सांग मला रे सांग मला
व्हीस्की आणखी रम यातुनी, कोण आवडे अधिक तुला?
व्हीस्की दिसते गोजिरवाणी, थोडा सोडा थोडे पाणी
बर्फ टाकूनी मजेत प्यावी, ग्लास भिडवूनी ग्लासाला
व्हीस्की आवडे अधिक मला !
गोजिरवाणी दिसते व्हीस्की, परंतु असते भलती रिस्की
सकाळ होता डोके चढते, जाउ न देई कामाला !
आवडते रे रम मला !
काळी, सावळी असते रम, थंडीमध्ये करी गरम
कोल्यामध्ये मिसळूनी घेता, कळे न काही कोणाला
रम आवडे अधिक मला!
थंडीमध्ये करी गरम, नशेत नसतो काही दम
व्हीस्की पिता विमान उडते, सुसाट जाई आभाळा
व्हीस्की आवडे अधिक मला !
व्हीस्की पिता भान न उरते, भेदभावना सारी सरते
व्हीस्की पिउनी मालक करतो, सलाम रात्री गुरख्याला
व्हीस्की आवडे अधिक मला !
'तशी'च घेता रात्री भाई, थंडी वारा लागत नाही
सुखे बायको झोपे म्हणूनी, पुण्य लाभते पाप्याला !
रम आवडे अधिक मला !
नकोच रम, नकोच व्हीस्की, मदिरेहूनही विवाद रीस्की
थंडगार चल बियर पिऊ, काठोकाठ भरू प्याला!
बियर बरी तब्येतीला!
-अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
10594
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
जियो.....
िव्कास०१५
मस्त जमलेली कविता
मस्त
वा वा!
तात्काळ मार्गदर्शनाची अपेक्षा.
In reply to वा वा! by विसोबा खेचर
नं - १ कविता
अप्रतिम विडंबन
मूळ गाणे
<a href="http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/12.htm"></
हा हा हा हा हा हा हा
व्हीस्की
वा!!
असे चालणार ......
In reply to वा!! by केशवसुमार
वा अविनाश! टाळ्या!
तेच म्हणले की अजून कोणी "व्होडक्याचे" नाव कसे काढले नाही ...
In reply to वा अविनाश! टाळ्या! by मनस्वी
व्हिस्की
झकास
वा .....