मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चुकलेली वारी..

मी-दिपाली · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आषाढ महिना लागला की आठवतात काळे मेघ ; त्या मेघांनाच दूत बनवणारे महाकवि कालिदास आणि मग वेध लागतात आषाढी एकादशीचे ,टाळ मृदंगाच्या जयघोषाचे ,विठ्ठलाच्या नामाचे, पंढरीच्या वारीचे. वारी म्हणजे तीनशेहून अधिक वर्षे जपलेला महाराष्ट्राच्या भागवत संप्रदायाचा सांस्कृतिक वारसा ,वारी म्हणजे नेम ,अट्टाहासाने घेतलेले आत्मक्लेषाचे व्रत ,त्यातील भक्तिरसाच्या सुखाची अनुभूति , समर्पणातील आत्मानंद . या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे 'मनाचिये द्वारी यंदाची ही वारी ' असे म्हणण्याची वेळ वारकऱ्यांवर आली आहे. प्रत्यक्ष पंढरपूरी जाऊन विठुरायाचे दर्शन घेता येणार नसल्यामुळे जीवाची तगमग होते आहे.... .

वाचने 8431 वाचनखूण प्रतिक्रिया 17

मूकवाचक Tue, 06/23/2020 - 17:00
प्रासादिक काव्य. (शेवटी स्वामी म्हणे, नामा म्हणे अशा स्वरूपाचा उल्लेख नसेल तर चुकल्यासारखे वाटते)

खिलजि Tue, 06/23/2020 - 18:04
एक नमुना पेश व्हावा म्हणुनी परतुनी आलो आज चिंब त्या कडांचा एक , फक्त एक थेम्ब साठवुनी गेलो तू विठू आम्हा सावळा कुणा वाटे तु रे काळा पुरवितसे अखंड तू भक्ती चैतन्याच्या झळा आज जाहलो मी म्लान आले कोरोनाचे थैमान ये धावुनी तू त्वरा भक्त दर्शना पाठमोरा

रूप मनोहारी लावी वेड भारी मन जाई वारी रंगोनिया!!! अहाहा ! इथे पैकीच्या पैकी गुण दिले आहेत. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

सत्यजित... Wed, 06/24/2020 - 00:20
विठुदर्शनाची आस,त्यासाठी होणारी तगमगही सुरेख मांडली आहे! सावळ्याची प्रतिमाही काहिसा दिलासा देवून गेली. शिवाय सुरुवातीस लिहिलेली भूमिका मला विशेष उल्लेखनीय वाटते. अभिनंदन!

चांदणे संदीप Wed, 06/24/2020 - 15:46
मनाचिये द्वारी यंदाची ही वारी
आलिया भोगासी असावे सादर l देवावरी भार घालूनिया ll उत्तम रचना! चित्र आणि त्यावरचे सुलेखनही सुरेख! सं - दी - प

फास्टरफेणे Wed, 06/24/2020 - 22:20
काय हे पडळकर साहेब ! शिवसेनेने पवारांचं "हाफिज सईद" असं "सौम्य" नामकरण केलेलं असताना तुम्ही त्यांना थेट "कोरोना" संबोधता !!! किती जहाल विचार आहेत तुमचे !