Skip to main content

झोप २

Published on शुक्रवार, 15/02/2008
वडापावरावांच्या(आधीचे पाणीपुरी) झोप ह्या कवितेमुळे खडबडून जागा झालो व उत्साहाच्या भरात कविता सुचत गेली स्वप्ननगरीत माझ्या मी सोन्याने न्हाऊन निघालो आईने पाणी शिंपडल्यावर खडबडूनि जागा झालो स्वप्ननगरीत माझ्या ताकाचे प्याले मी प्यालो जरा जास्तच प्यायल्यामुळे खडबडूनि जागा झालो जिंकूनि क्रिकेट वर्ल्डकप मी माझ्या मायदेशी आलो मॅच हरल्याच्या बोंबा ऐकून खडबडूनि जागा झालो जेव्हा खरोखर जाग आली तेव्हा कळले झोपेत होतो आई म्हणाली मला माझी मी झोपेत बडबडत होतो -(सूर्यवंशी) बुध्दू बैल
Taxonomy upgrade extras

काव्यशास्त्रविनोद:। (काव्यशास्त्राद्वारे विनोद)

Published on शुक्रवार, 15/02/2008
चितां प्रज्वलितां दृष्ट्वा वैद्य: विस्मयम् आगत: । नाहं गतो न मे भ्राता कस्य इदं हस्तलाघवम् ।। भावार्थ -चितेला जळताना पाहून वैद्यबुवांना आश्चर्य वाटले, ते मनांत म्हणाले, ह्या व्यक्तिवर उपचार करायला मी सुद्धा गेलो नव्हतो आणि माझा भाऊ पण. मग कोणाचे बरे हे हस्तकौशल्य?

म्हशी

Published on शुक्रवार, 15/02/2008
एका ठिकाणी यज्ञविधी चालू असतो. पुरोहित पूजा सांगत असतात. त्याचवेळी तिथे अचानक दुसरा एक ब्राह्मण उपस्थित होतो. पूजा सांगता सांगताच पुरोहित त्या ब्राह्मणाला म्हणतो, अस्य मूर्खस्य यागस्य दक्षिणा महिषीशतम् । त्वया अर्धं च मया अर्धं विघ्नं मा कुरु पण्डित ।। ह्या मूर्खाच्या यज्ञात १०० म्हशी दक्षिणा म्हणून आहेत, तू अर्ध्या घे, मी अर्ध्या घेतो, (पण म्हशी दान केल्याने पुण्य नसते असे सांगून) हे पण्डिता ह्या यज्ञात विघ्न आणू नकोस.

आमचे पण फोटू....

लेखक अनिकेत
Published on शुक्रवार, 15/02/2008
पूर्वपुण्याईमुळे आम्ही केरळासारख्या निसर्गरम्य जागी शिकतो. केरळात अनेक लोक जातात, पण बहुतेक सर्व कोची च्या दक्षिणेकडचेच प्रदेश पहातात. उत्तर केरळातील जिल्हे... कन्नूर, वायनाड, कोळिकोड, माही, पल्लक्कड बहुदा पहात नाहीत.... त्यामुळे तिथे छान निसर्ग पहायला मिळतो. मी असेही म्हणायचे धाडस करीन की केरळासमोर कोकण काहीच नाही. नुकतेच आम्ही पुन्हा एकदा वायनाड ला गेलो होतो... त्याचे फोटू पिकासा वर टाकले आहेत.

सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर...

Published on शुक्रवार, 15/02/2008
प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी मात्र त्याला हे देखील शिकवा जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधूचरित पुरुषोत्तम. स्वार्थी राजकारणी असतात जगात तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेते असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही. मला माहित आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत...
Taxonomy upgrade extras

तुका झालासे कळस

Published on शुक्रवार, 15/02/2008
|| जय जय रामकृष्णहरी || लोकहो, आज माघ शुद्ध दशमी. आपल्या तुकोबारायांना याच दिवशी गुरूकृपा झाली. त्यादिवशी गुरूवार होता. त्यामुळे आजचा दिवस आमच्यासारख्या वारकर्‍यासाठी अत्यंत मोलाचा. त्यासंबंधी लोकांना माहिती व्हावी म्हणून हा लेखनप्रपंच. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरू श्री निवृत्तीनाथ, एकनाथमहाराजांचे श्री जनार्दनस्वामी तसे आमच्या तुकोबारायांचे गुरू बाबाजी होते. हे बाबाजी कोण होते, काय होते, कुठे होते याचा उल्लेख कुठेही नाही. पण तुकोबारायांनी त्यांच्याच एका अभंगात त्यांचा उल्लेख केलेला आहे. लोक असं समजतात की तुकाराम महाराजांच्या पाठी गुरूपरंपरा नव्हती. पण तसे नाही.

१७६०

Published on शुक्रवार, 15/02/2008
मी एकदा शिवडी पुलावरून चालताना सोंगट्या (गोट्यांची बहिण) विकायला ठेवलेल्या पाहिल्या, सहज मनांत विचार आला "सोंगटी" शब्द कशावरून आला असेल. मग लक्षात आले, "सोम+गोटी" चा बोलीभाषेतील उच्चार सोंगटी झाला. सोम म्हणजे पांढरा किंवा चंद्र. पांढरी किंवा चंद्रासारखी दिसणारी गोटी ती सोंगटी. तसेच आपण सहज म्हणतो, "ती मला १७६० गोष्टी सांगत होती". आता हा १७६० कुठून आला असेल असा विचार बरेच दिवस करत होते. पण उत्तर मिळत नव्हते. परवा सहज वाचले कि १७६० साली पानिपतची लढाई झाली.

स्वप्नातील पदर धुक्याचा (१)

लेखक मनमीत
Published on शुक्रवार, 15/02/2008
शेवटच्या वर्षाची परिक्षा संपली. रुद्रला हलकं हलकं वाटू लागल. महत्वाकांक्षी तो कधीच नव्हता, त्यात त्याला शिक्षण सुरू असतांच शेवटच्या वर्षी नोकरी मिळालेली. वडीलांचा व्यवसाय साधारणच व शेतीवर आधारीत असल्याने खात्रीशीर उत्पन्नाचा नव्हता, त्यामु़ळे पुढे काय ह्याचा फारसा प्रश्न त्याच्यापुढे किंवा त्याच्या मात्यापित्यांपुढे नव्हता. परिक्षेचा शेवटचा दिवस आणि नोकरीचा पहिला दिवस ह्यात साधारण ८ दिवसांचा अंतराळ होता. नोकरीच शहर पुण्यापासून बरच दूर होतं, येऊन-जाऊन ३६ तास लागत.

तुमचं सर्वात आवडतं ड्रिंक कोणतं?

Published on शुक्रवार, 15/02/2008
तुमचं सर्वात आवडतं ड्रिंक कोणतं? कसा झक्कास विषय आहे! सर्वांना भाग घेता येण्यासारखा आहे की नाही? पण थांबा, थांबा! जरा विचार करा. एकदम "बाजीराव-मस्तानी" असं ओरडू नका! हे ड्रिंक असतं हे मला आमच्या एका पुणेरी मित्राकडून समजलं. आम्ही या इतिहासातील व्यक्ति आहेत असं समजत होतो. :) तेंव्हा जरा विचार करा आणि मग सांगा. मात्र चर्चेत सामील होतांना खालील पथ्ये पाळूया, जरा मजा येईल... १. नुसतंच ड्रिंकचं नांव किंवा एकच वाक्य नसावे. जरा अधिक वर्णन द्या. २. ड्रिंक "अल्कोहोलिकच" असायची जरूर नाही. नॉन्-अल्कोहोलिक ड्रिंक्स सुध्धा चालतील. भगिनींना भाग घ्यायला आता हरकत नाही. ३.