Skip to main content

तुझ्या भावनांची शपथ आहे (कविता) - सागर

लेखक सागर
Published on गुरुवार, 07/02/2008
तुझ्या भावनांची शपथ आहे नाहीतर शब्दांचे हे बंध कधीच मी मानीत नाही आज तू मला रोखले आहे नाही तर तुझा दुरावा मनाला पटत नाही आज तुझा आधार आहे नाहीतर कोसळल्यावर मी कधीच सावरत नाही म्हणूनच सखे, आपला संग आहे तुझ्या असण्याची मला किंमत आहे नाहीतर तसा मी कोणासाठी सैरभैर होत नाही ... - सागर ०७-०२-२००८ दुपारी ४.०० वा.

जडणघडण

लेखक सरपंच
Published on गुरुवार, 07/02/2008
नमस्कार, मिसळपाव वर अधिकाधिक सोयी उपलब्ध करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. अनेकांच्या ते लक्षात आले असेलही. तरीही येथे नव्या सोयी बद्दल माहिती दिली जाईल. तसेच काही अडचणी असल्यास त्या सुद्धा येथे मांडल्यास हरकत नाही. सदस्य व्यवस्थापनासाठी सदस्यं संरचनेत थोडा बदल केलेला आहे. त्यामुळे तुमच्या काही सोई ज्या तुम्ही आधी वापरत होतात आणि आता त्या दिसत नाहीत असा काहिसा प्रकार असेल तर येथे तसे नमुद करावे. सोई पुर्ववत करण्यात येतील.

ग्रस्तास्त चंद्रग्रहण दिनांक २१ फेब्रुवारी २००८

Published on गुरुवार, 07/02/2008
नमस्कार, ग्रस्तास्त चंद्रग्रहण माघ पौर्णिमेला म्हणजे गुरूवार दिनांक २१ फेब्रुवारी २००८ रोजी येत आहे. हे ग्रहण भारतात अतिपश्चिमेकडील काही गांवातून दिसेल. ती गावे म्हणजे गुजरात मधील जामनगर, राजकोट, पोरबंदर, मोरवी, वेरावळ, जुनागढ व भूज ही आहेत. महाराष्ट्रात कुठेही हे ग्रहण दिसणार नाही, याची नोंद घ्यावी. त्यामुळे या ग्रहणाचे वेधादि नियम महाराष्ट्रातील लोकांसाठी लागू होत नाहीत. ज्या प्रदेशात हे ग्रहण दिसणार आहे त्यांनी बुधवार २० फेब्रुवारी रोजी सूर्यास्तापासून वेधादि नियम पाळावेत. तसेच ग्रस्तास्त चंद्रग्रहण असल्याने गुरूवारी सूर्यास्तानंतर शुद्ध चंद्रबिंब पाहून मग भोजन करावे.

विवाहपूर्व एच. आय. व्ही. चाचणी

लेखक व्यंकट
Published on गुरुवार, 07/02/2008
विवाहपूर्व एच. आय. व्ही. चाचणीला महाराष्ट्रातून तीव्र विरोध होत असल्याचे वाचनात आले. हा विरोध का? असा कायदा असावा की नसावा?

मी एक परिस्थिती

लेखक ऋषिकेश
Published on गुरुवार, 07/02/2008
तसा मी इथलाच.. केव्हापासून??? पोटासाठी इथे आलो तेव्हापासून...!! इथेच घडलो.. इथेच वाढलो.. या अनोख्या भागात आता कायमचा सडलो...! काम काय? द्याल ते! जे तुम्हाला करायचं नसतं.. करायला जमत नाहि किंवा कमीपणाचं वाटतं.. पण मला जे दोन वेळच जेवण देतं... असं वाट्टेल ते! मी इथला कसा? तुम्ही जसे इथले तसाच मीही तुम्हाला इथे मान आणि पैसा दोन्ही मिळतो मला तर केवळ पैसा त्रास सहन करतो जितका तुम्ही तितकाच मीही मी बाहेरचा का? माझी मुळं इथली नसल्याचं तुम्ही दाखवून देताय मी इथे स्वतःला रुजवू पहातोय मात्र मला इथून उपटण्याचा घाट तुम्ही घालताय ना इथला ना तिथला असं तुम्हीच जाणवून देताय..

वाद्यं

लेखक नन्दु
Published on बुधवार, 06/02/2008
वाद्य आता जेव्हा कधि तो वाद्यांच्या दुकानासमोरुन जातो नेहमि खालमानेने जातो हि सगळी वाद्यां त्याच्या घरात आहेत कधिकाळी.................. तो विचारित आसे वीणेचि किंमत अलवार पणे फिरायचा त्याचा हात ताराना झंकारत नि त्याला वाटायच वाद्यं नसतात त्याचि जो केवल खरिदतो त्याना ती असतात त्याचि जो निर्माण करतो अनाहत सुरवटि आणी मग एका संध्याकाळी त्याच्या घरी वीणा आलि कितीक सांजवेळा,कितीक रात्री कित्येक दिवस उलटले थकून ...वैतागुन.....

व्हीस्की आणखी रम यातुनी, कोण आवडे अधिक तुला?

Published on बुधवार, 06/02/2008
सांग मला रे सांग मला व्हीस्की आणखी रम यातुनी, कोण आवडे अधिक तुला? व्हीस्की दिसते गोजिरवाणी, थोडा सोडा थोडे पाणी बर्फ टाकूनी मजेत प्यावी, ग्लास भिडवूनी ग्लासाला व्हीस्की आवडे अधिक मला ! गोजिरवाणी दिसते व्हीस्की, परंतु असते भलती रिस्की सकाळ होता डोके चढते, जाउ न देई कामाला ! आवडते रे रम मला ! काळी, सावळी असते रम, थंडीमध्ये करी गरम कोल्यामध्ये मिसळूनी घेता, कळे न काही कोणाला रम आवडे अधिक मला! थंडीमध्ये करी गरम, नशेत नसतो काही दम व्हीस्की पिता विमान उडते, सुसाट जाई आभाळा व्हीस्की आवडे अधिक मला ! व्हीस्की पिता भान न उरते, भेदभावना सारी सरते व्हीस्की पिउनी मालक करतो, सलाम रात्री गुरख्याला व्ही
Taxonomy upgrade extras

मिसळपावचे धोरण..

Published on बुधवार, 06/02/2008
राम राम मंडळी, अधिक चौकशी करता असे कळले की जरी नामोल्लेख केलेला असला तरी कोणत्याही वृत्तपत्रातील अथवा मासिकामधील मजकूर संबंधित वृत्तपत्राच्या/मासिकाच्या लेखी परवानगीविना जसाच्या तसा मिसळपाव किंवा तत्सम संस्थळावर देणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तरी मिसळपाववरील सर्व सभासदांना नम्र विनंती की त्यांनी कृपया त्यांना अपेक्षित असलेल्या चर्चेकरता संबंधित वृत्तपत्रातील लेखाचा/बातमीचा/किंवा अन्य कुठल्याही लेखनाचा इथे फक्त दुवा द्यावा. ते लेखन इथे जसेच्या तसे कॉपीपेस्ट करू नये.. मिसळपाव डॉट कॉम कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर भानगडींत अडकू इच्छित नाही.

(काहीच्या) काही चारोळ्या

Published on बुधवार, 06/02/2008
१. सोबत कुणी असेल, तर सिनेमा पहायला अर्थ आहे एकट्यानेच पाहायचा असेल, तर अंधारही `व्यर्थ' आहे! २. गावाबाहेर आडोशाला एक पडका वाडा आहे तिथेच भरलेला माझ्या तारुण्यातल्या पापांचा घडा आहे ३. आपण भेटायचो ते झाड आत माझ्यासारखंच ताडमाड वाढलंय तिथेच माझ्या मुलानं माडीचं दुकान काढलंय! ४. बायकोच्या पाचव्या बाळंतपणाला मी तिच्याजवळ नव्हतो कारण तेव्हा वाढत्या लोकसंख्येवर मी भाषण झोडत होतो... ५. मी तुझ्याकडे यायला निघते पण तुझ्यापर्यंत पोचत नाही वाटेत २-४ मित्र भेटल्यावर त्यांनाही सोडवत नाही. ६. बोन्साय केलेल्या झाडालाही एकदा पालवी फुटली त्यालाही कळेना, ही `वाढायची' जिद्द कुठली? ७.
Taxonomy upgrade extras

शिवरायांची वंशावळ!

लेखक रम्या
Published on बुधवार, 06/02/2008
शिवरांयांच्या राज्याभिषेकाच्या काळात त्यांच्या दरबारातल्या काही लोकांनीच विरोध केला. आण्णाजी दत्तो हे त्यांपैकीच एक. सगळ्यांचा आक्षेप एकच होता की शिवराय हे क्षत्रिय नाहीत! अशावेळी भोसले धराण्याचं मूळ शोधण्याची आवश्यकता भासू लागली. ही जबाबदारी शिवरायांच्या दरबारातल्या बाळाजी आवजी चिटणीसांकडे देण्यात आली. संशोधनाअंती शिवरायांचं मूळ रजपुतांच्या सिसोदिया या क्षत्रिय घराण्याचं निघालं. या मूळ घराण्याला नंतर बरेच फाटे फुटले. घोरपडे घराणं हे या पैकीच एक. मूळ सिसोदिया घाराण्याच्या भोसाजी नावाच्या एका राजा नंतर "भोसले" हे आडनाव रुढ झालं. या वंशवॄक्षाची एक फांदी तंजावूर (तंजावर्)ला स्थयि़क झाली.