Skip to main content

[शशक' १९] - 'आई......' नावाची हाक

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 02/02/2019 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
"तुमच्या शेजारचं घर घेतलंय. थोडी माहिती हवी होती?" "मी एकटीच असते. चौकशा दुसरीकडे करा." "आई....... मी या गावातच नवीन आहे. कुठे जाणार?" "आई?!!! हम्म! कोण बरं हाक मारायचं ही??? कुठचा तू? घरी कोण असतं?" "मुंबई. घरी फक्त आई. आता इथे सेट झालो की आणीन तिला." "अरे? एकटाच आहेस इथे? ये आत!" ….........."रामभाऊ, परवा जानकीआक्का गेल्या. मुलगा परदेशात गेल्यानंतर आक्का खुळावल्या. गावाचं नाव टाकलं. आण्णा गेल्यानंतर त्यांना पोहोचवून आलेल्या मंडळींना देखील दार उघडलं नव्हतं. परवा तिथून जाताना दार उघडं बघून आत डोकावलं; आक्का जमिनीवर अस्ताव्यस्त पडल्या होत्या. काही नातं नसूनही अंतिम विधी आम्हीच केले.

१९०० | पालगड..

लेखक गवि यांनी शनिवार, 02/02/2019 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी जेव्हा "श्यामची आई" पुस्तकात दिसणारा त्या काळाचा फोटो आल्बम, या विषयावर लेख लिहायला लागलो तेव्हा तो भसाभसा विस्कळीत होत गेला. कोंकणातल्या एखाद्या देवराईत कोणाच्या काटछाटीचं भय नसल्याने वाटेल तशी झाडं झुडपं अन वेली गुंताडा करत फोफावत जाव्यात तसं होत गेलं. त्याच काळातल्या एकमेकांच्या संदर्भांना साक्ष देणारी स्मृतिचित्रे, आमचा जगाचा प्रवास ही पुस्तकंही मी अर्धवट उष्टावून ठेवली. शेवटी क्रूरपणे खूप नोंदी "कापातल्या न्हाव्यांच्या" क्रूरतेने सपासप कापल्या आणि फक्त श्यामची आई या निरागसतेच्या पोथीवर फोकस ठेवला. श्यामची आई हे पुस्तक मी लहानपणी आणि लहानपणभर सतत पुन्हापुन्हा वाचलं.

कॉफी आणि बरच काहि .

लेखक लौंगी मिरची यांनी शनिवार, 02/02/2019 05:38 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळच्या थंडगार वार्यासोबत तुझा “दहा वाजता भेट “ मेसेज वाचुन नाजुकसं हसु आलं ( नेहेमीप्रमाणे) सवयीनेच , तेच ठिकाण वाट बघणं आलं . कपाळावर आठ्या पाडत विचाराधीन होणहि झालं .भेटतोय यासारखं सुख कोणतं ?बघितली थोडी वाट , तर कुठे बिघडलं डोळ्यासमोर राहिल थोडावेळ ,ओंजळीत असतिल क्षण अधिकार गाजवु थोडा , थोडा हट्ट पूरवुन घेऊ . त्याला नाहि आवडत माझं रुसणं.हसणं आवडतं.हसतानाच मला चोरुन पहाणंहि आवडतं . त्याच्यासाठी आज रेड कुर्ता घालु व्हाईट रंगाचा पायजमा न व्हाइटच स्कार्फ घेऊ . गाडीवरुन जाताना , थोडी बोलण्याची उजळनी करु. नेहेमीप्रमाणेच असेल सगळं .हो ! माहित आहे मला.. तरिहि . तरिहि सगळं नव्यानं अनुभवु .

[शशक' १९] - असेही होते कधीकधी

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 01/02/2019 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
फंडात फायदा झाला म्हणून डोक्यात शेअर मार्केटचा किडा वळवळु लागला ..शेअर मार्केटमधलं 'शे'पण माहित नव्हतं . सर्व प्राथमिक तयारी झाल्यावर , मी शेअर्सची नावे बघू लागलो . एक मनात घर करून गेले ,वीर एनर्जी. आतून आवाज आला कि या नावात दम हाय भाऊ, घेऊन टाक . ५०००० हजार गुंतवून २५००० शेअर्स घेतले .आयुष्यातली पहिली गोष्ट सहसा कुणी विसरत नाही. माझ्या साहेबाच्या सांगण्याने , मी सहा एक महिन्यातच ते सर्व विकून नंतर ब्लूचिपमध्ये गुंतवले . सहज आठवण आली म्हणून त्याची माहिती घेतली आणि डोळे भिरभिरले . त्याने एव्हढे बोनस नि परतावे दिले कि आज त्याची किंमत दीड करोड तरी असती .

[शशक' १९] - ग्लास

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 01/02/2019 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
केशवने चार ग्लास भरले. बाहेर सुंदर चांदणं पडलं होतं. "आज जेवन झाल्यावर कोल्ड्रिंग पिऊ आपन...पोरांना आवडंल बघ. आपल्या गावात पानी नाय भेटत प्यायाला पण कोल्ड्रिंग लगेच भेटतयं! तेच पिऊन पाहू; कळंल तरी नुसतं प्यायासाठी आहे की पिकाला बी चालंल..." केशव किंचित खिन्नपणे गौरीशी बोलत होता. गौरीने केशवकडे नुसतं पाहिलं आणि मुलांना हाक मारली. "आये, शुभमनं माझं सर्टिफिकेट खराब केलं." कल्याणी रडू लागली. "कसलं सर्टिफिकेट?" केशवने विचारले. “शाळेत गनिताची एक स्पर्धा झाली होती. त्याच्यात दुसरा नंबर आला माझा, बाबा!" केशव विचारात गुंतला. "गौरी, काहीतरी गोडधोड कर.

बजेट ( आपलेही )

लेखक असहकार यांनी गुरुवार, 31/01/2019 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
बजेट ( आपलेही ) दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या आधी दोनेक महिन्यापासून देशभरात एका गोष्टीची चर्चा सुरू झालेली असते. ती म्हणजे यावर्षीचे बजेट काय असणार, कसे असणार? कोणत्या सवलती असतील, आयकर कितीने कमी होईल? कोणत्या वस्तूंच्या किंमती कमी होतील, कशाच्या वाढतील? बजेटचा शेअरबाजारावर काय परिणाम होईल? वर्तमानपत्रापासून ते टीवीचॅनेल्सच्या चर्चांपर्यंत सगळीकडे एकच एक शब्द ऐकू येतो. बजेट. बजेट. बजेट. तर हा बजेट शब्द नेमका आहे तरी काय याचा फार थोडे लोक मागोवा घेतात. सरकारने सादर करायचा हिशोब, नवे कर लावायची घोषणा, की जमाखर्च मांडण्याची तयारी?

मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 30/01/2019 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, दिनांक २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा मराठी भाषा दिन आपण मिपावर शतशब्दकथा स्पर्धेच्या रुपात साजरा करणार आहोत. विषयाला कोणतेही बंधन नाहीये, पण स्पर्धा म्हटली की नियम आणि अटी आलेच. तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत. १. स्पर्धा १ फेब्रुवारी २०१९ रोजी ००.०० भाप्रवे सुरू होईल आणि २० फेब्रुवारी २०१९ रोजी २३.५९ भाप्रवे संपेल. २.

करायला गेलो आत्महत्या

लेखक खिलजि यांनी बुधवार, 30/01/2019 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
केलेल्या कृत्यांचा पश्चाताप म्हणून करायला गेलो आत्महत्या टाकला दोर उभा वर पंख्यांला राहत्या नव्या घरी गच्चं मारुनी गाठ दाखवणार होतो आयुष्याला पाठ घेतला गळफास तेव्हा गदागदा हलु लागले सिलिंग फुसका बार निघतोय कि काय ? याचे हळूहळू येऊ लागले फिलिंग साला , नको तो डोक्याला ताप झाला सिलिंगसकट वरचा माणूस खाली आला दोघेही उताणे एकावर एक पडलो दोघेही जागच्या जागीच मोडलो घातली बिल्डरच्या नावाने शिवी साला बिल्डर हाय कि न्हावी ?

काही नाजूक स्वप्नं...

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 30/01/2019 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
परवा सहज टीव्ही चाळता चाळता एका चॅनलवर 'कुछ कुछ होता हैं' दिसला. बास्केटबॉल कोर्टवर राहुल आणि अंजलीची बालिश अशी भांडणे सुरु होती. थोडा वेळ बघत बसलो. हा चित्रपट १९९८ मध्ये आला होता आणि तुफान चालला होता. गाणी सगळी हिट्ट झाली होती. मनात विचार आला. हा चित्रपट जर आता आला असता तर चालला असता का? सध्याच्या तरुण प्रेक्षकांची आवड आमुलाग्र बदलली आहे. आमच्यासाठी मात्र हा चित्रपट एक स्वप्न होते. त्या साली मी कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसर्‍या वर्षात शिकत होतो. 'कुछ कुछ...' मध्ये स्वपनवत वाटू नये असे काहीच नव्हते.