बतावणी
स्थळ - विष्णुलोक
नारद (क्षीरसागरात प्रवेश करत) : "नारायण! नारायण! देवा, आहात का?"
विष्णू (शेषशय्ये वरुन गडबडीने उठत) - "अरे वा! आज रविवारी सकाळी सकाळी इकडे कुठे चरणस्पर्श मुनिवर?"
नारद : "समस्याच मोठी बिकट आहे बघा देवा!"
विष्णू : "समस्या? बिकट? आणि ती ही तुम्हाला? अहो तुमचा तर त्रिखंडात हिंडण्याचा उद्योग (स्वतःशीच - कळ लावत)! "
नारद (चमकून) : "काय म्हणालात?"
विष्णू :" नाही, तुम्हाला कशी आली समस्या? म्हणालो मी"
नारद : " असं असं. आता पहा, तीन रात्रींपूर्वी मला स्वप्न पडले की माझे सर्व ज्ञान मी विसरुन गेलोय अगदी आत्मज्ञानासकट! आणि दुसर्या दिवशी उठतो तर काय खरेच मला काही स्मरणच होईना!
मिसळपाव