Skip to main content

शुक्र दोन वेळेस दिसण्याची दुर्मिळ स्थिती (50 अंश उत्तरेवरील मिपाकरांसाठी)

लेखक मार्गी
Published on गुरुवार, 20/03/2025
शुक्र दोन वेळेस दिसण्याची दुर्मिळ स्थिती (Wonderful dual visibility of Venus!) नमस्कार. आपल्याला माहितीच आहे की, शुक्र पहाटेचा तारा किंवा संध्याकाळचा तारा (an evening star or a morning star) म्हणून ओळखला जातो. कारण तो एक तर पहाटे दिसतो किंवा संध्याकाळी दिसतो. पण ही स्थिती एकदा एकच असते. जर शुक्र संध्याकाळी सूर्यानंतर मावळत असेल, म्हणजे संध्याकाळी दिसत असेल, तर सकाळी सूर्य शुक्राच्या आधी उगवेल व त्यामुळे शुक्र पहाटे दिसू शकणार नाही. आणि जर शुक्र सूर्याच्या पूर्वेला असेल, तर फक्त तो पहाटेच दिसेल. पण एका दुर्मिळ स्थितीमध्ये शुक्र दोन वेळेस दिसू शकतो.

नाशिक जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे

लेखक vcdatrange
Published on मंगळवार, 18/03/2025
नर्मदा ते तुंगभद्राच्या जलरेघेतील महाराष्ट्रच्या ऐतिहासिक वारसास्थळांच्या अभ्यासास एकत्रित करण्यासाठी 'मध्ययुगीन मंदिरे' या संदर्भाने स्थळांची यादी करावयास घेतली आहे. याची सुरुवात राहत्या नाशिक जिल्ह्यापासुन करत आहे. या सर्व स्थळांना येत्या पाच वर्षात प्रत्यक्ष भेट देण्याचे व्यक्तिगत उद्दिष्ट ठेवले आहे. यातील वास्तुंचा विचार करताना मुख्यत्वेकरुन मराठापुर्व कालीन धार्मिक वास्तुंचाच विचार केला आहे. आंतरजालावरील उपलब्ध माहिती, गुगल लोकेशन व मॅपिंग करुन राज्यभरातील सर्व ठिकांणाचा एकत्रित नकाशा तयार होईल जो अभ्यासु व पर्यटकांसाठी उपयुक्त राहील.

जॉन अब्राहम (अंतिम भाग ६)

Published on सोमवार, 17/03/2025
जॉन अब्राहम (भाग १) >>> जॉन अब्राहम (भाग २) >>> जॉन अब्राहम (भाग ३) >>> जॉन अब्राहम (भाग ४) >>> जॉन अब्राहम (भाग ५) शेवटी २६ एप्रिलला व्हर्जिन्यातील एका शेतघरात तपास अधिकार्‍यांना बूथ व हेरॉल्ड सापडले. ते एका गवताच्या गंजीत लपले असल्याच

तुकाराम बीज सोहळा...

लेखक बाजीगर
Published on रवीवार, 16/03/2025
तुकाराम बीज सोहळा... (375 वर्ष पूर्ण सोहळा ) तीर्थ देहू, झाले सज्ज बीज आज, तुकाराम ।। त्रिशतकोत्तर, अमृतमहोत्सव, हा सण उत्सव, देहू क्षेत्री ।। बीजसोहळा, टाळ मृदंग, भाविक दंग, विठूनाम ।। लाखो भाविक, फुलांची सजावट, दु:खाची वजावट, नाचू रंगे ।। सोळा कॅमेरे, करती देखरेख, रांगोळी रेख, सुबकशी।। चोख व्यवस्था, स्वच्छता कर्मचारी, व्यस्त ते आचारी, वैकुंठस्थान ।। तरले अभंग, जुन्या आठवणी, उचंबळे इंद्रायणी, भेट घेण्या ।। वरून तुका, विमान गरुड अभंग गारुड, पाहतसे ।। अभंग गाथा, एकेक अक्षर, आहे ते अक्षय, अमृताचे ।। अभंग फॉर्म, शब्दप्रतिमा ध्यास, जाणकार अभ्यास, रात्र

गुलकंद शिरा

लेखक Bhakti
Published on रवीवार, 16/03/2025
*गुलकंद शिरा* उन्हाळ्या सुरू झालाय.लाहीलाही व्हायला सुरुवात झाली आहे आणि खरंच मन थंड गोष्टींकडे आकर्षित होत आहे.तर आज शिऱ्यावर ताव मारायची इच्छा झालीच होती.

प्रतिपश्चंद्र

Published on शुक्रवार, 14/03/2025
नमस्कार मंडळी ! ऐतिहासिक मराठी पार्श्वभूमीवर हिंदी जाल दुनियेतील मालिका बघण्याचा मनसुबा असेल तर पुढील लेख वाचून आपणास एक पर्याय मिळू शकतो. " प्रतिपश्चंद्र " हि डॉ प्रकाश कोयंडे लिखित एक ऐतिहासिक रहस्य कादंबरी आहे. या कादंबरीवर आधारित " द सिक्रेट्स ऑफ शिलेदार " हि मालिका तप्ततारा जालदुनियेवर उपलब्ध आहे. "NATIONAL TREASURE MOVIE " पठडीतील हि मालिका आहे. हि मालिका आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केली आहे. मध्यवर्ती भूमिकेत राजीव खंडेलवाल आणि सई ताम्हणकर आहेत. जोडीला दिलीप प्रभावळकर ,आशिष विद्यार्थी आणि कानन अरुणाचलम आहेत. रहस्य कथा असल्यामुळे कथाविस्तार टाळतो.

बाजाराचा कल :१७ मार्चचा आठवडा

Published on शुक्रवार, 14/03/2025
बाजाराचा कल :१७ मार्चचा आठवडा ==================== मंडळी, मी स्वत:ला चिमटे काढून कंटाळलो! मागील पोस्टमध्ये केलेले "युयुत्सुनेट मात्र पुढच्या आठवड्यात नकारात्मक अनिश्चितता दाखवते आहे." हे भाकीत परत एकदा खरे ठरले आहे! हे कसे ते समजाऊन घ्यायचे असेल तर निफ्टीचा साप्ताहिक कालचौकटीवरील आलेख पाहणे योग्य ठरेल. आकृती १ - पुढील आलेखात निळ्या बाणाने दाखवलेली मेणबत्ती काल संपलेल्या आठवड्याची आहे. ही मेणबत्ती काय दाखवते? मार्केट निश्चित्पणे वर पण गेले नाही आणि फार खाली पण गेले नाही, म्हणजे अनिश्चित राहिले.

अभ्यासोनी मग ...

Published on शुक्रवार, 14/03/2025
"अभ्यासोनी मग | प्रकटावे" ऐसे कुण्या रामदासे | सांगितले "दिसामाजी काही | तरी ते लिहावे प्रसंगी वाचावे | अखंडित" असेही वदले | तेव्हा रामदास मना उपदेश | करताना आता मला सांगा | लिहिणे, वाचणे अभ्यास करणे | कोणा झेपे? अभ्यास कशाला | प्रकटण्या आधी? इंटरनेट हाती | असताना ! हाती जे येईल | फॉरवर्डावे तेच पुढच्यास ठेच | लागेना का वायफळ मळे | पिकवू अमाप काळाची झडप | येवो सुखे

The Matrix: एका अद्भुत Sci-Fi प्रवासाची कथा

Published on गुरुवार, 13/03/2025
एका तांत्रिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा असलेला जग, इंटरनेटने नुकतीच पायाभरणी केलेली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) संकल्पनांना अजूनही फक्त विज्ञानकथांमध्ये स्थान असलेला काळ म्हणजे एकविसावे शतक. याच्या उंबरठ्यावर १९९९ साली एक सिनेमा प्रदर्शित होतो, जो प्रेक्षकांच्या विचारसरणीला एक नवीन दिशा देतो—The Matrix.

अंतराळ स्थानक बघण्याचा सोहळा आणि लखलखत्या तार्‍यांची मांदियाळी!

लेखक मार्गी
Published on बुधवार, 12/03/2025
नमस्कार. ८ मार्चच्या शनिवारी लोणावळ्याच्या जवळ अंजनवेल ऍग्रो टूरीझम इथे मी व माझा मित्र गिरीश मांधळे- आम्ही आकाश दर्शनाचा कार्यक्रम घेतला. महिला दिनी अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स असलेलं स्पेस स्टेशन बघण्याचा थरार सर्वांनी अनुभवला! त्याशिवाय शुक्राची कोर, गुरूच्या उपग्रहांचा लपंडाव, चंद्रावरचे कित्येक विवर, पहाटेच्या आकाशातले तारकागुच्छ, आकाशगंगेचा दुधाळ पट्टा, सकाळी ट्रेकिंग व ध्यान आणि समारोपाला सूर्य डागाचं निरीक्षण अशी खूप पंचपक्वान्नांची मेजवानी तिथे मिळाली. त्या अनुभवाचं हे शब्दचित्र आपल्यासोबत शेअर करत आहे.