सोबती
मनापासून बोलतो
मनापासून ऐका
वागावे कसे माझ्याशी
फिटतील सर्व शंका
चाललो पुढती तरी
त्यात ना अर्थ काही
नका येऊ मागुती
मी कुणी नेता नाही
तुम्ही पुढे मी मागे
चित्र असे दिसले जरी
मी नव्हे अनुयायी
गोष्ट ही आहे खरी
रहा आसपास माझ्या
मार्ग चालू सोबतीने
परस्परांचे मित्र होऊ
जोडुनी आपली मने
-अनुप
मिसळपाव
साहित्य:
पाव किलो - बारीक रवा
मीठ - 1/2 टी स्पून
खायचा सोडा - 1/4 टी स्पून
तेल - 1 टीस्पून
पुर्या तळण्यासाठी 1 टेबलस्पून तेल
पाव किलो रव्यापासून 42 पुऱ्या झाल्या
कृती:
रवा, मीठ, सोडा आणि तेल मिक्स करून थोड थोड पाणी घालुन पीठ घट्ट मळुन घ्या. हे पीठ एका भांड्यात झाकुन अर्धा तास झाकुन ठेवा.