Skip to main content

झरझर झरझर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 23/07/2019 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
झरझर झरझर झरणाऱ्या कातरवेळी मुलीला घेऊन मुलाने खेळायला जाऊ नये... तिचे धावते पाय थबकतात, घरातच विलांटी घेऊन मैदानाकाठचे गवत डोळ्यांनी खुडत राहतात...

वाईच्या कृष्णाबाई उत्सवाची माहीती कायप्पावरुन साभार

लेखक जालिम लोशन यांनी सोमवार, 22/07/2019 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
उत्सव बालपणीचा मीरा फाटक माझे बालपण वाईमध्ये गेले. वाई हे कृष्णाकाठी वसलेले तालुक्याचं गाव. गाव लहान असले तरी जुने आणि इतिहास असलेले. शाळेत ’माझे गाव’ निबंध लिहिताना कृष्णा नदी, नदीवरील घाट यांचा उल्लेख यायलाच पाहिजे असा बाईंचा आग्रह असायचा. पण तो का यायला पाहिजे हे मात्र खूप उशिरा कळले. मी जेव्हा प्रथम पुण्याला गेले आणि तिथली घाटाशिवाय ओकीबोकी दिसणारी नदी पाहिली तेव्हा कसेतरीच वाटले. मग कळाले, बहुतेक नद्यांना घाट नसतातच! म्हणून आमच्या घाटांचे अप्रूप! पण फक्त घाट हेच काही आमच्या कृष्णेचे वैशिष्ट्य नाही, आणखीही काही आहेत.

युगांतर आरंभ अंताचा भाग ६ व ७

लेखक मृणालिनी यांनी सोमवार, 22/07/2019 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रह्मदेवांचा क्रोध ! ज्यामुळे त्यांनी स्वपुत्री मृत्यूलोकात धाडली ! देव - देवतांना भोगाव्या लागलेल्या या शापप्राप्त यातनांच्या अग्निकुंडात बळी पडला अजून एका अप्सरेचा! अद्रिका! मृत्युलोकी मस्य रुप धारण करण्याचा ब्राह्मदेवांचा शाप भोगण्यासाठी ती धरेवर अवतरली. धरेवरून पहटेच्या काषायवर्ण सुर्यदेवांचे रुप पाहून तिला मनोमन आनंद झाला. सुर्यदेवांचे प्रतिबिंब यमुनेच्या जलप्रतलावर पडलेले होते. नदी प्रवाहावर येणाऱ्या अलगद लाटांनी त्या प्रतिबिंबाला अस्थिर करत सर्व जलास केशरी छटा दिली होती. सुर्यदेवाच्या त्या लोभस रुपाकडे पाहत अद्रिकेने नमन केले आणि यमुनेच्या जलप्रवाहात प्रवेश केला.

रात्र थोडी..

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 22/07/2019 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
"अब बोल भी कुत्ते" चकचकीत रिवॉल्व्हर माझ्या छाताडावर रोखत तो उग्रपणे म्हणाला. अशावेळी भल्याभल्यांची फाटते. नव्हे फाटायलाच पाहिजे. कपाळावर घाम जमा होतो. आणि भरपूर तहान लागते. "आपण बस यहापे पिक्चर देखने आया था" नुकताच मारलेला गांजा अशावेळी कामाला येतो. "मुझे नही लगता.." रात्रीच्या एक वाजता हा माणूस गॉगल घालून बोलतोय. हि गोष्ट खरं बघितलं तर डोक्यात तिडीक जाणारी आहे. "ये सुलेमान का आदमी है साब.." जीपमध्ये बसलेला लुकडा हवालदार माझ्याकडे हात दाखवत जोरात म्हणाला. खरं तर तिथे दोन हवालदार होते. दुसरा मिशावाला होता. जाडजूड. बहुतेक त्याला झोप वगैरे आली असावी. "गांजा तो हम भी पीते है.

युगांतर - आरंभ अंताचा भाग ४ व ५

लेखक मृणालिनी यांनी रविवार, 21/07/2019 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वेला लाली शिंपडत पहाट हरित तृणांवर दवाचा वर्षाव करू लागली. पक्षांनी किलबिलाट सुरु केला आणि हस्तिनापुर नगराला जाग आली. महालात दास-दासींचा वावर चालू झाला. महाराज दास महराजांच्या कक्षेत फलाहार घेऊन गेला. पण महाराज तिथे होतेच कुठे? संपूर्ण रात्र अस्वस्थपणामुळे जागा राहिलेला शंतनू. तिचे रूप, डोळे, लाघवी हास्य त्याला बोलवत होते. तो तरी कसा थांबवू शकणार होता स्वतःला? शंतनूचा रथ नदीतटावर थांबला. सुर्यदेव अंबरात पसरलेल्या लाल रंगावर केशरी-पिवळ्या रंगाचे लेपन करत होते. नदी प्रवाहात त्याचे पडणारे प्रतिबिंब, हवेतला आल्हाददायक गारवा, अंबरातली केशरी रंगाची उधळण....

युगांतर - आरंभ अंताचा! भाग २ व ३

लेखक मृणालिनी यांनी रविवार, 21/07/2019 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
वशिष्ठ मुनींच्या आश्रमात एकच गोंधळ माजला होता. त्यांची आवडती गाय नंदिनी नेहमीच्या स्थानी दिसत नसल्याने ऋषीमुनी हैराण झाले होते. रानात, डोंगरावर, नदीकाठी, झाडाजवळ, सर्वत्र परिचित ठिकाणी शोधणे व्यर्थ ठरले. नंदीनी कुठेच नव्हती. वशिष्ठ ऋषींच्या मनात कोलाहल माजला. शेवटी ते ध्यान लाऊन बसले. आपली दिव्य-दृष्टी जागी करत त्यांनी नंदिनीला शोधायला सुरवात केली... क्षणातच त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. नंदिनी हरवली नव्हतीच! वशिष्ठ ऋषींच गोधन खुद्द प्रभास नामक एका वसूनेच पळवून नेलं होतं. एव्हडच नव्हे!

आंतर जालावरच्या स्वामित्वहक्क आणि कायदेशीर कारवाई

लेखक एकुलता एक डॉन यांनी रविवार, 21/07/2019 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्ते मराठी आंतरजाल सुरु झाले अंदाजे २० वर्ष आधी गेल्या १० वर्षात कायम कुठे ना कुठे बघतील कि मराठी मध्ये कॉपी पेस्ट होते आहे ,लेखक ओरडताय ह्या निम्मिताने काही प्रश्न १ आत्तापर्यंत कधी काही कार्यवाही झाली व चोरी थांबलीय ? २ कॉपी पेस्ट बंद व्हावे म्हणून काय काय उपाय केले तसेच २ खास घटना नमूद कराव्या वाटत आहे १ Delhi high court allowed Delhi University to issue photocopies of major textbooks published by leading पुब्लिशर्स https://timesofindia.indiatimes.c

हिमा दास... भारताची 'ट्रॅक अँड अ‍ॅथलेटिक्स' सुवर्णकन्या

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 21/07/2019 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट म्हटले म्हणजे भारतीय वेडे होतात... आणि क्रिकेट वर्ल्ड कप म्हणजे तर बेभान होऊन इतर सर्व विसरण्याची वेळ. मात्र, या वेडामुळे भारतात इतर खेळांकडे आणि खेळाडूंकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. याचे उत्तम उदाहरण नुकतेच घडून गेले आहे. उणेपुरे १९ वे वर्षे चालू असलेल्या (जन्म ९ जानेवारी २०००) असलेली हिमा दास ही आसाममधील एका सामान्य शेतकर्‍याची मुलगी आहे. डाळ-भात असे सर्वसामान्य जेवण, कोणतीही न्युट्रिशन किंवा प्रोटीन सप्लिमेंट्स परवडणारी नव्हती. स्वस्तातले बूट वापरून ती भाताच्या शेतात धावण्याचा सराव करत असे.

लढली अशी कि ती जणू झुन्जीतच वाढली

लेखक खिलजि यांनी शनिवार, 20/07/2019 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
तृण वेचून खोपा बांधला वर्तीकेने इवलासा संसार थाटला शस्य शोधावया नर भ्रमणास जाई जननी आगंतुकांच्या सोहळ्याची वाट पाही कालानुपरत्वे सोहळे झाले खोप्यामध्ये इवलेशे जीव आले किलबिलाट उपवनी माजे काकांची मत्सरी ईर्ष्या जागे चिऊ सज्ज रक्षणास ठाकली झुंज नाही सोडली लढली अशी कि ती जणू झुन्जीतच वाढली निष्ठुर काक नि ती इवलीशी पिल्ले घरट्यावर त्यांनी सुरु केले ते हल्ले जननी उभी सरसावुनी चोच , चोचीला अशी काही धार जी चढली पडली धडपडली पण लढली अशी कि काकांवर जणू विद्द्युल्लता कडाडली पिल्लांच्या रक्षणास चिऊ सरसावली धूर्त नजरांस नजर भिडवुनी इवलेशे ते पंख फडकावूनी वीरांगना एक

खाजगी मंदिरे की उर्मटपणा चे अड्डे?

लेखक शान्तिप्रिय यांनी शनिवार, 20/07/2019 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्र मैत्रिणींनो .अतिशय मोठ्या कालखंडानंतर मिपावर लिहीत आहे. सर्व कसे आहात? कंकाका यांचेशी मी अधून मधून संपर्कात असतो. मिपावर फोटो चिकटवणे ही खूप किचकट प्रक्रिया आहे म्हणून थोडा कंटाळा करत होतो.या लेखात फोटो असण्याची गरज नाही हा भाग वेगळा. फोटोसाठी काही युक्त्या कंकाका यांनी सांगितलेल्या आहेत त्या करून पाहतो.असो ....आता लेखाच्या विषयाकडे वळूया. खाजगी मंदिरे हा एक अतिशय भयानक प्रकार अलीकडेच पुण्यात पाहिला.