Skip to main content

पाच दिवसांचा आठवडा!

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 13/02/2020 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातील पाच दिवस कामकाजाचे करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे तमाम कर्मचारीवर्ग कमालीचा खुश झालाही असेल, पण सर्वसामान्य माणसावर मात्र धास्तावण्याचीच वेळ येणार आहे. सध्या दुसरा व चौथा शनिवार-रविवार पूर्ण सुट्टीचा असतो, त्यामुळे अन्य रविवार वगळता आठवड्यातील इतर दिवस पूर्ण कामकाजाचे असतात अशी जनतेची एक अंधश्रद्धा असल्याने कामकाजाच्या दिवशी सरकारी कार्यालयांत खेटे घालणाऱ्यांना सरकारी कामाच्या गतिमानतेची पूरण कल्पना अगोदरपासूनच आहे.

युती ची माती

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 13/02/2020 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच एका धाग्यात असे म्हणले गेलं कि " ..जसे ५६ या संख्येंवरुन उद्धव यांनी मुख्यमंत्री पद मागणे चुकीचे वाटत असले.." एक उदाहरण देतो ( क्षमा, यात भारतावर टीका होत असेल कदाचित पण कधी कधी "आपल्या तो बाल्यआ" ऐवजी "आपलं ते कार्ट" असू शकत एवढं मान्य करण्याचा मोठेपणा असावा .." हे उदाहरण म्हणजे भारतात केंद्र आणि राज्य अशी ब्रिटिश संसदीय लोकशाही आहे तशीच ऑस्ट्रेलिया पण आहे .. फरक थोडा असा कि राज्य पातळीवर स्थानिक पक्ष त्यामानाने खूप कमी आणि सर्वसाधारण पाने धर्म आणि राजय याची फारकत बऱ्यापैकी आहे.

ऊर्जा नावाचा बहुरुपी कलाकार (Law of conservation of energy)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी बुधवार, 12/02/2020 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रमाच्या हेरांच्या ताफ्यात अनेक प्रकारचे हेर होते, काही राज्यात सतत फिरून बातम्या काढणारे तर काही बाहेरच्या राज्यात, शत्रूंच्या राज्यात फिरून, जीवावरचा धोका पत्करून देशनिष्ठा बाळगून देशाशी इमान राखणारे, देशाच्या सुरक्षिततेची काळजी वाहणारे, देशाच्या शत्रूंवर नजर ठेवणारे. पण या हेरांचा समान गुण काय असेल तर त्यांची वेष, भाषा, रूप, रंग, कला, वागणं सारंच पूर्ण बदलायची त्यांची क्षमता.. एका ठिकाणी साधुबैराग्याच्या वेषात जाऊन अलख निरंजन म्हणतील.. दुसरीकडे गारुडी म्हणून जाऊन जीवंत नाग पुंगीच्या तालावर नाचवतील.. एका जागी नाटकातले नट होतील.. कुठे लोहार काम करणारे कारागीर होतील..

बहिणीला जपणारी मारग्रेट

लेखक महामाया यांनी बुधवार, 12/02/2020 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
Music For Millions ---------------------- गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो... आठवणीतला हॉलीवुड रवींद्र दत्तात्रय तेलंग अकल्पितपणे घडून आलेल्या योगाची लज्जत न्यारीच असते. सारखं कथानक असलेले दोन चित्रपट बारा तासांच्या आत बघण्याचा योग असाच एकदा मिळाला-एक हॉलीवुडचा, एक बॉलीवुडचा.

कोण कुठली रोहिणी

लेखक Rohini Mansukh यांनी बुधवार, 12/02/2020 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
अगणित आकाशगंगा अगणित सूर्य गगनी अगणित असती धरणी त्यातून कोण कुठली रोहिणी? काय तिचे सुख नि काय तिचे दुःख विश्वाच्या उलाढालीपुढे आहे ते नगण्य काय तिचे हेवे नि काय तिचे दावे एवढ्या भव्य संसारापुढे क्षुद्र ते ठरावे काय तिचे ज्ञान काय तिचे विज्ञान चराचराच्या गूढापुढे नाही त्याला स्थान म्हणूनच नम्र रहावे तिने गर्व नको तिच्या मनी अगणित मानवांमधून एक आहे कोण कुठली रोहिणी - सौ. रोहिणी विक्रम मनसुख
काव्यरस

एकदाच ओलांडून अंतर...

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 12/02/2020 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
एकदाच ओलांडून अंतर पोहोचले मी तव हृदयाशी, आठवते का तुला अजुनी घडले जे जे काही नंतर? उभी राहुनी टाचांवरती, ओठ भिडवले धिटपणाने. दात पकडती अलगद हल्लक ओठांमधली मधाळ साखर.. वितळून गेले सभोवतालच, विसरून गेले काळवेळ मी. हात शोधती अधीर काही स्पर्शही झाला हळवा कातर... नको घडाया भलते काही मनावरी ठेवलास पत्थर पण... मिठी अशी ती कातील होती अजून होते तनात थरथर...
काव्यरस

गावाकडच्या गोष्टी 1

लेखक प्रमोद पानसे यांनी मंगळवार, 11/02/2020 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडल्या गोष्टी 1 लहानपणी म्हणजे तिसरी चौथीत असताना पतंग नव्हती उडवता येत.पण कटलेल्या पतंगी पकडण्याचा आणी मांजा गोळा करण्याचा भयंकर सोस होता. एखादी पतंग पकडली की मी तीचा मांजा वितावर आठ्या घालुन घरी आणायचा .आणी काकाच्या आसारीला तो गुंडाळायचा.माझ्या काकाला पतंग उडवायचा नाद होता.पण त्याच्या आसारीला असलेला सगळा मांजा मीच आणलेला असायचा.त्याबदल्यात निलकमल थिएटरात बच्चनचे सिनेमे बघायला मिळायाचे.काकाची वट होती तीथे.दर शुक्रवारी मला न्यायचा . एकदा घराच्या वर्हंड्यावर असलेल्या पत्र्यावर उतरुन जांभळात अडकलेली पतंग सोडायच्या प्रयत्नात गंजलेला पत्रा फाटुन दहा फुटावरुन वर्हांड्यात ढुंगणावर आपटलेलं आठव

शेगाव दर्शन व माहूर यात्रा भाग ३

लेखक AKSHAY NAIK यांनी मंगळवार, 11/02/2020 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
शेगाव सोडण्यास साधारण दुपारचे १२ वाजत आले होते. शेगाव ते माहूर अंतर साधारण २०० किमी असल्यामुळे चार ते पाच तासात माहूर मध्ये पोहचू असे असे ग्रहीत धरले होते. मात्र शेगाव ते माहूर हा रस्ता माझ्या ड्रायविंग ची परीक्षा पाहणारा होता असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. गुगल वाल्या काकूंनी रेकमेंड केल्यामुळे मी शेगाव-उमरखेड-वाशीम-पुसद-माहूर हा मार्ग निवडला. शेगाव सोडल्यानंतर साधारण पन्नास एक किमी रस्ता चांगला वाटला. मात्र त्यानंतर रस्त्यांची अर्धवट चालू असलेली कामे आणि हातभर खड्डे यांचा सामना करीत मार्ग काढावा लागला.

दोसतार- ३६

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 11/02/2020 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेच्या चालू दिवशी नेहमीच्या गणवेशाच्या ऐवजी इतर वेगळे कपडे घातले की आपण तसेही वेगळे दिसतो. इथे तर दिवस भर मिरवायला मिळणार होते. तयारी करायला बरोब्बर तीन दिवस उरले . मंगळवारी शिक्षक दिन. मागील दुवा : http://misalpav.com/node/46058 मंगळवारची तयारी शनिवारपासूनच चालू झाली. शनिवारी शिक्षकांकडून त्या त्या विषयाची पुस्तके घेणे आणि काय शिकवायचे आहे हे समजून घेणे ही पहिली पायरी. प्रत्येकानेच पार पाडली. मी ऑफ तास घेणार होतो. ऑफ तास म्हनजे कोणी शिक्षक रजेवर असतील किंवा आजारी असतील शाळेत आलेले नसतील त्यांच्या ऐवजी वर्गावर जाऊन बसायचे.