(उष:काल)
पेरणा अर्थात
हळू हळू एकेक करत
उलगडत चालले आहे...
ज्याच्याकडे पहात पहात
आम्ही आमचे मार्ग शोधायचो
तो तारा आता कितीतरी
मागे पडला आहे
आणि तो एकुलता एक चंद्रही...
ज्याची स्वप्नं दाखवत दाखवत
आईने दुधभात भरवला
दररोज नव्याने प्रकाशमान होणार्या सत्याला मी
तर्काच्या कसोटीवर जोखत राहतो
आणि मनातल्या मनात विचार करत रहातो
उद्या कोणती नवी जाणीव उलगडेल !
आज सकाळी डोळे उघडले
तर ते समोरचे हिरवेकंच झाड
मोहराने गच्च बहरले होते
त्याचा मंद सुवास आसमंत दरवळत होता
आता लवकरच ते मधुर फळांनी लगडलेले असेल
या विश्वाच्या पासार्यातली एकेक
मिसळपाव