Skip to main content

शोधत होतो पुन्हा स्वत:ला

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 17/06/2019 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
शोधत होतो पुन्हा स्वत:ला उपसत होतो पुन्हा पुन्हा मी पुरातनाची प्रचंड पडझड परंपरांची अपार अडगळ शोधत होतो अथक स्वत:ला ऐकत होतो पुन्हा पुन्हा मी वर्तमान हतबल करणाऱ्या भवितव्याचे भीषण पडघम ऐकत होतो अधीरपणाने माझीच अनोळखीशी चाहूल कळून चुकला पुन्हा, स्वतःचा शोध विफल ठरण्याचा संभव
काव्यरस

ती म्हणाली " चिमणी " , मी म्हणालो भुर्रर्रर्र

लेखक खिलजि यांनी सोमवार, 17/06/2019 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
ती म्हणाली " चिमणी " मी म्हणालो भुर्रर्रर्र ती म्हणाली " कावळा " पुन्हा उत्तरलो भुर्रर्रर्र आलतूफालतू उत्तरं देऊन आमचं प्रेम झालं सूर्रर्रर्रर्र लक्षात ठेवून होतो चांगलंच गुढघ्यात असते अक्कल डोकं बाजूला ठेऊन काम होतंय थोडीच पाहिजे शक्कल कशाला करावा अभ्यास ? कशाला हवी ती नोकरी ? कुणी सांगितलंय घासायला पटवावी श्रीमंत बापाची छोकरी सासरा बिचारा राबेल कन्या भोळीच असेल होऊन जायचं घरजावई आपोआप झोळी भरेल {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
काव्यरस

वॉल्डन....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 17/06/2019 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक - - अभिषेक धनगर आपले जीवन किती का क्षुद्र असेना? त्याला सामोरे जा आणि ते जगा. त्याच्यापासून तोंड वळवून दूर जाऊ नका; आणि त्याला नांवेही ठेवीत बसू नका. जीवन कसेही असले तरी तें काही तुमच्या आमच्या इतके खचित वाईट असत नाही.[१] हेन्री डेव्हिड थोरो हेन्री डेव्हिड थोरो हा प्रख्यात अमेरिकन लेखक आणि विचारवंत. मागील वर्षी त्याच्या जन्माला दोनशे वर्षे पूर्ण झाली. उणेपुरे ४५ वर्षांचे आयुष्य थोरोच्या वाट्याला आले. मात्र त्यानंतरच्या दीड शतकावर थोरोच्या विचारांचा अमीट ठसा उमटला आहे. काळ लोटेल तसे त्याच्या विचारांचे महत्त्व अधिकाधिक सुसंगत ठरत आहेत.

'तेरी केहॆके लुंगा' भाग 2

लेखक वरुण मोहिते यांनी रविवार, 16/06/2019 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
ऍडमिट झाल्यावर रेक्टरनी घरी कळवले. काळजी घ्यायला मित्र होते. आई रेक्टर ला फोन करून बोलली की मी 6-7 दिवसांनी येते. तो पर्यंत त्याच्या मावस भावांना पाठवते. दुसऱ्या दिवशी भाऊ हजर. जास्त कोणाला सांगू नका ही ताकीद मी दिलेलीच. पाहिले काम त्यांनी केले न्हावी आणि फेस मसाज वाल्याला बोलावले. जरा बरा दिसायला लागलो मी. डोक्यात राग बराच होता इकडे हिचा भाऊ आणि त्याचे 4 मित्र लपून बसलेले . काही खबर नव्हती. हेयर लाईन क्रॅक आणि जखमा भरून निघाल्यावर आठवड्या नंतर डिस्चार्ज मिळाला. इकडे वेगळेच नाटक रंगले होते. ज्युनियर आणि सिनियर चे.

गाडीची देखभाल; काही उपयुक्त टिप्स!

लेखक उपयोजक यांनी रविवार, 16/06/2019 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
ही पोस्ट मिलिंद भिडे,भिलाई नगर,छत्तीसगढ़ यांची आहे.त्यांच्या परवानगीने इथे देत आहे.पुढील मजकूर त्यांच्याच शब्दात: नमस्कार मंडळी, पावसाळ्याचे आगमन आता केव्हाही होईल म्हणून आपले,मुलांचे,कुटुंबियांचे रेनकोट शोधून स्वच्छ करून ठेवलेच असतीलच. आपल्या दुचाकी वाहनांकरिता कव्हरही शोधून ठेवले असतील किंवा विकत आणायची तयारी केलीच असेल. हे सगळे करत असताना आपल्या कारचं सर्व्हिसिंग ही केलं असेल.सर्व्हिसिंग म्हणजे फक्त वरवर धुणे नाही.तर जिथे जिथे धूळ,माती जमली असेल किंवा जमायची शक्यता असेल, त्या सर्व जागा एकदा पावसाळ्याआधी नीट स्वच्छ करून घ्याव्यात नंतर कार सर्व्हिसिंगला घेऊन जावी. सर्व्हीस सेन्टरला पोहोचल

नवीन सायकल घ्यायची आहे

लेखक राहुल करंजे यांनी रविवार, 16/06/2019 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार सर्वांना.... माझे वय 27 आहे, उंची 5फूट 6इंच आहे, वजन 88 किलो आहे, धावपळीच्या आयुष्यात शरीराकडे दुर्लक्ष झाले, डायट पाळता येत नाही , व्यायामाला वेळ मिळत नाही . त्यामुळे सायकल घ्यायचा विचार करतोय,घर ते ऑफिस 4 किलोमीटर अंतर आहे, सुट्टीच्या दिवशी फिरायला आवडते त्यामुळे 40ते 50 किलोमीटर होईल... म्हणून जे या प्रकारामध्ये तज्ञ आहेत त्यांना विनंती आहे की मार्गदर्शन करावे, अनुभव सांगावे... सायकल कुठली घ्यावी, कशी घ्यावी?? बजेट 8000-12000 आहे...घेताना आणि घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी?

एका बापाचा जन्म

लेखक चंद्र.शेखर यांनी शनिवार, 15/06/2019 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा आयडी घेतल्यावर प्रथमच लिखाण पोस्ट करतोय. लिहायला नुकतीच सुरुवात केली आहे, सुचना/मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच उपयोगी ठरेल) “मने, काय पसारा केलायसं एवढा ?” ऑफिस मधून घरी आल्या आल्या फरशीवर पडलेली खेळणी, चित्रकलेचे पेपर, रंग आणि कागदाचे असंख्य कपटे बघून नेहमीप्रमाणे माझा पारा चढला. मनू मला दाखवण्यासाठी म्हणून तिने चितारलेलं चित्र घेवून माझ्याकडे येत होती, ती माझा चेहरा बघून तिथेच थबकली. चेहरा पडला तिचा, मग मी सुद्धा ओशाळलो अनं जवळ घेतलं तिला.

वटवटसावित्री

लेखक खिलजि यांनी शनिवार, 15/06/2019 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
हे देवी वटसावित्री मी पण पूजेन तुला लपून छपून फेरे घेईन उद्या पौर्णिमेच्या रात्री माझे सर्व काळे धंदे अव्याहतपणे चालू देत सदैव कधी नजरेत येऊ नको देउ तिच्या नाहीतर होतील माझे वांदे मी साधाभोळाच राहू देत तिच्यासाठी फार कठीण गं , झेलणं तिला ती आहे एक सुशील गृहकृत्यदक्ष पण दुर्दैवाने वटवटसावित्री वटवट करूनच मारते माझ्या नावाने फेरे नेहेमी मागते देवाकडे मिळू देत याचे सर्व धागेदोरे इतकी वर्षे लोटली कळला नाही तुझा महिमा आज तुला मी शरण जातो बघ थांबव माझी दैना सूत घेऊनि, दिवा लावेन रोवेन मी पण एक फांदी पानसुपारीची व्यवस्था व्हावी जेणे होईल माझी चांदी हे वर

म. सु. पाटील : उत्तुंग समीक्षक आणि माणूस

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 15/06/2019 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे दिनांक 31 मे 2019 ला रात्री अकरा वाजता म. सु. पाटील सर उर्फ बाबा यांचं निधन झालं. ही दु:खद बातमी समजताच सरांशी झालेल्या पहिल्या भेटीपासून तर आतापर्यंतच्या त्यांच्या समग्र आठवणी अगदी कालच घडल्यासारख्या मनात सहज तरळून आल्या. म. सु. पाटील सरांशी माझी पहिली प्रत्यक्ष भेट मनमाडला 1985-86 च्या दरम्यान झाली. (त्या आधी सरांशी आणि पुपाजींशी मी आठवीत असतानापासून पत्रसंवाद होता. ‘अनुष्टुभ’ नियतकालिकामुळे.) मनमाड महाविद्यालयात सर प्राचार्य होते. त्यांच्या निरोपानुसार त्या रविवारी सटाण्याहून डॉ. मोहन माजगावकर दादा आणि आम्ही काही मित्र (प्रा. शं. क. कापडणीस, डॉ. एकनाथ पगार, डॉ.

खाण्यासाठी जन्म आपुला २ : बाजार आमटी खिलवणारं महावीर व्हेज

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 15/06/2019 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या पाककृती विभागाचा परिचय करून देतांना मालकांनी लिहिलंय "शेवटी सगळी धडपड आणि कष्ट हे सुखाच्या दोन घासांकरताच तर आहेत! मग ते दोन घास खमंग आणि चवदारच असले पाहिजेत! " अगदी खरंय म्हणा हे खाल्लेले दोन घास काअसेना, ते परिपूर्ण असले तर जेवणाला अजून लज्जत येते. खाण्यासाठी जन्म आपुला या हि उक्ती कृतीत उतरवण्याची माझी कायम धडपड असते, त्यामुळे पुण्यनगरीत आल्यापासून इथले वेगवेगळ्या चवीचे पदार्थ चाखणं मस्ट असते आणि वेगळं काय खायला मिळेल याच्या शोधात असतो.