी, काय पाहावे, कोठे राहण्याची व्यवस्था होईल, खासकरून खाण्याच्या बाबतीत कुठे छान जेवण (व्हेज) मिळेल

टीना, मोदीजी आणि त्यांचे कौतुक करण्याची इच्छा

लेखक mrcoolguynice यांनी शुक्रवार, 23/11/2018 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, एक मोदीजी व व विवेकानंदजी यांचा चाहता असणाऱ्या बाबांचा मुलगा आहे. माझे बाबा विवेकानंदानी, 'माझ्या बंधुनो आणि भगिनींनो' असे बोलून, श्रोत्यांना समोरच्यांना प्रतिस्पर्ध्यांना , आपलेसे करण्याच्या वृत्तीचे , चहाते आहेत. रोज ते त्यांच्या क्लबात (सोसायटीतील सभासदांतील भावंडंभावना जोपासणाऱ्या ग्रुपमधे) मोदीजींची (चर्चेदरम्यान) आपल्या परीने बाजू सावरून घेतात. परंतु ते बर्याच बाबतीत विशेषतः डेटा बाबतीत माझ्यावर अवलंबून असतात. विरोधी मत मांडणाऱ्याला ते, खेकसून "पटत नाही तर पाकिस्तानात चालते व्हा ", असे गप्प करू इच्छित नाही. असे का ?

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ९

लेखक कलम यांनी शुक्रवार, 23/11/2018 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात आपण खूप चुका करतो... काही लहान सहान, काही खूप मोठ्या तर काही माफी सुद्धा नसणाऱ्या. आपण करतच जातो त्या चुका, कारण काहीही असो.. कधी त्या चुका करणं हि आपलीच चूक असते, कधी परिस्थितीची गरज असते तर कधी जाणून बुजून आपण ते सर्व करतो. चुका कुठल्याही असोत, आयुष्यात झालेली प्रत्येक चूक आपली सावली बनते आणि आपण सरणावर जाईपर्यंत आपला पिच्छा करते...सगळा वेळ, आपल्याही नकळत. आपण एखादी चूक सुधारतो, सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला वाटतं कि सगळं कसं पूर्वीसारखं ठीक होईल, पण नाही.. केलेल्या चुकांचे फास आपल्याला कधीतरी आवळतातच... कुठंतरी, कुठल्यातरी वळणावर आपल्या समोर उभे ठाकतातच.

आयुबोवेन रत्नद्वीप -- भाग ४

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 23/11/2018 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
कॅंडी नंतर आमचा आजचा पुढचा बेत होता नुवारा एलीया किंवा नुवा एलीया हे थंड हवेचे ठिकाण बघणे आणि तिथेच मुक्काम करणे.शिवाय जाताना वाटेत बॉटनिकल गार्डन चहाचे मळे स्ट्रॉबेरी गार्डन रॅम्बोडा फॉल्स हनुमान मंदिर हे सर्व बघत जायचे होते. सकाळी भरपेट नाश्ता करून दिवसाची सुरुवात तर मस्त झाली. हॉटेलचा निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि गाडी पुन्हा वळणावळणाच्या रस्त्याने धावून लागली.आता बाहेरचे दृश्य अजूनच सुंदर आणि हिरवेगार होते. १०-१०.३०चा सुमार असूनही डोळ्याला ऊन जाणवत नव्हते.

सर्व हिंदू पद्धती आणि देवतांपासून दूर रहाण्यासाठी काय करावे ?

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 23/11/2018 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी एवढ्या सगळ्या हिंदू पद्धती आणि देवतांचा हिंदूंनाही कंटाळा येतो की नाही, आणि ते ३३ कोटी देवतांचे तर भयंकर प्रकरण आहे. खासकरुन ज्यांना अहिंदू म्हणून रहायचे म्हणून हिंदू पद्धती आणि देवतां पासून कटाक्षाने दूर रहायचे तर त्यासाठी काय काय करावे ? याचे या उतार्‍यात काही उपाय सुचवले आहेत पण यातील काही देवतांपासून दूर रहाण्याचे प्रकार कायदा आणि आप्त स्वकीयांच्या अनुमतीने वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय सल्ल्याने आणि स्वजबाबदारीवर करावेत. धागा लेखकाचा उत्तरदायीत्वास नकार लागू आहे.

कविते.....!

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 23/11/2018 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
कविते......!. तू, तुला हवं तसं जग !! उमलत राहा, फुलत रहा, कागदांवरून मनांवर बहरत रहा, नेहमी सारखीच! पण एक लक्षात ठेव आता ...... तू ना माझी , ना त्याची ! मी लिहिलं तुला म्हणून तो वाचेल तुला, एवढाच काय तो उरलेला दुआ ! कारण भेटलो तर , स्वप्न वाटेल, नाही भेटलो तर, विरक्त वाटेल ! नव्याने काही केलं तर पाप वाटेल, जुन्यातच अडकुन राहीलो तर श्राप वाटेल! हात दिला तर स्वार्थ वाटेल, ढळणारा अश्रूच, सार्थ वाटेल! काही केलं तर...काय केलं? वाटेल नाही केलं तर...का नाही केलं? वाटेल ! आमचं काय ??......