Skip to main content

प्राजूला दोन दोन शुभेच्छा..! :)

Published on सोमवार, 18/02/2008
राम राम मंडळी, मिसळपावची सदस्या आणि आमची मैत्रीण प्राजू हिला वाढदिवसाबद्दल समस्त मिसळपाव परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा... प्राजू, हॅपी बर्थडे टू यू ...! :) आणि दुग्धशर्करा योग असा की आजच प्राजूच्या लग्नाचाही वाढदिवस आहे. त्यामुळे आपल्या मिसळपावचे जावई जगदिशराव आणि प्राजू या दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाबद्दल मिसळपाव परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा! :) तुम्हा दोघाचा संसार सुखासमाधानाचा होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...! तात्या. अवांतर - सध्या गडबडीत आहे परंतु नंतर जरा सवडीने आमच्या लाडक्या अनुष्काचं पेश्शल भेटकार्ड बनवून आम्ही ते इथे डकवूच! :) आपला, (अनुष्काप्रेमी) तात्या.

शीर्षक सुचत नाही - २

Published on रवीवार, 17/02/2008
'पाडणे' जरी मी तुझे चुकवले होते तोंडावर अमुचे काव्य अपटले होते 'त्या' विडंबनाचे दुःख कराया हलके का उगीच नवखे शब्द प्रसवले होते? लक्षात ठेव ते शेर दोन फसलेले (तू मुळात नुसते शब्द बदलले होते) राहिल्यात मागे नकोनकोशा ओळी ते घाव मी जरी सर्व विसरले होते थेंबातलि कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! नको तुला रे शंकाच तुझ्या कवनाची! बघ खुळे पुन्हा ते लोक हासले होते!!

(शीर्षक सुचत नाही)

Published on रवीवार, 17/02/2008
आमची प्रेरणा मिलिंद फणसेंना शीर्षक न सुचलेली गझल. लाटणे जरी मी तुझे चुकवले होते दारावर अमुचे तोंड अपटले होते साक्षीस ठेव हे दात दोन पडलेले तू मुळात ज्यांना जरा हलवले होते राहिल्यात मागे स्मृतिपोकळ्या आता ते घाव मी जरी सर्व विसरले होते 'ते' दुरावल्याचे दुःख कराया हलके मी मुखात नकली दात बसवले होते लीलया चघळले कर्वे मी जीवनभर ते ऊस सोलणे परी न जमले होते भ्रम,"केश्या"ला विडंबन आवडल्याचा रे खुळ्या, तुला हे लोक हासले होते !

आठवणीतली कविता

Published on रवीवार, 17/02/2008
घाटातील वाट, काय तिचा थाट, मुरकते गिरकते, लवते पाठोपाठ ।। निळी निळी परडी, कोणी केली पालथी, पान फुलं सांडली, वर आणि खालती ।। खाली खोल दरी, वर उंच कडा, भला मोठा नाग, जणू वर काढून फणा ।। भिऊ नका कोणी, पाखरांची गाणी, सोबतीला गात गात, खळाळतं पाणी ।। - बालभारती इ. ३ री (१९८४)

संडे स्पेशल ( कोळंबीचा भात)

Published on रवीवार, 17/02/2008
तात्यांच्या विनंतीला मान देऊन...... साहित्यः १/२ किलो कोलंबी १/२ किलो तांदुळ ४-५ वाट्या नारळाचे दुध (साधारण २ नारळाचे) १ टी.स्पून तिखट २ टी.स्पून आले, लसुण पेस्ट ( १ इंच आले व ७-८ लसूण पाकळ्या) १वाटी तेल मसाला (४ लवंगा,२ दालचिनीचे तुकडे, ४ वेल्दोडे, १/२ टी.स्पून जिरे, २ तमाल पत्रे) १ टी.स्पून गरम मसाला १ टी.स्पून बडीशेप, १ टी.स्पून जिरे पावडर १.टी.स्पून हळद चवीनुसार मीठ १.तांदूळ धुवून निथळत ठेवावेत. २.कोळंबी धुवून हळद व मीठ लावून ठेवावी. ३.पातेल्यात तेल गरम करून त्यात वरील मसाला घालावा.

मला आलेले एक स्वारस्यपूर्ण अग्रप्रेषित (Forward)

Published on शनीवार, 16/02/2008
दादरला चित्रा सिनेमाच्या समोरच्या गल्लीत शिरले की एक पोलीस चौकी लागते. तिला खेटूनच एक सायकल दुरुस्तीचे बिननावाचे एक छोटे दुकान आहे. हे दुकान श्री. भूमकर यांचे आहे ज्यांना लोक भाऊ म्हणून ओळखतात. ह्यांचे शिक्षण बेतास बात आहे मात्र वाचन सर्वांगीण आहे. दुकानात प्रवेश केला की समोरच हाताने लिहिलेले विविध फलक दिसतात ज्यावर अनेक संतवचने, सुवचने, मनोगते दिसतात त्या पैकी मला भावलेले काही विचार पुढे देत आहे - १) माणसाला तीन गोष्टी आल्याच पाहिजेत -पोहणे, सायकल चालवणे, झाडावर चढणे. २) कृपया आम्हाला अंकल म्हणू नका. अंकल बेवड्याला आणि आंटी गुत्ता चालवणार्‍या बाईला म्हणतात.

ओळख परेड(नविन सदस्यांची ओळख)

Published on शनीवार, 16/02/2008
मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत! काही नविन सदस्यांनी आपली ओळख करुन देण्याकरिता स्वतंत्र थ्रेड टाकले आहेत.त्यापेक्षा सर्वच सदस्यांना एकमेकांची ओळख सांगण्याकरिता या एकाच थ्रेडचा वापर करता येईल.अर्थात आपल्याला स्वतंत्र थ्रेड बनवण्याची इच्छा असल्यास आपणास त्याचे स्वातंत्र्य आहे(लोकशाही आहे हो आमच्याकडे),सदस्यांच्या सोयीकरिता हा खटाटोप. नविन सदस्यांना काही अडचणी जाणवल्यास त्या येथे टाकाव्यात,जाणकार सदस्यांकडून तत्काळ मदत होईल. आपलाच मिपाकरी, इनोबा

नमस्कार..

Published on शनीवार, 16/02/2008
नमस्कार! मी "अतिउत्साही" ! नवीन सदस्य ! बर्याच दिवसांपासून मि.पा. वाचत होतो. म्हटलं काहीतरी लिहावं. मी बरंच काही लिहीत असतो. ते लिखाण आंतरजालावर टाकण्याची ही माझी पहिलीच वेळ. बरंच काही मनात आहे, ते लिहून काढायचं आहे. तर हा श्रीगणेशा!