Skip to main content

( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )

लेखक रातराणी यांनी बुधवार, 24/06/2020 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
( प्राचीताई माफ करशील ना ग? ) जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना, आणि तुला नाक्यावरच्या वडापावची खूप खूप आठवण येईल ना आणि तेव्हा जेव्हा मी बटाटेवड्याची रेसिपी पहात असेन तू म्हणशील, "अवघड आहे! या जन्मी मिळतील का?" मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग बटाट्यांना कोंबेन कुकरमधे. "अगं, शिट्टी!" मी मग चिडून शिट्टी लावेन. "जमलं!", तू म्हणशील. मग मात्र मला रहावणार नाही. मी तुझा फरसाणाच्या डब्यातला हात काढून घेईन, कुकरजवळ नेईन. तू घाबरशील..म्हणशील, हात भाजतील मी म्हणेन भाजू देत. शिट्ट्या होतीलच कुकरला.

गुलाबी कागद निळी शाई....1 अनामिक

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 24/06/2020 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबी कागद निळी शाई Hiiii पत्र पाहून आश्चर्य वाटलं ना? गंमत सांगू, मलाही वाटलं. :) कारण शाळेतलं पत्र लेखन संपल्यावर पुन्हा कधी खरंखुरं पत्र लिहिलंच नाही बघ. तसंही बोअरींगच होतं ते. तिथं हमखास मार्कस् जायचे. मराठीच्या मिस् तर छळायच्याच मला. माझे निबंध आणि पत्र भर वर्गात वाचली जायची. लेखन कसं नसावं याचं उदाहरण म्हणून. सगळे चिडवायचे मग. Science घेतलं आणि सुटले त्यातून. ते जाऊदे. तर काय सांगत होते? हं तर तुला लिहिलेलं पत्र. त्याचं काय आहे, तसा तू मला नेहमी भेटतोस. भेटतोस म्हणजे दिसतोस. कँटीनमध्ये, टी कॉर्नर वर.

शब्द

लेखक पाटिल यांनी बुधवार, 24/06/2020 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
बोलणं जे जिवंत कागदावर त्याचं प्रेत बोलणं जे भाबडं मुक्त कागदावर तेच अडचणीचं बोलणं अधीर ओथंबलेलं कोवळं कागदावर विचारपूर्वक शुष्क निबर बोलणं गरमागरम लालबुंद कागदावर डीप्लोमसीटाईप गुळमुळीत बोलणं, वार्‍यावर विरून जाणारं कागदावरचं, आयुष्यभर पायगुंता होऊन बसणारं बोलणं, अगदी वैयक्तिक, थेट ओंजळभर. कागदावरचं, वाचणाराच्या मूडनुसार हरवणारं गवसणारं. बोलताना जे गाणं, त्याचं कागदावर संदर्भासहीत स्पष्टीकरण. एकेकाळी, बोलणं, प्रपोज करायला घाबरणारं. त्याचकाळी, लिहिणं, चिठ्ठी पाठवायची सोय असणारं. बोलणं, मनस्वी, हळवं, जखडून टाकणारं. कागदावर तेच, तुफान विनोदी रडगाणं. बोलणं, माझ्यासारखं, आधी. लिहिणं

दोसतार - ५५

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 24/06/2020 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
"काय शिकवतात म्हणजे! रेड कशी मारायची. पाटी कशी दाबायची. बोनस कसा मिळवायचा पटात घुसून रेडरला कसा उचलायचा. सगळं दाखवतात. कबड्डी कबड्डी म्हणताना दम कसा टिकवायचा. ते पण शिकवतात.सोप्पे नाहिये ते. मंडळातला नर्‍या गायकवाड आख्खी दोन मिनिटे दम टिकवतो. अजिबात श्वास सोडत नाही." आता इतर सगळे खेळ बाजूला पडले. वर्गाची कबड्डी ची टीम . त्यात कोणकोण असणार आणि प्रॅ़क्टीस कधी करायची यावरच सगळे बोलणे एकवटले
मागील दुवा : http://misalpav.com/node/47071 कोण कोण ? हा एक मोठा प्रश्न . कारण कबड्डीला निदान बारा खेळाडू लागतात.

चुकलेली वारी..

लेखक मी-दिपाली यांनी मंगळवार, 23/06/2020 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढ महिना लागला की आठवतात काळे मेघ ; त्या मेघांनाच दूत बनवणारे महाकवि कालिदास आणि मग वेध लागतात आषाढी एकादशीचे ,टाळ मृदंगाच्या जयघोषाचे ,विठ्ठलाच्या नामाचे, पंढरीच्या वारीचे. वारी म्हणजे तीनशेहून अधिक वर्षे जपलेला महाराष्ट्राच्या भागवत संप्रदायाचा सांस्कृतिक वारसा ,वारी म्हणजे नेम ,अट्टाहासाने घेतलेले आत्मक्लेषाचे व्रत ,त्यातील भक्तिरसाच्या सुखाची अनुभूति , समर्पणातील आत्मानंद . या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे 'मनाचिये द्वारी यंदाची ही वारी ' असे म्हणण्याची वेळ वारकऱ्यांवर आली आहे.

गुलाबी कागद निळी शाई

लेखक @tul यांनी मंगळवार, 23/06/2020 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी पत्रं "लिहिली" जात... आता "आठवली" जातात. गेल्या १०० शंभर वर्षांचा विचार केला तर जलद संदेशासाठी आणि दीर्घ संवादासाठी दळणवळणाची वेगवेगळी साधने होती . ह्या १०० वर्षांचे तीन भागात विभाजन केले तर पहिल्या भागातील काळात जलद संदेशासाठी तारयंत्राचा वापर म्हणजे तार संदेश होते आणि दीर्घ संवादासाठी हस्तलिखित पत्राची सोय पोस्ट सेवेत होती. मधल्या काळात जलद संदेशासाठी फोन आले आणि दीर्घ संवादासाठी पत्र हेच माध्यम राहिले. वर्तमान काळात जलद संदेशासाठी आधी काही काळ pager मग मेसेजिंग आणि आता whatsapp आणि दीर्घ संवादासाठी हस्तलिखित पत्र नामशेष होऊन e पत्र व्यवहार सुरु झाला.

शेवटची चूक.

लेखक Jayant Naik यांनी मंगळवार, 23/06/2020 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटची चूक. प्रेम माणसाला किती असहाय बनवते नाही का ? आता माझ्या सारखा मध्यमवयीन माणूस आणि तो सुद्धा लंडन मधील एक प्रथितयश डॉक्टर असा कसा काय वागू शकतो? मी म्हणजे डॉक्टर राहुल.माझे लग्न झालेले आहे आणि एक अतिशय प्रेमळ आणि सुंदर बायको आहे मला .एक गोड मुलगी सुद्धा आहे. तीन वर्षाची . त्यांना जर हे सगळे कळले तर ते काय म्हणतील ? मी काही कामासाठी पुण्याला आलो आहे इतकेच त्यांना माहित आहे. माझ्या बायकोला माझे लग्ना आधीचे प्रेम माहित आहे . मी लग्ना आधीच तिला रीना बद्दल सांगितले होते. रीना. तिचे नाव घेतले तरी अजून पोटात कालवाकालव होते. तिला सुद्धा असेच होत असेल का ?

दोसतार -५४

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 23/06/2020 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
"एका टीमच्या बॅट्समन चा उडालेला कॅच दुसर्‍या टीमचा फिल्डर पकडायचा. अशा वेळेस औट द्यायचा की नाही हेच समजत नाही. गावसकरच काय पण टोनी ग्रेक आणि सोबर्स ही असल्या मॅच खेळले नसतील. इतक्या सगळ्या नियमात बसवून क्रिकेटच्या मॅचेस घ्यायच्या शाळेला अवघड वाटणार नाही तर काय ! मागील दुवा http://misalpav.com/node/47063 शाळेनं हा विचार केलेला असणार अज्या संज्या संदीप गार्‍या सगळे मिळून या वर्षी कोणता खेळ असेल हेच बोलत होतो. अज्याचे म्हणणे की प्रत्येक खेळाला समान न्याय द्यायला हवा, "एखाद्या वर्षी फुटबॉल एखाद्या वर्षी हॉलीबॉल असे काहितरी ठेवायला हवे.

अनादी .....अनंत.....

लेखक Vivekraje यांनी सोमवार, 22/06/2020 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या वाटेवर एखादा अजाणता क्षण ज्यावेळी कठोरपणे थांबलेला असतो.. आणि काही प्रारब्धातील प्रश्नांची उत्तर शोधायला ही पर्याय नसतो.. त्यावेळी अचानक एखादा पर्याय उभा दिसतो.. त्यावेळी फक्त तूच आठवतोस.. अनादी ...अनंत.. जेव्हा, सगळं जग सोबत असतानाही आम्ही एकटे असतो.. आणि संसारिक दुःखात आम्ही पराजित होत असतो.. तेव्हा आमच्या रथाचा सारथी म्हणून तू समोर दिसतो.. त्यावेळी फक्त तूच आठवतोस.. अनादी ...अनंत.. मी पणा सोबत घेऊन जेव्हा आम्ही तुला शोधत असतो.. दानपेटीत दान टाकून , तुला जणू विकतच घेत असतो.. आणि तरीही तुझ्यावरचा विश्वास जेव्हा आमचा डळमळीत होत असतो.. त्यावेळी फक्त तूच आठवत

गूगल ड्राइव'वरचे फोटो, ओडिओ, विडिओ वेबसाईटवर देणे.

लेखक कंजूस यांनी सोमवार, 22/06/2020 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
गूगल ड्राइववर अपलोड केलेले फोटो,
ओडिओ, विडिओ वेबसाईटवर देणे.
Google Drive प्रत्येक जीमेल अकाउंटला सर्व फोटो,पिडिएफ, ओडिओ, विडिओ फाईल मिडियाचे धरून १५ जीबी फ्री स्टोरेज देते. शिवाय सिक्युअरटी आहेच.

भाग पहिला ) सुरुवात -
प्रथम ब्राउजरमध्ये
drive.google.com/drive/my-drive
साइट ओपन करून आपल्याला हव्या असलेल्या जीमेल अकाउंटने साइन इन करायचे.
मोबाईलवरही साइट उघडा आणि डेस्कटॉप पेज ओप्शन करावे. App नको कारण पुढे शेअरिंग लिंक काढण्यास साइट बरी पडते.

भाग २ ) मिडिया फाईल अपलोड करून शेअरिंग लिंक मिळवणे.
+ new बटण वापरून मिडिया फाइल अपलोड करा.