Skip to main content

लाॅकडाऊन: अडतिसवा दिवस

लेखक किसन शिंदे यांनी शुक्रवार, 01/05/2020 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
२१ मार्चला पहिले लाॅकडाऊन सुरू झाले. सुरूवातीच्या दिवसांत इतर गोष्टींमध्ये वेळ घालवण्यासोबत 'ओटीटी' प्लॅटफाॅर्मवरील वेब सिरिज बघायला सुरूवात केली. वूटची असुर, हाॅटस्टारची स्पेशल आॅप्स, एमएक्स प्लेअरच्या पांडू आणि समांतर अशा एका पाठोपाठ एक वेब सिरिजचा फडशा पाडत असताना, एक दिवस मित्राने 'मनी हाईस्ट' या वेबसिरीजची लिंक पाठवली. यातला हाईस्ट शब्द नवीन असल्याने, त्याचा अर्थ गूगलवर शोधू गेलो तर राॅबरी असा त्याचा अर्थ सापडला.

हो मनुजा उदार तू ..

लेखक मनोज यांनी शुक्रवार, 01/05/2020 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गाने सूक्ष्म हे दैत्य असे सोडले अहंकारी माणसा गर्व सारे तोडले धूर हा हवेत रोज नदीत जहर सांडले प्रतिशोध हा असेल तुला घरात कोंडले उपसलेस बहुत तेल गिरी अनेक फोडले सजेल ही धरा पुन्हा तव हस्तक्षेप खोडले विकास नाव देऊनी वृक्ष अमाप छाटले दुःख ते अपार किती वसुंधरेस वाटले ? मोडलेस घर त्यांचे नांगर थेट फिरवले झुंजलेत पशु त्यांना हिंसक तूच ठरविले शिक आता दिला धडा जरा तरी सुधार तू देई स्वार्थ सोडुनी हो मनुजा उदार तू
Taxonomy upgrade extras

महाराष्ट्र दिन २०२० - शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 01/05/2020 00:04 या दिवशी प्रकाशित केले.

महाराष्ट्र दिन २०२० - शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख



२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - पुर्वार्ध

लेखक वेदांग यांनी गुरुवार, 30/04/2020 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
||नर्मदे हर || "ठरलं...२६ जानेवारी २०१४ ला आपण परिक्रमेला सुरुवात करायची..." नंदू काका (आनंद घाटपांडे), बाबा आणि मी नवीन सायकल घ्यायला आलो असतानाचा बाबांनी बॉम्ब टाकला. मनात विचार आला, अजून १ वर्षापेक्षा जास्त वेळ आहे, आरामात सराव होईल पण त्या वेळी म्हणजेच डिसेंबर २०१२ ला लक्षात नव्हतं आलं कि वर्षभराची प्रक्टिस सुद्धा पुरेशी होणार नाहीये. जे भोग भोगायचे आहेत ते भोगावे लागणार आहेतच. २ नव्या कोऱ्या Montra जाझ्झा घेऊन ऐटीत दुकानाच्या बाहेर पडलो. सध्या बाबा आणि माझ्यात मिळून १च सायकल घेतली होती आणि दुसरी सायकल चंद्रशेखर काकांसाठी होती.

श्रद्धांजली - ऋषि कपूर

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 30/04/2020 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
काल इरफान गेला आणि आज सकाळी झोपेतून डोळे उघडेपर्यंत ऋषि कपूरच्या जाण्याची बातमी पुढ्यात उभी होती. आधीच करोनाच्या थैमानाने लोकांचा जीव अगदी मेटाकूटीला आला आहे. आणि त्यातून लागोपाठच्या दोन दिवसांत, दोन उत्तम अभिनेत्यांनी सोडून जाणे लोकांसाठी नक्कीच त्रासदायक ठरत आहे. मेरा नाम जोकरपासून ते अगदी अलीकडच्या द बाॅडीपर्यंत ऋषि कपूरची फिल्मी कारकिर्द, त्याच्या पिढीतल्या इतर कपूर्सपेक्षा नक्कीच उजवी होती. व्यक्तीशः माझ्यासाठी ऋषि कपूर हा त्याच्या पुर्वार्धापेक्षा उत्तरार्धात अभिनेता म्हणून जितका समोर येत गेला तितकाच तो आवडत गेला.

योगक्षेमं वहाम्यहम्‌..खरा अर्थ.

लेखक Jayant Naik यांनी गुरुवार, 30/04/2020 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
योगक्षेमं वहाम्यहम्‌..खरा अर्थ. काही दिवसापूर्वी मी भगवदगीतेमधील कर्मण्ये वाधिकारस्ते ..या दुसऱ्या अध्याया मधील श्लोकाबद्दल हा श्लोकाचा कसा विपर्यास होत गेला या बद्दल लिहिले होते. आता नवव्या अध्यायामधील एक श्लोकाचा विचार करू. हा सुद्धा एक विपर्यास झालेला श्लोक आहे.किवा आपण असे म्हणू शकतो कि अनेक लोकांनी आपल्या आळशीपणा किवा नाकर्तेपणा याचे समर्थन करण्यासाठी या श्लोकाचा आधार घेतला आहे. १.० मूळ श्लोक आणि त्याचा अर्थ. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥ ९-२२ ॥ भावार्थ.

सुटकेस २

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 30/04/2020 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
सुटकेस १ गारठा चांगलाच झोंबत होता. आणि हायवेला मोठमोठाल्या ट्रॅव्हल्स सुसाट धावत होत्या. वळणाच्या अलिकडेच एक पेट्रोलपंप आहे. तिथे मी जरावेळ थांबलो. आणि कानोसा घेऊ लागलो. तशी फारशी हालचाल दिसत नव्हती. पण एकदोन लक्झरी कार त्या पुलाजवळच ऊभ्या होत्या. मी बाईक हळूहळू पुढे नेऊन त्या कारच्या पाठिमागे ऊभी केली. आणि लघुशंकेचा बहाना करून ओढ्याकडे चाललो. "अबे साले दिखता नही क्या, निचे आदमी है" कारच्या पुढे दोघे ऊभे होते. त्यातला एकजण म्हणाला. तसे दिसायला ते प्रतिष्ठित होते. "ओह. सॉरी.