Skip to main content

पावलांना अंत नाही

लेखक आनंदमयी यांनी बुधवार, 28/11/2018 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
पावलांना अंत नाही वेदनेला गाव नाही चालते ही व्यर्थ चिंता थांबण्याचे नाव नाही दूर काळोखात कोणी गुंफली माझी कहाणी? त्या तिथे सूर्यास सुद्धा, उगवण्याचे ठाव नाही.. लाख स्तोत्रे अर्पुनी मी मांडले वैफल्य माझे.. टेकला मी जेथ माथा, मंदिरी त्या देव नाही! अंतरीच्या शून्यतेला गीत मी कैसे म्हणावे गोठलेले शब्द नुसते छंद नाही, भाव नाही! अदिती
काव्यरस

यूं ही चला चल राही….भाग - १

लेखक मालविका यांनी बुधवार, 28/11/2018 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीनिवास, माझा नवरा, सुरवातीला ट्रेकिंग करायचा. आता त्याला सायकलिंगचा नाद लागलाय. इतकाकि मी कधी कधी त्याला सायकल वेडा म्हणते. एरवी दोघांमध्ये मीच जास्त बडबड करणारी. पण सायकलचा विषय निघाला कि श्रीनिवास एकदा जो सुरु होतो तो थांबतच नाही. कधीतरी मी सांगतेसुद्धाकि बास बाबाआता सायकल पुराण. पण तो थांबत नाही. आपण सायकलने इकडे जाऊया, मग तिथून दुसरीकडे जाऊया असे प्लॅन अखंड करत असतो. यातल्या बऱ्याच वेळेला मी दुर्लक्ष करते कारण माझ्याच्याने ते झेपणार नाही याची मला खात्री असते. श्रीनिवास सायकलची फारच काळजी घेतो.

बाप्पा

लेखक Prajakta Yogiraj Nikure यांनी बुधवार, 28/11/2018 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पा धीन ता धीन धीन ता धीन ता धीन धीन ता धीनधीनधीनाक धीनधीनधीनाक बाहेर ढोल ताशांचा आवाज घुमत होता . ढोल ताशा पथक मोठ्या जल्लोषात बाप्पाचं स्वागत करत होते . बाप्पा पण मस्त आपली बॅग वैगेरे भरून आपल्या लाडक्यांकडे १० दिवसांसाठी रहायला आला होता आपल्या आईला सोडून. त्यांच्या आईने पण मस्त खाऊ वैगेरे देऊ का विचारलं बाप्पाला पण बाप्पा कसला खाऊ घेतोय आपल्या आईकडून उलट त्यानेच सांगितलं की , “ मी मस्त खाऊ खाणार आहे माझ्या भक्त्यांकडे जाऊन . काय ते उकडीचे मोदक , खोबऱ्याचे मोदक, वेगवेगळे पदार्थ , विचार करूनच तोंडाला पाणी सुटतंय .

पाऊस

लेखक Prajakta Yogiraj Nikure यांनी बुधवार, 28/11/2018 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस त्या राञी तो धो-धो कोसळत होता. त्याच्या येण्याने सर्वजण खुप आनंदी झाले होते. तो येताना ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, मोरांचा नाच , बेडकांचे डराँव डराँव , झाडांचा कुजबुजाट चालू होता. सर्व काही व्यवस्थित चाललेले होते. सर्व वातावरण आनंदमय झाले होते. आपली माय धरती मातेला कधी त्याला आपल्या कुशीत घेऊ असे तिला झाले होते.पण ती माञ या आनंदमय वातावरणातही आनंदी दिसत नव्हती , तिचे डोळे आशेने खिडकीतुन सतत रस्तावर कोणाला तरी शोधत होते. ती अस्वस्थ होती, बिथरलेली होती किंबहुना घाबरलेली होती. तिच्या हरिणासारख्या टपोरी डोळ्यातून सतत अश्रुंचे ओघळ वाहत होते.

आयुबोवेन रत्नद्वीप -- भाग ७

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 28/11/2018 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळचा गजर वाजला आणि सगळेजण ताडकन उठून बसले.आज व्हेल बघायला जायचे होते आणि बोटीवरच नाश्ता वगैरे मिळणार होता.त्यामुळे फार वेळ न घालवता झटपट तयार होऊन सर्वजण निघाले.

आणि... डॉ काशीनाथ घाणेकर

लेखक मकरंद घोडके यांनी बुधवार, 28/11/2018 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी नाट्यसृष्टीतला पहिला नाही तर अखेरचा सुपरस्टार! घाणेकरांच्या पत्नी कांचन घाणेकर यांच्या "नाथ हा माझा" वर आधारित हा biopic सिनेमा अक्षरशः लोकांना ओढू ओढू नेतोय सिनेमाघरात! काय चुम्मा कामं केलीत सर्वांनी!!! सुबोध बद्दल काय बोलावं? आपली पात्रताच नाही ती! त्याने फक्त अशी सुंदर कामं करत राहावीत आणि आपण मंत्रमुग्ध होऊन ती पाहत राहावीत इतुकीच आपली पात्रता!! मला दोन लोकांबद्दल विशेष बोलायचं आहे सुमित राघवन ने त्याच्या अंदाजात डॉ लागू असे काही बेमालूम मिसळले आहेत की सुमित आणि डॉ लागू वेगळे असूनही कुठेही तुलना करावीशी वाटत नाही!

मिस शलाका B.A.

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 28/11/2018 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
"शलाका!" बसस्टॉपवर काकांनी एका पाठमोर्‍या मुलीला हाक मारली. त्या मुलीनं मागे वळून पाहिलं. "देशपांडे काका! काय म्हणताय? बर्‍याच दिवसांनी गाठ पडली." "हो.हल्ली फारसं येणं होत नाही इकडे!" "हो.बाबा बोलले मला.काळजी घ्या बरं तब्येतीची!" "हो तर घ्यायलाच पाहिजे.तुझ्या लग्नात हिंडता फिरता यायला हवं मला.काका हसत हसत म्हणाले." "लग्न!" शलाकाच्या कपाळावर आठ्या! का गं? काय झालं? "नै काही नाही!" "अगं योग्य वयात लग्न झालेलं चांगलं" "हो काका पण मनासारखं स्थळ तरी यायला पाहिजे ना?" "कसं स्थळ हवंय तुला?

वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग ७

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 27/11/2018 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखमालेत १९०१च्या पुरस्कारापासून सुरवात करून आपण २०व्या शतकाच्या अखेरच्या दशकात आलो आहोत. आता १९९०च्या पुरस्काराची माहिती घेऊ. विजेते संशोधक : जोसेफ मरे आणि डोनाल थॉमस देश : अमेरिका (दोघेही) संशोधकांचा पेशा : मरे (सुघटन शल्यचिकित्सा), थॉमस (औषधवैद्यक) संशोधन विषय : इंद्रिय व पेशींच्या प्रत्यारोपणाचे उपचार आपल्या शरीरात अनेक महत्वाची इंद्रिये आहेत – जसे की हृदय, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड इत्यादी. अनेक प्रकारच्या आजारांत त्यांच्यावर विपरीत परिणाम होतो. परिणामी त्यांचे कार्य ढासळते.

लाड

लेखक वन यांनी मंगळवार, 27/11/2018 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
गुबगुबीत बाळाचा पहिला वाढदिवस वाटतोय अगदी प्रदर्शनीय उत्सवच चिमण्या नजरेने टिपलेली लठ्ठ श्रीमंती देतीय भविष्यातील ऐश्वर्याची हमी पुढच्या टप्प्यात दिसतंय सुखासीन बालपण मागेल ते मिळतंय कारण कमी नाही धन बागडणाऱ्या गोंडसाचा काढून टाकलेला लगाम खुणावतोय की व्हायचे नाहीच कधी गुलाम धोधो ओतलेल्या पैशातून अंकुरलेले शिक्षण कमीच पडतंय की लावायला चांगले वळण केलेल्या गुंतवणुकीतून हवी असलेली वसुली शोधाया लावतेय कोणा सावजाची टुमदार हवेली गडगंज विपुलतेतून अंगात आलेला माज करू नाही शकत बौद्धिक दुबळेपणावर मात आणि अखेर प्रश्न पडतो मनाच्या कवाडात की खरंच करायला हवेत का नको इतके लाड ? ...............
काव्यरस

मी घेतली यॉट

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 27/11/2018 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी घेतली यॉट ढिसक्लेमरः केवळ हलके घेण्यासाठी. कुणाही व्यक्ती, शक्ती, राजकीय पक्ष-पुढारी, मुळशी पॅटर्न, वाढदिवस बॅनरवाले यांचा उपमर्द करण्याचा हेतू नाही. मी तर घेतली बाबा यॉट फेरारी पेक्षा फार मोठ्ठा तिचा थाट मी तर घेतली ब्वॉ यॉट || धृ || नकोच कसले रस्ते आता धुळभरी ट्रॅफीकचे अन नकोच ते लफडे आता पार्कींगसाठीचे मध्यमवर्गीयाला सांगतो त्याला आहे माझ्याशी गाठ ||१|| इंग्लीश मेडीअम मधला मी कॉन्व्हेंट एज्यूकेटेड मराठी हिंदी धेडगुजरी भाषा म्हणजे कटकट मराठी शाळेची मुले म्हणजे आहेत नुसतीच माठ ||२|| आय.आय.टी., आय.आय.एम.
काव्यरस