Skip to main content

कर्मसिद्धांत , आस्तिक आणि नास्तिक

लेखक nishapari यांनी मंगळवार, 14/05/2019 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
आस्तिक विरुद्ध नास्तिक , देव आहे किंवा नाही ह्याबाबत वेगवेगळी मतं मांडणारा वाद मिपाला नवीन नाही . कर्म सिद्धांतावरही 2 - 4 फार सुरेख चर्चा असलेले जुने धागे या साईटवर मिळाले . माझ्यामते निदान सुशिक्षित लोक तरी देव आहे का नाही , कर्मसिद्धांत - चांगल्यावाईट कर्मांची फळं मनुष्याला या जन्मात किंवा पुढील जन्मात भोगावी लागतात , मुळात पुनर्जन्म असतो का नसतो , स्वर्ग नरक नावाच्या गोष्टी खरोखरच असतील का , मृत्यूनंतर काय प्रोसेस असते , पुनर्जन्म असेल तर तिथे आपल्या मत - इच्छेला काही महत्व असतं का की जिथे पाठवतील तिथे मुकाट्याने जावं लागतं यापैकी थोडे तरी विचार कधी ना कधी स्वतःशी करत असावेत .

झुंबर

लेखक नूतन यांनी सोमवार, 13/05/2019 19:14 या दिवशी प्रकाशित केले.

(प्रार्थना!)

लेखक गड्डा झब्बू यांनी सोमवार, 13/05/2019 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
(मनमेघ यांची क्षमा मागून) स्वामि भेटो वा न भेटो येऊ दे हे मागता आतला मराठी माणूस माझ्या नित्य राहो जागता । लिहितो कुठल्या दिशेला हे न उमगे ज्या क्षणी एक ही साधी कसोटी नं आठवो लिहिताक्षणी दुःख वाचका देउनी सुख नं लाभे लेखका।। हासता यावे मला पाहून मिपाकरांना सुखी भावना माझी नसो सहवेदनेला पारखी या विचारांना कृतीही येऊ दे मज जोडता ।। कोण मी? हा प्रश्न राहो सारखा माझ्या मनी काय नाते या मिपाशी? हे असावे चिंतनी आरसा बघतो तसे जग येऊ दे मज पाहता ।। प्रेरना-प्रार्थना!

वर्डप्रेस की ब्लॉगर? कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी योग्य आहे?

लेखक onlinetushar यांनी सोमवार, 13/05/2019 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग/वेबसाईट तयार करण्यासाठी ऑनलाईन अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. यात वर्डप्रेस व ब्लॉगर हे सर्वाधिक वापरले जातात. अनेकांना प्रश्‍न पडतो की फ्री उपलब्ध असणारे ब्लॉगर न वापरता वर्डप्रेस का वापरावे? सुरवातीला मला देखील हा प्रश्‍न पडला होता. याविषयी मी माझ्या ब्लॉगवर लिहलेला लेख इथं 'मिसळपाव'च्या वाचकांसाठी पुन्हा प्रकाशित करत आहे. वर्डप्रेसचे ही दोन प्रकार आहेत. १. wordpress.com २. wordpress.org यापैकी पहिले वर्डप्रेस हे एक प्रकारे ब्लॉगर सारखेच आहे. दुसरे वर्डप्रेस ओपन सोर्स आहे.

एकच वादा...कोहली दादा

लेखक चिनार यांनी सोमवार, 13/05/2019 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
कोहलीचा सकाळी सकाळी "टीम इंडिया मिशन २०१९" या व्हाट्स ऍप ग्रुपवर मॅसेज, "पोट्टेहो, आयपीएल संपली. आता नाचगाने बंद करा सायचेहो. उद्या सकाळी पाच वाजता मले सारे मैदानात पाहिजे..." तिकडून विजय शंकरने लगोलग अंगठ्याची स्मायली पाठवून दिली. केदार जाधवचा पण लगेच रिप्लाय..."हाव भाऊ..येतो" बाकी कोनीच अजून मॅसेज वाचला नाही हे पाहून कोहली चिडला. "मॅसेजही वाचून नाही राहिले ना पोट्टे.... माया दिमाग खराब करू नका" "भाऊ चिडू नका भाऊ...मी उठवतो साऱ्यायले..", केदार जाधव स्क्रीनवर रोहित इज टायपिंग असा मॅसेज दिसतो. "भाऊ..ते बघा..रोहित उठला वाट्टे.." "अन बाकीचे?...झोपूनच राहा लेकहो..

धूपगंध (३)

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 13/05/2019 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
पंच तुंड रुंड माळधर पार्वतीश आधी नमीतो विघ्न वर्ग नग भग्न कराया विघ्नेश्वर गणपतो मग तो.... मागील दुवा https://www.misalpav.com/node/17685 ( मित्रानो क्षमा असावी. खूप मोठ्या काळानंतर पोस्ट करतोय.

बहावा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी रविवार, 12/05/2019 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
बहावा -------------------------------------------------------------------------------------- घोस लगडले सोनसळी मन खुलते या तरुतळी वसंताची बहार ही झाली टपोर मनकळी की पांघरला पिवळा शेला की सोनसाज याला केला रूप देखणे याचे वरती सोन झळाळी तो करतो कसा नजरबंदी सोनपिवळी गारुड धुंदी सय कवळ्या प्रेमाची देई शहाणा कवळी ----------------------------------------- बिपीन

सोनसंध्या

लेखक इरामयी यांनी रविवार, 12/05/2019 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
नाजूक, हळूवार गुलाब पाकळ्या संथ, शांत, तरंगत येतात जवळ, हलकेच् माझी सुन्दर रेशमी त्वचा नितळ, मऊशार, निरागस दुधासारखी छोटं का असतं सौदर्य? का बोलावं लटीकं फुकाफुकी? सुन्दर क्षण नाहीत निसटत कधीच गळून पडतात त्या आठवणी आणि ध्यास भाबड्या स्वप्नांचे मी बसूनच असते पाय सोडून पाण्यात, माश्यांशी खेळत ओंजळी ओंजळीने त्याच्या बांसुरीचे स्वर का बरं खुणावतात? आणि काय बरं सांगत असतात... हळूवार - ओठाओठी? मग पाणी होत जातं सोनेरी आणि आकाश होतं वही चित्रकलेची पावलं परतत असतात, वाळू उडत असते मी डुंबत असते, स्तब्ध नि:शब्द आनंदी तंद्रीप्रदेशात लांब कुठूनची मंद वार्‍याची झुळूक सुखावते सर्व जाणिवा मी रहाते तशी
काव्यरस

Relaxed Attentive

लेखक अन्या बुद्धे यांनी रविवार, 12/05/2019 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
थोडं मुक्तचिंतन करायचा प्रयत्न करतोय. मॅट्रिक्स सिनेमात मॉर्फियस निओ ला मार्शल आर्ट शिकवताना सांगतो, 'Don't try to hit me, and hit me!' सिनेमा बघितल्यापासून त्यातली अनेक वाक्य जी समजायला अवघड आहेत असं वाटलेलं त्यापैकी हे एक. अनेक वाक्य दरवेळी नव्याने अधिक उलगडत जातात. हे त्यातलंच एक. किंवा कॅरम खेळणाऱ्या तरबेज लोकांचा खेळ बघणं पर्वणी असते. त्यांचा गेम प्लॅन, स्ट्रोक्स च नियंत्रण वगैरे गोष्टी आकर्षक असतातच पण मला मोहात पाडते ती गोष्ट थोडी वेगळीच. अनेक वर्षांच्या गॅप नंतर कॅरम खेळायला सुरवात केल्यावर काही काळाने बरी पकड आली खेळावर. अनेकदा अवघड सोंगट्या पण हुकमी घेता येऊ लागल्या.