Skip to main content

मौनाइतके कुणीच नाही

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 08/11/2019 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
अथांग, उत्कट, उधाणले तरि किनार ओढुन जसा समिंदर.. स्थितप्रज्ञ कधि सळसळणारे जळाकाठचे वा औदुंबर.. प्रेमळ, नाजुक, पोक्त, समंजस प्राजक्तासम हळवे लोभस.. काजळ रेखुन कधि भिडणारे खट्याळ हट्टी अवखळ ओजस.. कितीहि काही आत उकळले संतापाला घट्ट आवरे.‌ शालिन कधि तर भळभळणारे मिटल्या ओठी दु:ख गोजिरे.. ....... असे देखणे, असे बोलके मौनाइतके कुणीच नाही.... कुणीच नाही.
काव्यरस

"पानिपत"चे ट्रेलर आणि ऐतिहासिक भूमिका

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 07/11/2019 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
सदाशिवराव पेशवेंच्या रोलसाठी आशुतोष गोवारीकरने अर्जुन कपूरला निवडून चूक केली हे "पानिपत" चे ट्रेलर पाहील्यावर बरेच जण म्हणत आहेत. अशीच काहीशी फिलिंग आशुतोषने "जोधा अकबर" मध्ये हृतिकला घेतले होते तेव्हा माझी होत होती. कहो ना प्यार हैं, धूम 2, क्रिश, कोई मिल गया यासारखे रोल करणारा हृतिक ऐतिहासिक राजाच्या भूमिकेत फिट बसेल याला माझे मन मानायला तयारच होत नव्हते, पण जोधा अकबर पाहिल्यानंतर हृतिक मला त्या भूमिकेत अतिशय योग्य वाटला.

या जन्मावर या जगण्यावर..

लेखक शुभांगी दिक्षीत यांनी गुरुवार, 07/11/2019 06:05 या दिवशी प्रकाशित केले.
बाळकृष्ण वारजे आणि सुमती वारजे हे दांपत्य आज जीवन हॉस्पिटलमध्ये आले होते. आज सुमती वारजे यांच्या चेकअपचा रिपोर्ट येणार होता. नर्सने बोलावलं तेव्हा ते दोघं डॉक्टरांच्या केबीनमध्ये गेले. "नमस्कार. बसा." डॉक्टरांनी त्यांना बसावयास सांगितले. "डॉक्टर रिपोर्टस् चं काय झालं??" बाळकृष्ण यांनी विचारलं "थोडं मन घट्ट करा सर." डॉक्टर म्हणाले. "काही प्रॉब्लेम आहे का??" सुमती वारजे म्हणाल्या. "तुम्हाला ब्रेन ट्युमर आहे. त्यामुळेच तुम्हाला सारखी चक्कर येते. हे बघा एक्सरेमध्ये पण गाठ दाखवत आहे." डॉक्टरांनी एक्सरे दाखवला. त्यात एक गाठ दिसत होती. "टेन्शन नका घेऊ आपण ऑपरेशन करून ती काढून टाकू.

आमार कोलकाता - भाग ९ (अंतिम) - बंगभोज

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 06/11/2019 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 भाग ६ -

ऐसी दिवानगी..

लेखक चिनार यांनी बुधवार, 06/11/2019 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
परवा शाहरुखचा बड्डे होता. रात्री एका चॅनेलवर त्याचाच "दिवाना" लागला होता. मग काय.. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बघणं सुरु केलं. (खरं कारण असंय की, आजकाल रिमोट हातात आल्यावर चॅनेल बदलण्यासाठी लेकीची वेगळी परवानगी घ्यावी लागते. ती सुद्धा महत्प्रयासाने मिळवली होती.म्हटलं दिवाना तर दिवाना पण रिमोट हातचा गेला नाही पाहिजे!) तर सिनेमा तसा त्याच्या अखेरच्या टप्प्यात आला होता. म्हणजे शाहरुख आणि दिव्या भारतीचे लग्न झालेले आहे.आणि जो मेलाय असं गृहीत धरून दिव्या भारती शाहरुखच्या गळ्यात हार घालते तो ऋषी कपूर वापस आलेला आहे.

फटाके

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/11/2019 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
फटाक्याची मजा आमच्या पिढी ने बालपणी मनसोक्त अनुभवली.. साधारण नवरात्र सुरु झाले की फटाक्या ्चे स्टोल्स लागायला सुरवात व्हायची.. त्या काळी फटाके पण स्वस्त होते १० रु त टोपली भर दारु (फटाके) यायची.. त्या काळात "तडतडी" नावाचा प्रकार खुप पोप्युलर होता तडतडी भिंतिवर घासली की इग्नाईत व्हायची अन तडतड आवाज करत जमीनीवर नर्तन करायची.. भुई चक्र... हातात धरायची चक्रे..लवंगी फटाके "लाल किल्ला तांबडे फटाक्याची लड...सुतळी बोम्ब..चंद्रज्रोत..नाग गोळी..भुईनळे.. टिकल्या.. चमन चिडी..आकाशात उडणारे बाण.

करंज्या

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/11/2019 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
या वेळी दिवाळीत करंज्या करायच्या नाहीत असे ठरवले आहे मुलीची कारखानीस नावाची सी के पी मैत्रीण आहे तिच्याशी बोलणे झाले आहे कानवले ही खास सी के पी डेलिकसी आहे कानवले--वालाची उसळ -गोळ्यांचं सांभार -हिंग बडीशेप मिश्रित चिकन मटण रस्सा -हि सी के पी खासियत तिच्या मार्ग दर्शनाखाली कानवले करण्याचा प्लॅन आखला आहे खूप मेहनतीचं कौशल्याचं अन नाजूक प्रकरण आहे कानवले करणे श्री समर्थ आहे कार्य सिद्धीस नेण्यास ..

"आप्पा कुलकर्णी"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/11/2019 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
मी ज्या सोसायटीत रहातो तिथे "आप्पा कुलकर्णी" नावाचा एक सदस्य रहातो..आमचे ३५-४० वर्षाचे संबंध आहेत आप्पा व त्याचे मित्र गेली अनेक वर्षे एक उपक्रम दिवाळीत राबवतात.. तो म्हणजे स्मशानात काम करणारे जे कर्मचारी आहेत त्याना "दिवाळी फराळ" वाटप मृत्यु काळ वेळ दिवाळी दसरा पहात नाहि.. कर्मचा-याना ना दिवाळी ना दसरा... आप्पा व मित्र हे काम वर्षानु वर्षे करत आहेत.. ना गवगवा ना चमकेगीरी... सलाम

भरली वांग्याची भाजी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/11/2019 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला नोकरी लागेपर्यंत घरची परिस्थिती बेताची होती आई खूप सुगरण होती -तिने "भरली वांग्याची भाजी केली -मस्त झाली होती पुन्हा आईला म्हणालो ते तसली वांग्याची भाजी कर ना तिने केली पण चव ठीक नव्हती -मी आईला म्हणालो भाजी पहिल्या सारखी नाही झाली आई म्हणाले अरे महिना अखेर आहे तेल संम्पत आले आहे त्या मुळे तेल कमी वापरले मी काहीच बोललो नाही नोकरी लागली पहिला पगार झाला अन तिला त्या काळातला फेमस ब्रॅंड पोस्टमन रिफाईंड तेला चा डबा आणून दिला तिला खूप भरून आले -व तिने जवळ घेऊन केसावरुन मायेनं हात फिरवला

कविता : भेट मित्रांची…

लेखक bhagwatblog यांनी मंगळवार, 05/11/2019 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणींना उजाळा भावनांचा उमाळा शब्दात जिव्हाळा दोस्तीचा सोहळा…. भेट मित्रांची… मित्रांची सतत मस्ती कधी मस्तीची सक्ती सख्याची जीवापाड दोस्ती कधी दोस्तीत कुस्ती…. भेट मित्रांची… मित्र कमी बोलणारा परी डोळ्यात जपणारा दोस्त शब्दात खेळणारा पण शब्दासाठी धावणारा…. भेट मित्रांची…