Skip to main content

झरे

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी गुरुवार, 13/12/2018 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण येते. हेच एक निर्विवाद सत्य कोपऱ्यात मुलासारखे उभे असते. हवं ते म्हण, हव्या त्या व्याख्या आणि संज्ञा निवड. जोवर देहाचे अस्तर नव्याने फुलत आहे तोवर माझं मन तुझ्या पास येत राहील. चुकलेल्या क्षणांसाठी आकांत करावासा वाटतो मला, करतोही तो जीव तोडून, आतड्यापासून. जीविताचे गुपित जगजाहीर करू म्हणतोस तर तुझ्या आपलेपणाचा ध्यास ओरडून सांगावा लागेल. तुला कितीवेळा ते ऐकू आलंही आहे, तू तुझ्या दुर्लक्षाची मालकी मला दे आता. तेव्हढी माया अजून दाटून येत असेल तुझ्यात. ती देखील जीवापाड जपेन. विश्वासाचा एक आभाळतुकडा तुझ्या अंतरंगात तरंगत असेल की, बघ मी किती झरोके उघडतो त्यासाठी. बोलण्यासाठी जेव्हा विषय
काव्यरस

तव नयनांचे दल

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी गुरुवार, 13/12/2018 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस असण्याचे तापत्रय भोग-उपभोगल्यावर, दुनियादारीचा तिरका खेकडा सर्वांगावर नाचवल्यावर, प्रवासाची मोठीच मजल मारून, थकून येतो तुझ्या घरी. तुझ्या मंद हालचाली डोळे भरून पाहीन, तुझ्या खांद्यावर शांत झोपून जाईन. बोल बोल बोलण्याचे खापर फुटून गेलेलं असेल. तुझ्या ओठांवरचं लालभडक हसू आणि खोल काही शोधत जाणारी नजर, दोन्हीत हरवून जायचंय. डोळ्यात समाधान असेल तू जवळ असल्याचे, असेल स्पर्शात निरामय ओलावा, तेव्हा सैल झालेलं अंग आवडता कंटाळा मागेल. तुझ्या उबेची आस लागेल कसलीच घाई नसलेली. भटकून रानात खालेल्या मटण-भाताचे, सुसाट गाडी पळवून कुठेतरी चहा पिल्याचे, बसच्या उशिराच्या वैतागाचे, थेटरातल्या काळोख
काव्यरस

उत्तररात्र

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी गुरुवार, 13/12/2018 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
ओढ्यावर माळावरच्या थांबला चांद शरदाचा, कडब्याच्या पडवीपाशी चमचमतो हिरवा वेचा सौंदळीच्या झाडाखाली भूजलात पेटली धुनी, वाहते मंद ही रात्र थिजलेल्या वाऱ्यामधुनि. सिगरेट कधीची विझली बोटांत जळुनि सबंध, श्वासातून येतो अजुनि त्या सातविणीचा गंध ना मागत नाही निद्रा ही पहाट समंजस क्षीण, धाडली तिला कवितेच्या माहेरी पाठराखीण स्मरणांच्या फिकट धुक्याचे पडतील कुठे दहिवर? कुसळाच्या सुकल्या देठी आधीच अडकले गहिवर
काव्यरस

मुक्त स्रोत – भाग १

लेखक टीपीके यांनी गुरुवार, 13/12/2018 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
आता समजा तुम्हाला घर बांधायचे आहे, तर कायकाय लागेल? कच्चा माल सिमेंट विटा खिडक्या दारे लोखंड (सळ्या) वायर्स बटणे पाईप्स नळ टाईल्स रंग फॅन बल्ब इत्यादी इत्यादी या व्यतिरीक्त अनेक औजारेही लागतील, जसे घमेली फावडे पकड रंगकामाचा ब्रश इत्यादी इत्यादी घर किंवा इमारत जितकी मोठी तितकी प्रगत साधने लागतील वरील प्रत्येक गोष्ट समजा तुम्ही स्वतः तयार करायची ठरवलीत, तर तुमचे घर नक्की कधी बांधून होईल? कधीच नाही. बरोबर ना? अशावेळीच व्यवसायांचा उदय होतो.

कधी असतेस, कधी नसतेस....

लेखक नायकुडे महेश यांनी गुरुवार, 13/12/2018 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
कधी असतेस, कधी नसतेस,        तरीही मला सगळीकडे तूच दिसतेस... कधी कारवा होतेस, कधी मारवा होतेस, कधी मनाला धुंद करणारा गारवा होतेस.. कधी ऊन होतेस, तर कधी पाऊस होतेस, कधी त्याच वेड्या पावसाची चाहूल होतेस.. असंच कधी असतेस, कधी नसतेस,        तरीही मला सगळीकडे तूच दिसतेस... कधी शब्द होतेस, कधी भावना होतेस, कधी प्रेरणा देऊन जगण्याची साधना होतेस.. कधी रंग होतेस, कधी तरंग होतेस, कधी या मनातून दरवळणारा सुगंध होतेस... असंच कधी असतेस, कधी नसतेस,        तरीही मला सगळीकडे तूच दिसतेस...     &nbsp
काव्यरस

सहा इंच स्क्रीन असणारे मोबाईल

लेखक हर्शरन्ग यांनी गुरुवार, 13/12/2018 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल नवीन फोन घ्यायचा झाला की सगळे पर्याय 6 इंच फोनचेच असतात. मला स्वत:ला ही साईझ थोडी मोठी वाटते. 5 इंचाच्या आसपास स्क्रीन असणारे फोन आहेत पण प्रोसेसर, बॅटरी, कॅमेरा इत्यादी बाबतीत मोठ्या फोन्स ना पर्याय नाही. ज्या व्यक्तींची उंची कमी आहे त्यांच्या लहान हातात तर हे मोठे फोन फारच गैरसोय करताना दिसतात. या विषयावर आपली काय मतं आहेत?

वी आर नॉट मेड फॉर ईच आदर - ४

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 13/12/2018 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
आभासी कर्तव्य आणि खर्‍याखुर्‍या भावना यात मी आभासी जगाला महत्व देत गेलो लोक काय म्हणतील या इतकं आभासी जगात काहीच नसतं. त्या भयामुळे आपल्याच लोकाना आपण जाळत असतो. मी तुला थेट आगीत ढकललं होतं आणि स्वतःही आत जळत गेलो. मागील दुवा : https://www.misalpav.com/node/43750
माता कैकयीने मागितलेला वनवास केवळ रामासाठी होता. तो तू ही स्वीकारलास . आनंदाने. तुझा काहीच दोष नसताना तू लंकेत जावून पडलीस. कष्टात राहीलीस. ..... दोष असेल तर तो एकच तू माझ्याशी लग्न केले होतेस.

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ७. अंबेजोगाई ते हसेगांव (लातूर)

लेखक मार्गी यांनी बुधवार, 12/12/2018 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा....: ७. अंबेजोगाई ते हसेगांव (लातूर) १८ नोव्हेंबरची पहाट, आज प्रवासाचा सातवा दिवस. आज रविवार आहे आणि टप्पा तसा छोटा आहे. आज ७५ किलोमीटर सायकल चालवायची आहे व सतत अनेक दिवस सायकल चालवत असल्याने हे फक्त ७५ वाटत आहेत. एक पेडल मारल्यावर जशी सायकल आपोआप पुढे जाते, एका पेडलचा मूमेंटम जसा दुस-या पेडलला मिळतो, तसाच आता अनेक दिवसांचा मूमेंटम माझ्याकडे आहे. भिती फक्त एकच आहे की, आजच्या रूटवरही रस्ता काही प्रमाणात कमी दर्जाचा आहे. ठीक सव्वा सहाला अंबेजोगाईतून निघालो. यशवंतराव चव्हाण चौकात काल स्वागत झालं होतं, तिथून लातूरच्या रस्त्याला लागलो.

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ११

लेखक कलम यांनी बुधवार, 12/12/2018 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारी चारच्या दरम्यान इन्स्पेक्टर पाटलांच्या केबिन वर टकटक झाली. "प्लिज कम इन, राऊत." समोर सबइन्स्पेक्टर राऊतांना बघून एवढ्या दुपारी पण इन्स्पेक्टर पाटलांना आशेचा गारवा झोंबल्यागत झालं "मग कशी काय झाली शोधाशोध?" "सर, अमित च्या घरात संशय घेण्यासारखं काही सापडलं नाही. त्याची बँक अकाउंट्स, सेविंग्स ह्याबद्दलची कागदपत्रं मिळाली आहेत आणि ती बाहेर साळुंखे कडं तपासासाठी दिली आहेत. त्याच्या बेडरूमच्या कपाटाच्या आतल्या कप्प्यात हि एक हार्ड डिस्क मिळालीय. बरीच आत मध्ये लपवून ठेवलेली दिसली. बघुयात यात काही मिळतंय का?" इतक्यात इंस्पेक्टरांच्या टेबलावरचा फोन खणखणला.

वाट त्याची पाहाता....

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 12/12/2018 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वच संतांच्या चरणी नतमस्तक होऊन; एक लहान प्रयत्न केला आहे.... मागे पाहता वळून वाट गेली हो पुसून भविष्यापासून सोडवि कोण आता मग विचार कशापरी चालत रहा परोपरि विश्वचक्र तो फिरवि तू फ़क्त एक धागा गुंफ़त राहावे स्वतःला फुला-पाना-माणसांना निसर्गाच्या देणगीचा अवमान कैसा करा तुझी वेळ खरी येता   तो करेल उद्धारा तोवर चरणी माथा त्याच्या टेकवावा
काव्यरस