Skip to main content

(पाहिजे)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 02/04/2019 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा हे पाहिले आणि म्हटले आपणही जाहिरात देउनच टाकावी. ऑफिस मध्ये कामा साठी कष्टाळू मुलगा पाहिजे त्याच्या कडे स्वत:चे दुचाकी वहान असले पाहिजे गाईच्या धारा काढण्यासाठी हवा एक अनुभवी गडी गायीच्या लाथा गोड मानण्याची त्याची तयारी पाहिजे घरकामासाठी हवी आहे एक मोलकरीण घरात पडेल ते काम तिने केले पाहिजे शेतात काम करण्यासाठी मजूर हवे आहेत उन पाउस चिखलात राबण्याची त्यांची तयारी पाहिजे तसेच एक माळी, फिटर, प्लंबर, सुतार व गवंडी तसेच, हापिसात कामाला एक अनुभवी रिसेप्शनिस्ट पाहिजे वारजे किंवा सिंहगड रोड परिसरात १ किं

पाहिजे

लेखक अन्या बुद्धे यांनी मंगळवार, 02/04/2019 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
मनातले थेट लेखणीतून पाझरले पाहिजे मौनाने अक्षरातून तरी स्पष्ट बोलले पाहिजे गाईलही कधी पाखरू मुग्ध भाव मनातले एकदा देऊन कान आतुर मने ऐकले पाहिजे खडकातही कधी फुटेल कोवळी पालवी ओतून जीव रक्त घाम परी शिंपले पाहिजे भेटेल पांडुरंग आस दर्शनाची धरेल त्याला सोडून देहभान भक्तिमार्गी चालले पाहिजे साहल्यावरी तिचा दुरावा दिवसभराचा भेटण्या स्वप्नात तरी तिने आले(च) पाहिजे -अनुप

दोसतार - २०

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 02/04/2019 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : https://www.misalpav.com/node/44198
ते ऐकल्यावर सगळ्यानाच एकाच वेळेस बांध फुटावा तसे हसू फुटले . वर्गात हसण्याचा लोळ उसळला. संदीपसकट प्रत्येकजण बराच वेळ हसत राहीला. स्वतःचे हसणे संपले की शेजारच्या च्या हातावर टाळी देऊन पुन्हा पुन्हा हसत होता. या सगळ्या गदारोळात बाहेर गेलेला मंदार वर्गात पुन्हा कधी येवून बसला ते समजलेच नाही. हसून हसून डोळ्यात येणारे पाणी पुसत होतो. शाळेचा शिपाई हातात एक कसलासा कागद घेवून वर्गाच्या दारात उभा होता. सरांनी तो कागद वाचला.

अनेक गोष्टींची गोष्ट

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/04/2019 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (‘मी गोष्टीत मावत नाही’ - पद्मगंधा प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या कादंबरीचा विशिष्ट संपादित अंश.) करमणूक: आपली करमणूक करून घेण्यासाठी काय काय करता येईल माणसाला? कोणत्याही दोन देशांतील युद्धाचे टी.व्ही. ने थेट प्रक्षेपण केले तर किती भव्य करमणूक होईल शांतताप्रेमी देशातील माणसांची! अशा कार्यक्रमावर प्रायोजकांच्या नुसत्या उड्या पडतील. मग जाहिरातींचा भाव पाच सेकंदांसाठी पाच कोटी रुपये. अणुबाँम्ब टाकण्याच्या दृश्याआधीच्या जाहिरातीसाठी एका सेकंदाला पंचवीस कोटी रुपये पडतील. बोला. एक वार. दोन वार. तीन वार.

वात्सल्य

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 01/04/2019 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
सहा एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मी सकाळी साधारण १० वाजण्याच्या सुमारास दवाखान्यातून जवळच्याच बँकेत चाललो होतो. आमच्या इमारतीला लागून असलेल्या शेजारच्या इमारतीच्या भिंतीच्या लोखंडी जाळीच्या समोर एक गरिबांचे गोंडस मूल बसलं होतं. त्याच्या कडे पाहिलं तर ते मतिमंद( मंगोल) आहे हे जाणवलं. साधारण दोन वर्षाच्या आसपास वय असेल त्याचे. त्याच्याकडे पाहत असताना ते मूल उठलं आणि समोर चालायला लागलं तर त्याच्या कमरेला एक नायलॉनची दोरी बांधलेली होती. त्या दोरीमुळे त्या मुलाला ४ फुटाच्या पलीकडे कुठेही जात येत नव्हतं. एखाद्या बकरीला बांधावं तसं बांधलेलं होतं.

सहा दिवस सायकल भ्रमंती : भाग 6 : अलिबाग ते बदलापूर व्हाया मुंबई

लेखक अन्या बुद्धे यांनी सोमवार, 01/04/2019 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
19.03.2019 आज शेवटचा दिवस सफरीचा. वडखळ पासून पुढे सुरू असलेली रस्त्याची कामं आणि ट्रॅफिक मध्ये जायची इच्छा होईना. म्हणून आज रेवस जेट्टी वरून भाऊचा धक्का गाठायचं ठरवलेलं. निवांत साडेसातला उठून घर आवरून बाहेर पडायला साडे आठ झाले. मोगलीला काही खरेदी करायची होती. म्हणून त्याला म्हटलं मी पुढे जातो. तू पकडशीलच मला. आणि हो फफे पेढे विसरू नको. इथून रेवस 24 km. बर्याच दिवसांनी सपाट आणि खड्डे विरहित रस्ता मिळाला होता. 3-6 ने निघालो. झकास वेग मिळाला. अजून ऊन त्रासदायक झालं नव्हतं. हवेत किंचित गारवा होता. एकेक गावं झरझर मागे पडत होती, किहीम, झिराड, मांडवा.

मोकलाया दाहि दिश्या - एक भावार्थ सुडंबन

लेखक चामुंडराय यांनी सोमवार, 01/04/2019 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
मोकलाया दाहि दिश्या - एक भावार्थ सुडंबन आजपर्यंत मिपाकरांनी एखाद्या लेखाचे किंवा कवितेचे विडंबन वाचले असेल किंवा केले देखील असेल. विडंबन म्हणजे एखाद्या प्रसिद्ध साहित्यप्रकाराचा निरागस (किंवा खोचक) विनोद निर्मितीसाठी केलेला व्यक्रोक्तिपूर्ण उपहास. विडंबन हे मूळच्या गंभीर विषय आणि शैली असलेल्या लेखन किंवा कविता अशा साहित्यप्रकाराचे करतात. मात्र मुळातच विनोदी आणि टवाळखोर पद्धतीने लिहिलेल्या एखाद्या कलाकृतीचे जी स्वतःच विडंबीत आहे अशा साहित्यिक प्रकाराचे सुडंबन करता येईल का?

दगड - कथा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी रविवार, 31/03/2019 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
दगड ---------------------------------------------------------------------------------- उजाडलं होतं, माणसांची वर्दळ सुरू झाली होती. ती भिकारीण पडल्या जागेवर उठून बसली . तिने आजूबाजूला नजर फिरवली.तिच्याही पोटात आग पडली होती. रात्रीपासून खायला काहीच मिळालं नव्हतं ते एक गाव होतं. लोक शेतावर निघाले होते. गुराखी गुरं घेऊन चरायला निघाले होते. कोणी दुधाचे कॅन मोटर सायकलला अडकवून डेअरीवर निघाले होते. म्हातारी माणसं पारावर बसून तंबाखू चोळत गावच्या राजकरणावर चर्चा करत होती. भाविक देवळाकडे निघाले होते. पोरं-सोरं दप्तरं अडकवून टिवल्या-बावल्या करत शाळेला निघाली होती.

सहा दिवस सायकल भ्रमंती : भाग 5 : हरिहरेश्वर ते अलिबाग

लेखक अन्या बुद्धे यांनी रविवार, 31/03/2019 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
18.03.2019 आजचा पल्ला या सफरीत सगळ्यात मोठा असणार होता. 110 km. या आधी 81, 105, 99, 98 असे टप्पे करून झालेले होते. रस्त्याची दूरावस्था आणि सतत चे चढ उतार आणि दुसरं म्हणजे सायकल ला हेड/टेललाईट नाहीत म्हणून साडेसहा नन्तर सायकलिंग नाही या मुळे 110 पूर्ण करून अलिबाग मध्ये पोचता येईल की नाही याबाबत साशंक होतो. म्हणून काल रात्री 7 आसपासच काशीदमध्ये 'पेमेंट ऑन आराइवल बेसिस वर' रूम बुक केली होती. त्या नंतर रात्री मोगलीशी फोनवर बोललो. त्याच अलिबागमध्ये घर आहे. मी येतोय एवढ्यासाठी तो लॉन्चमध्ये बाईक टाकून अलिबाग मध्ये येणार होता. 'काशीद अलिबाग अगदी जवळ आहे. मला काही सांगू नको.