Skip to main content

आत्तोबा

लेखक लोकेश तमगीरे यांनी रविवार, 04/08/2019 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
७५ वर्षाचा माणूस म्हंटल्यावर साधारणतः आपल्या डोळ्यांसमोर काय चित्र उभे राहते हो ? ... ज्याचे दोन्ही गुडघे झिजले आहेत आणि कंबर, पाठदुखी, मानदुखीमुळे जो दिवसाचा ८०% वेळ घरात आराम खुर्ची किंवा बिछान्यावर घालवत आहे. कधी बाहेर काम पडलंच तर लगेच ड्रायव्हरला घेऊन चार-चाकी गाडी मध्ये फिरणारा, स्वतःची सर्व वैयक्तिक कामे दुसऱ्यांच्या मदतीने करून घेणारा, डायबिटिज, हायपरटेन्शन, आर्थराइटिस इ. रोगाने ग्रस्त आणि म्हणून मरणाची सतत चिंता करणारा, किंवा रीटायरमेन्ट होऊन घरी आरामात आयुष्य काढणारा.. पण मी ज्यांना २ वर्षांपासून बघत आलो आहे ना त्यात वर वर्णिल्याप्रमाणे काहीच नाही.

निवेदन

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 04/08/2019 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मित्रो गेल्या काही धाग्याना मिळेलेला अत्यल्प प्रतिसाद बघता मी मी पा वर धागे गुंफणे थांबत आहे आता पयंत आपण प्रतिसादाच्या रूपानं माझ्यावर प्रेम केले त्या बद्दल धन्यवाद माझे लेखन वर गेलो असताना मी ३५०च्या वर धागे गुंफल्याचे मला आढळले -मला वाटते इतक्या संख्येने सातत्याने लिहिणारा मी एकमेव सदस्य असावा वास्तविक कारखानदारी फ्याक्टरी सारख्या रुक्ष वातावरणात वावरत असताना हि मी पा मुळे मी लिहायला शिकलो शृंगार काव्य लेख कथा असे अनेक प्रकार हाताळले मी पा माझे आवडते संकेत स्थळ आहे मी पा च्या वाटचालीस आमच्या शुभेछया ज्याकालीन चित्रे एक अधोविश्वातली तरल प्रेमकथा च अर्धवट लेखन झाले

चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ३ : देओरीया ताल - बनियाकुंड

लेखक आकाश खोत यांनी रविवार, 04/08/2019 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या दिवशीचा वृत्तांत व्हिडीओद्वारे अनुभवण्यासाठी युट्युबवर जा : Chopta Chandrashila Trek | Part 3 | Deoria Tal to Baniya Kund आणखी व्हिडीओस बघण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राइब करा. या आधील वृत्तांत वाचा या ठिकाणी : चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : १ : हरिद्वार चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : २ : हरिद्वार - सारी - देओरीया ताल --- आदल्या दिवशी ३-४ किमीचा पिटुकला ट्रेक करून आमचा दिवस नंतर मजेत गेला.

कृष्णछबी

लेखक मायमराठी यांनी शनिवार, 03/08/2019 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णास एकदा कृष्ण सापडेना, दर्पणी पाहता छबी दिसेना, प्रकाशी चालता सावली दिसेना, उरला फक्त शरीराचा भास, मनाचाही थांग लागेना, "पाहिले का मज कोणी?" पुसे असा तो भक्तांना, "देवा, नित नवी लीला आपली, आम्हांस काही कळेना." बसला मग ध्यानास तो, वृत्तींचा लय काही होईना, तिन्ही लोकी निरोप धाडियेलें, देव गण गंधर्वांसही काही समजेना, एके पहाटे दिसे स्वप्नात तो स्वतःला, " तुझा तुझ्यावर हक्क नसे, हे तुला कसे उमजेना? तुझे अस्तित्व भक्तांच्या कणांकणांत, तिकडे मीरा न उरली तिच्यात, इकडे तुला तूच गमेना, मीरा होई कृष्णमय, इथे तुझ्यातला तू मावेना, भक्तांमध्ये देव हरतो,जिरतो, उरतो एक संपूर्ण भक्त, तिथेच पूर्तता तुझ्य

नायगारा-निसर्ग शक्तीचा एक सुंदर अविष्कार

लेखक अभिजित भिडे यांनी शनिवार, 03/08/2019 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
जशी काही लोक आपल्याला जन्मजात सुदैवी वाटतात त्याचप्रमाणे जर सुदैवी देशांची यादी केली तर अमेरिकेचा पहिला क्रमांक लागावा. अमेरिकेवर देवाने जरा जास्तीच कृपादृष्टी ठेवली आहे. विपुल नैसर्गिक संपत्ति, उराशि स्वप्ने बाळगून नशीब आजमावयाला जगभरातून आलेले उच्चशिक्षित मनुष्यबळ आणि त्या ओघाने आलेली आर्थिक राजकीय आणि लष्करी महासत्ता. हे कमी म्हणून की काय निसर्गानेही सौंदर्याबाबतीत सुद्धा काहीही हातचे राखून ठेवलेले नाही‌. नाही तर नायगारा आणि ग्रँड कॅनियन ही दोन नैसर्गिक जागतिक आश्चर्ये एकट्या अमेरिकेत नसती. तर अशा या अमेरिकेला ऑफिसच्या कामानिमित्याने जायचा योग आला आणि सुदैवाने दोन विकेंड पण मिळाले.

युगांतर - आरंभ अंताचा भाग १९

लेखक मृणालिनी यांनी शनिवार, 03/08/2019 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १९ हस्तिनापुरात पंडु स्वयंवर जिंकून कुंती सोबत आला. गुलाबपाकळ्यांच्या वर्षावात महालात त्यांनी प्रवेश केला. "तातश्री!" "महाराज पंडु! स्वागत आहे महाराणी कुंती" पंडु आणि कुंतीने भीष्मांना नमस्कार केला. "अनुज..." हास्य मुखाने धृतराष्ट्र आवाजाच्या दिशेने येत होता. पंडूने जाऊन त्याला मिठी मारली. "मला खात्री होती. तु स्वयंवर जिंकणार!" कुंतीने पुढे जाऊन नमस्कार केला. "आयुष्यमान भवं!" मागून गांधारी पुढे आली. "महाराज, तुमची भ्रातृजाया.... गांधारनरेश यांच्या कन्या, गांधारी." भीष्मांनी परिचय करून दिला. पंडुला आनंद झाला. पण गांधारीच्या डोळ्यांवरची पट्टी पाहून त्याला आश्चर्य वाटलं.

बॉलिवूडचे बाप

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 03/08/2019 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये अनेक नाती दाखवतात. मुलगा-आई यांच्या नात्यावर भरमसाठ चित्रपटात भाष्य केलंय, पण वडील -मुलगा/मुलगी यांचे नातं हळुवारपणे उलगडणारं चित्रपट फार कमी आहेत पण ज्या काही चित्रपटात हे नातं दाखवलं आहे ते अत्यंत तरल असं आहे. त्यापैकीच बाप-लेकाचं नातं उलगडणारे काही चित्रपट इथे देतोय मिपाकर अजून भर घालतीलच. १. गर्दीश (अमरीश पुरी- जॅकी श्रॉफ) प्रसिद्ध सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर गर्दीश ला हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट म्हणतो, अगदी खरय ते. गर्दीश माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे, ते यात दाखवलेल्या वडील आणि मुलाच्या हळुवार नात्यामुळे.

मिळता नजरेस नजर

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 03/08/2019 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
मिळता नजरेस नजर मिळता नजरेस नजर श्वास थांबून गेला मनात मन मोराचा पिसारा फुलू लागला * कशी चुकवू नजर जीव गोंधळून गेला त्या हस~या छबीच ध्यास काळजाने घेतला * पुजले प्रेम दैवताला कौमार्य नैवेद्य वाहिला विश्वासू सखा होता तो जिव्हारी घाव देवुन गेला * उतरता धुंदी प्रेमाची जगाचा व्यवहार कळला तो पहिला घाव बरेच शिकवून गेला

शिव त्रिगाथा

लेखक अभिजित भिडे यांनी शनिवार, 03/08/2019 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
भगवान शंकर..रुद्र .शिव.. नीलकंठ.मूळ त्रिदेवांपैकी एक .. जनक ब्रह्मा , पालक विष्णू आणि संहारक महेश..सृष्टीचा समतोल राखणारा शिव. देव आहे का नाही हे मला माहित नाही पण देवत्वाच्या समीप जाणारी जर एखादी शक्ती असेल तर ती आपल्या कायेमध्ये चेतना फुंकणारी आणि आंतरिक प्रेरणा देणारी शक्ती होय. अशाच आंतरिक प्रेरणेने एक I.I.M उच्च विद्याविभूषित , बड्या वित्त कंपनीत उच्चपदावरील अधिकारी शिवभक्त अमिश त्रिपाठी सगळं हातचं सोडून भगवान शंकरावर पुस्तक लिहितो काय आणि rest is the history...शिव त्रिगाथा ही भारतीय साहित्यविश्वात अल्पाधि वेळात सर्वाधिक खपाची पुस्तके ठरतात..

तू मी अन पाऊस

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 03/08/2019 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस! पाऊस!! पाऊस! पाऊस!! झाला सारा भणाणलेला त्यासवे आला वारा वारा उडवीतो माझे मन मनामध्ये तू आहेस खरा चिंब मी भिजलेली माझ्यासवे तुझे भिजले तन हिरव्या रानात घेवूनी कवेत मीच हरवले माझे मन पाणी आले पानोपानी झाडे भिजली रानोरानी मिठीत तुझ्या मी आलंगूनी विसरले मी, गेले हरवूनी - बी ऑलवेज लाईक मी - ऑलवेज युवर्स पाभे ०३/०८/२०१९
काव्यरस