'एवढ्यात संवेदनाच बोथट झाल्याचे दिसते'
या धागा लेखाचे आधीची शीर्षके 'पुणेकरांनो, आतातरी भानावर या' दैनिक सकाळच्या हेडलाईन वरून घेतले. प्रतिसादातून वीषाणूशूर बेफिकीर प्रतिसाद बघीतल्या नंतर शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतला.
मध्यंतरी माझ्या मंगलोरी बन च्या पाककृतीमध्ये कंजूसकाकांनी बिस्कीट अंबाडेची पाककृती विचारली होती. त्याला त्या धाग्यावर प्रतिसाद देण्यापेक्षा इथेच पाककृती लिहीतेय. जेणेकरुन सर्वांना एक नवी पाककृती कळेल. बिस्कीट अंबाडे म्हणजेे आपल्या सोप्या भाषेत उडीद डाळीची भजी. याला बिस्कीट अंबाडे नाव का ? तर या भजीचे वरचे आवरण चावतावा अगदी बिस्कीटासारखा कुरकुर आवाज येतो व अंबाडे म्हणजे गोल आकार. म्हणून याचे नाव बिस्कीट अंबाडे असे पडले. याचा उच्चार मात्र ते बिस्कूट अम्बडै असा काहीसा करतात.
सुरुवात
आपल्याला माहिती होते, आपण काय व्यायामाची किंवा वजन कमी करायची नाटके करायला सायकल घेत नव्हतो... आपल्याला आवडते मुक्त जगायला.. निसर्गात हिंडायला..ढगांची चादर लपेटुन बसलेल्या हिरव्या गार डोंगरांना भेट द्यायला.
आषाढातला मेघ मल्हार आपल्याला लय आवडतो... पावसाचा हा खेळ जंगलात, रानावनात अनुभवताना आपण सारे भान विसरुन जातो. नंतर येतो श्रावण.. हळुवार, नाजुक अलवार सूर घेवून आलेला श्रावण ही आपल्याला खुप आवडतो.. सारी धरती हिरवा शालु घालुन नवयौवन वधु सारखी नटलेली असते, इंद्रधनुष्याच्या रंगीत कमानी आणि फुलांचा मोहक सुगंध श्वासा श्वासात अनुभवताना मस्त वाटते.
सायकल म्हणजे पुन्हा निसर्गात जायचे.. , रखरखीत रोड असुद्या किंवा झाडांच्या गर्दीतील रस्ता असुद्या त्यातुन हळुच अंतरे कापत जायचे, हळुच पाहिजेल तेथे थांबायचे.. जिथे जाईल तिथे तिथल्या लोकांच्यात मिसळायचे.. त्यांच्याशी बोलायचे .
सायकल ही आवडीची गोष्ट आहे, तीला व्यायाम, वजन असल्या गोष्टीमध्ये बांधुन ठेवुन आनंद का कमी करायचा ? उलट जिथे जाईल तिथे बिंधास्त खायचे, प्यायचे.. ऐश करायची...मी फ्युजी या कंपनीची सायकल आराध्याच्या वाढ दिवशी घरात आणली होती..
तर मी सायकल घेतली, आणि मग माझे गावाकडचे मित्र चेत्या आणि योग्या यांनी ही सायकली घेतल्या.. लिहिताना ही योग्या आणि चेत्याच बोलणार त्यांना, बालपणीच्या मित्रांना उगाच गुळमट पणे हाका मारणारे आपल्याला आवडत नाही. गावाकडं जे बोलायचो तसेच अजुनही..
आणि चेत्याचा आणि माझा सायकलवर कोकणला जायचा प्लॅन ठरला.. पुणे लोणावळा हा १०० किमी सायकलिंगचा आम्हाला अनुभव होता, या पावसाळ्यात तेव्हड्याच फेर्या झाल्या होत्या २-४. एकदा ७० किमीच आडवाटेवरती कासारसाई ला जावून आलो होतो ती एक ट्रीप.
मला सायकल वर कोकणात जायचे होते.. चेत्याला ही कल्पनाच भारी वाटली होती.. कुठलीही आव्हाने असल्यास चेत्याला ती पुर्ण केल्याशिवाय राहवत नाही.. हे ही तसेच, त्याने ट्रेक ची सायकल घेतली... आणि आमच्या कोकणच्या प्लॅन ला अमलात आणायचे आराखडे सुरु झाले..
चेत्या म्हणजे प्लॅन त्याचा, आणि आम्ही त्याचे गप ऐकुन घ्यायचे.. हे नेहमीचेच आहे. तो आम्हाला बोलण्यात काही ऐकत नाही.. भांडणात पण नाहीच :-)).
सुरुवातीला आम्ही दोघेच होतो, चेत्या ने नंतर त्याचे उरुळीतलेच मित्र गणेश बकरे( गणेश बी म्हणु) आणि पोपट यांची ओळख करुन दिली आणि त्यांना ही कोकणाच्या प्लॅन मध्ये सामिल करुन घेतले.. सायकल प्रेमाचे असेच असते, आपण चटकन दुसर्यांना त्यात ओढुन घेतो..
गणेश बी आणि पोपट ने एमटीबी घेतल्या होत्या, आमच्या हायब्रीड होत्या. आणि सुरुवात झाली आमच्या खरेदीला.. मग आम्ही डिकॅथॉलॉन ला जायचो कायम,
पोपट ची सायकल १५,००० ची मोन्ट्रा आणि घेतलेले सामान एकुन २०,००० प्लस रुपयांचे झाले होते :). म्हणजे चार आण्याची कोंबडी आणी बारा आण्याचा मसाला ही गत झाली होती.. सायकल अक्सेसरीज चा खर्च हा सुद्धा सायकल घेताना लक्शात घेणे जरुरी असते हे आम्हाला उशिरा कळाले.
लाईट्स, ब्लिंकर,हेल्मेट, २-२ सायकल कॉस्च्युम, हॅडग्लोज, फोरआर्म, बॅग, पॅनियर /कॅरीअर, त्याच्या बॅग्स, एक्स्ट्रा ट्युब, पंक्चर किट, वजनाला हलका सायकल पंप अश्या अनेक गोष्टी १०-१५ हजार घालवावे लागतातच :).. तुम्ही अगदीच निरुत्साही असला असले सगळे घ्यायला तरी ५-६ कुठे गेले नाहीच ...
कोकण ट्रीप - कर्दे, दापोली सुरुवात
दिवाळी झाली आणि बायको माहेरी गेली, बायको माहेरी गेली की मग सायकलिंग बिनधास्त कुठे ही कितीही दिवस करता येते.. ते म्हणतात ना " प्रत्येक यशस्वी सायकलिस्ट च्या मागे त्याच्या बायकोचा घराबाहेर माहेरी गेलेला पाय असतो..".
कोण म्हणाले असे ? अहो मीच :).
मग आमच्या प्लॅन ला उधान आले.. चेत्या ने पोपट आणि गणेश बी ला घेवुन, उरुळी वरुन शिंदवणे घाटातुन सासवड कडे जाणार्या रोड वरुन फेरफटका मारला ५० एक किलोमिटरचा. पोपट ने येव्हडे सायकलिंग कधी केले नव्हते.. त्याला बघता, तो दमला ह्यात आम्हाला काहीच नवल वाटले नव्हते...
ह्या सगळ्या परिस्थीतीत, दोन नवीन भिडु कसे आहेत हे मला माहीत नसताना, मी आपले पुणे ते आरावी(दिवेआगार) असा कमी अंतराचा प्लॅन आखला होता.. चेत्याला ट्रीपमध्ये राजेशाही थाट लागतात... त्याचे आणि माझे म्हणणे नेहमीच विरुद्ध असते, आणि मलाच नेहमी कमीपणा घ्यावा लागतो.. चालते यालाच मैत्री म्हणतात.
मग दिवेआगार, आरावी कसे मागास, तिकडे कसा समुद्र कर्दे येव्हडा छान नाही, आणी गर्दी आणि इतर सगळी त्याची कारणे झाली.. आणि त्याच्या म्हणण्याने आम्ही कर्दे, दापोली हा प्लॅन केला..
माझा त्याच्यापुढे दुसरा असा कुठलाही मार्ग नसतो.. एकच मार्ग असतो तो म्हणजे शरणागती.. ( पण कर्दे ला गेल्यावर कळाले, हाच प्लॅन भारी होता.. पुढे येइलच)..
उरुळीवरुन आधल्या रात्री सगळे माझ्या घरी गाडीत येतील आणि मग माझे घर ते कर्दे असा प्लॅन होता. चेत्याच्या इनोव्हा मध्ये २ सायकल बसतात. एक सायकल कशी आणायची ह्याचा विचार होता.. आमच्याकडे रीअर मॉऊंटन रॅक नव्हते गाडीचे. मग दोन दिवस आधी पोपट पुण्यात येणार होताच तर त्याने त्याची सायकल त्याच्या गाडीत माझ्या घरी आणुन ठेवली आधी.
मी माझी सायकल धुतली, सायकल च्या च्येन ला च्येनल्युब लावले, हवा भरली, सगळ्या बॅग भरल्या. आणि पोपटची सायकल काढली चैन ल्युब लावायला. आणि कळाले त्याचे ब्रेक रीम ला घासत होते, चैन पण थोडी स्मूथ वाटत नव्हती.. मी लगेच काळेवाडीच्या बोडके सायकल्स मध्ये त्याची सायकल न्हेली आणि ती निट करुन आणली.. पोपट ला पण सांगितले ( मग तो म्हणाला त्यामुळेच मला दम लागत होता तर :), हे खोटे आहे कळेल पुढे).
चेत्या ने त्यांना कोकणट्रीप कशी मस्त. फक्त हिंजवडी , पिरंगुट फाट्यापर्यंतच चढ, मग कसा सगळा उतारच आहे असे सांगितले होते हे मला नंतर कळाले..
मला सकाळी लवकर उठुन आल्हाददायक वातावरणात सायकल चालवायला सुरुवात करायची असती... चेत्याला थोडे निवांत लागते, त्याला नाष्टा करुन मग सुरुवात.
तरी पहिलाच दिवस असल्याने माझ्या म्हणण्याने अगदीच ५:३० - ६ ला निघालो नाही तरी चेत्याच्या म्हणण्यापेक्षा लवकरच म्हणजे ७ ला आम्ही ट्रीप ला सुरुवात केली..
पुणे ते माणगाव(११० किमी)
सुरुवातीला घरातुन निघताना फोटो काढुन झाले, मला पुर्वी फोटो काढायला आवडत नसत.. नंतर नंतर फोटो काढण्याची धुंदी माझ्यात आली. पण चेत्याला स्वताचे असंख्य फोटो काढायचे असतात. त्याच्या इतके फोटो काढुन घेणे नाही आवडत मला.
त्यामुळे फोटो फोटो करुन चेत्याची आणि आमची पहिली लॉंग सायकल ट्रीप सुरु झाली..मी आणी चेत्या यांना सराव होता.. गणेश बी आणि पोपट हे सायकल साठी नविन होते आणि त्यांच्याकडे एमटीबी होत्या.. मी पुढे, मागे हे दोघे आणि सर्वात मागे चेत्या असे आम्ही लाइनीत चाललो होतो...
सुरुवात