Skip to main content

शिशिरमासी

लेखक चतुरंग
Published on सोमवार, 11/02/2008
बालकवींची अप्रतिम निसर्गकविता "श्रावणमासी हर्ष मानसी" ही आमची प्रेरणा.
Taxonomy upgrade extras

आम्ही कोण २ (शार्दूलविक्रीडित)

लेखक पुष्कर
Published on सोमवार, 11/02/2008
धोंडोपंतांच्या आम्ही कोण पासून प्रेरणा घेऊन आणि (अर्थातच) केशवसुत,केशवकुमार इत्यादींच्या ओळी चोरून ही चारोळी समर्पित करतो... आम्ही कोण म्हणोनि काय पुसता आम्ही उद्याचे रवी उल्लंघू सगळ्या दिशांपलिकडे आव्हान-क्षेत्रे नवी संचारू मनसोक्त वायुलहरींवरती पुन्हा एकदा पादाक्रांत करूनि टाकु सगळी धरती पुन्हा एकदा (कृपया र्‍हस्व-दीर्घाच्या चुका काढू नका.त्या मला माहीत आहेत. चारोळी जरा बरी वाटली, तर आणखीन पुढे विस्तार करावयास हरकत नाही. उत्साह असल्यास कृपया शार्दूल-विक्रीडित न मोडता करावी)
Taxonomy upgrade extras

पत्रास कारण की...

Published on सोमवार, 11/02/2008
परम मित्रवर्य सुशील, सर्वप्रथम आम्ही आमच्या अतिशय छोट्या अशा आंतरजालीय पत्राबद्दल बद्दल तुमची माफी मागतो. परंतु तुम्हास लिहिते करण्याचा आम्हासमोर हा एक उत्तम पर्याय होता. (आणि तसंच झालं. तुम्ही एकदम स्फोटक अस प्रती उत्तर दिलंत.) तुमची आमच्याबद्दलची तक्रार एकदम रास्त आहे . आम्ही याहूवर सचेत दिसत असताना तुम्हास कधी प्रती उत्तर केलं नाही. परंतु बरेच वेळा आम्ही आमचा याहू सचेत सोडून आम्ही घरी निघून जायचो. नाही म्हणायला तुमचे अचेत संदेश आम्हाला दिसायचे. परंतु काही तांत्रीक कारणास्तव आम्हाला आपणास उत्तर देणे जमायचे नाही. असो . आमचे सर्व क्षेम कुशल आहे.

आग लागो, `तसल्या' नजरेला!

Published on सोमवार, 11/02/2008
तसल्या नजरेनं तुला कधी पाहिलंच नाही रे (राजा!) ज्या वाक्‍यांची अस्मादिकांना सर्वाधिक तिडीक आहे, (आणि तरीही "कोवळ्या' वयात जे किमान दहा-बारा वेळा तरी ऐकावं लागतं,) अशापैकी एक वाक्‍य. परवा "असंभव'मधला एक लाडिक, मधाळ सीन पाहताना हे वाक्‍य डोळ्यासमोर नाचत होतं.

रव्याचे थालिपिठ...

लेखक प्राजु
Published on सोमवार, 11/02/2008
रव्याचे थालिपिठ... वेळ : ३० मिनिटे वाढणी : २-३ जण साहित्य : १. रवा - १ कप २. तांदूळ पिठी - २ कप ३. बारिक चिरलेला कांदा - १/२ वाटी ४. कोथिंबिर चिरलेली - मूठभर ५. हिरव्या मिरच्या एकदम बारिक चिरलेल्या - ३-४ ६. मीठ, धने-जीरे पावडर. ७. दहि ( आंबट गोड कसलेही) - १ ते १ १/२ वाटी कृती : १. प्रथम कांदा, कोथिंबीर, आणि मिरच्या एका बाऊलमध्ये घेऊन त्याला थोडे मीठ हाताने मळल्यासारखे लावून ३-४ मिनिटे ठेवावे. २. तांदूळपिठी, रवा आणि धने जिरे पावडर एकत्र करून घ्यावे. ३. या मिश्रणात आता मिठ लावून ठेवलेले कांदा-मिरच्या घालावे, पुन्हा चांगले मळावे. ४. आता यात थोडे थोडे दहि घालून मळून घ्यावे.

संडे स्पेशल ( व्हेज लसाने)

Published on रवीवार, 10/02/2008
हा एक इटालियन पदार्थ (पास्ता प्रकारात मोडणारा) आहे. साहित्यः लसाने :८ रेडीमेड लसाने शीट्स.( ३ इंच बाय ६ इंच) पालकः२० पाने देठ काढून ब्लांच करणे नंतर पाणी काढून टाकणे. चीजः ५० ग्रॅम चेडर चीज (ब्रिटानिया) ५० ग्रॅम मोझारीला (अमुल) टोमॅटो सॉसः ३टे.स्पून तेल (किंवा ऑलिव्ह ऑइल) १ ढोबळी मिरची बारीक चिरलेली १/२ किलो टोमॅटो (ब्लांच करुन , साल काढून बारीक चिरलेले) १/२ टी.स्पून ओरेगानो (वाळलेले चालेल) १/२ टी.स्पून काळी मिरी पावडर ( ताजी) २टे.स्पून टोमॅटो प्युरी १ टी.स्पून साखर १/४ कप कोथिंबीर (किंवा बासिल) मीठ चवीनुसार व्हाईटसॉसः ३ टे.स्पून बटर ३ टे.स्पून मैदा २चिमूट जायफळ पूड (नसले तरी च

आम्ही कोण?

Published on रवीवार, 10/02/2008
लोकहो, "आम्ही कोण?" या प्रश्नावर केशवसुत, केशवकुमारांपासून ते केशवसुमारांपर्यंत अनेकांनी कविता लिहिल्या असतील.
Taxonomy upgrade extras

झोप

लेखक वडापाव
Published on रवीवार, 10/02/2008
दुपारी माझा सूर्य उगवे मावळतीची नसे निश्चित वेळ जाग आल्यास झोपी जाण्याचा असाच आहे माझा हा खेळ सकाळी उठवून म्हणते आई शाळेला जायचंय कर घाई दोन मिनिटांत उठतो म्हणुनी माझी स्वारी झोपून जाई कविता पाठ होत नाही कडवे किती बडे बडे झोपेत बनवे मी कित्येक गाणी आनंदी आन
Taxonomy upgrade extras