सभा आणि मागच्या-पुढच्या वेळा
वेळ- सभेचा दिवस
शनिवार होता, सकाळपासूनच प्रंचड उत्सुकता होती, साहेब काय बोलणार?, कामावरुन बरोबर सहाला सुटला तो, शहरातल्या तलावाच्या जरा अगदी पुढे बाजूच्या रस्त्यावरच सभा असणार होती, नेहमी नेमका वर्दळीचा, गाडयांनी भरलेला रस्ता आज माणसांनी भरुन जाणार होता, इतके दिवस तो साहेबांना टीव्हीवरच बघत होता, आज प्रत्यक्ष बघायचं होतं, साहेबांच्या नावातच वलय होतं, करिश्मा होता. समोरच्याला मोहित करेल, भारावून टाकेल असचं भाषण करायचे. समोरचा त्यांच्या कितीही विरोधी विचाराचा असो….
मिसळपाव
सूर्याचा तांबूस गोळा स्वामी विवेकानंद स्मारकावर विलसत होता. कन्याकुमारी मंदिराच्या मागच्या बाजूला सूर्योदय दर्शनासाठी जनसागर लोटला होता. तेथून सकाळची सायकल रपेट मारावी म्हणून जवळच्या सनसेट पॉइंटवर सुद्धा गेलो.
सकाळीच सूर्य दर्शन झाले. प्रभात समयी "मित्राच्या" भेटीचा आनंद अपरिमित होता.