Skip to main content

ठाम मताचे आमचे बंडूतात्या

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 30/06/2008 05:11 या दिवशी प्रकाशित केले.
तसं पाहिलंत तर आमच्या बंडूतात्याना प्रत्येक विषयात आपलं मत द्दायची दिलचस्पी आहे.मग ते कोर्टकचेरी पासून राजकरणापासून साहित्या पर्यंत तात्या आपलं मत देत असतात.आणि त्यांच ते मत नेहमी ठाम असतं. मला एकदा म्हणाले, "ह्या विषयावर माझं ठाम मत आहे आणि ते कधीच बदलणार नाही." मी त्यांना म्हणालो, "बंडूतात्या,ठाम मत म्हणजेच न बदलणारं मत नां?का तुमचं न बदलणारं ठाम मत म्हणजे काही विषेश आहे काय?" अशा वेळी तात्या अळीमिळी गुपचिळी ठेवतात. जेम तेम हायस्कूल (मराठी मिडीयम)पर्यंत शिकलेले बंडूतात्या मधे कोर्टकचेऱ्यात दिलचस्पी घेवू लागले होते.कायदेबाजी आणि वकिली-न्याक ते सर्व शिकल्याशिवाय कशी येणार?पण "मला तितका काय गं

पहिल्या पाहुण्या संपादकाचे स्वागत...!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 29/06/2008 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की आमच्या या आवाहनाला साद देऊन आपल्या मिपा परिवाराचे एक सन्माननीय सभासद मुक्तसुनीत यांनी मिपाचा सर्वप्रथम पाहुणा सांपादक होण्याचे मान्य केले आहे. सोमवार दि ७ जुलै रोजी मिपाचा पहिलावहिला संपादकीय अग्रलेख तुम्हाआम्हा सर्व मिपाकरांना वाचायला मिळणार आहे. आम्हाला खात्री आहे की मिपाकरांना निश्चितच काही चांगले विचार वाचावयास मिळतील. अग्रलेख हा लेखनप्रकार निश्चितच एका आव्हानात्मक व अतिशय जबाबदारी असलेला प्रकार आहे अशी आमची धारणा आहे. तो केवळ नुसता एक लेख नव्हे!

परतुनी येईन मी....

लेखक अजिंक्य यांनी रविवार, 29/06/2008 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
परतुनी येईन मी.... जीवनाचे युद्ध चालू, कालपुरुषा जिंकण्या लागली माघार घ्यावी शस्त्र माझे टाकुनी दैव जरिही रुष्टले, आशा दिली ना सोडुनी परतुनी येईन मी उरली लढाई खेळण्या ॥१॥ कर्म माझ्या वाटचे, झाले न माझ्या हातुनी रंगुनी स्वप्नात पुढच्या, आज गमवुन बैसलो मार्ग माझा उजळण्याची वाट पाहत राहिलो भाग्य की, झालो शहाणा ठेच एकच लागुनी ॥२॥ अपयशाचा डंख जाणिव देत राही आतुनी आतल्या ज्वालामुखीची आग पेटवणार मी शस्त्र जरि गेले तरीही सोडले ना धैर्य मी जिंकण्या येईन मी ब्रम्हास्त्र सोबत घेऊनी ॥३॥ दौडुनी येईन सारी शक्ति एकवटून मी नेत्र उघडुन सज्ज होतिल दशदिशा मज पाहण्या परतुनी येईन मी उरली लढाई खेळण्या आणि मग ज
Taxonomy upgrade extras

लळा जिव्हाळा शब्दच मोठे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 29/06/2008 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
दहा वर्षाचा असताना त्याच्या बापाने आमच्या आई जवळ ह्याला आणून सोडले. "मला एव्हड्या मुलांचा व्याप आता जमत नाही.ह्याला तू तुझ्याकडे ठेव तुझ्याकडे उरेल सुरेल ते ह्याला घालून तुझ्याकडे कामासाठी ठेव आणि मला ह्या काळजीतून सोडव" असं सांगून गेल्यावर गेले सत्तर वर्ष रामा आमच्याकडे राहिला.
Taxonomy upgrade extras

खणले रे पथ

लेखक हेरंब यांनी रविवार, 29/06/2008 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे प्रेरणास्थान : फुलले रे क्षण माझे ...... खणले रे पथ माझे खणले रे ड्रेनेजच्या , हो s s टेलिफोनच्या आणि गॅ s sसच्या लोकांनी तुटले रे पथ माझे तुटले रे धुळीच्या लोटात गर्दीच्या पोटात भयभीत जीव फिरे डांबरीकरण, कांक्रीटीकरण लोकांचे मरण रे या वेडाच्या, आधीन शासन झाले मिंधे रे पैशांच्या थैलीने खणले रे ............. रीत ही दरवर्षीची थांबेना रहदारीची दुर्दशा साहवेना कुणा सांगु मी काय सांगु मी निबर मनास काही उमगेना पोटाच्या खळगीने खणले रे पथ माझे खणले रे
Taxonomy upgrade extras

रासलीला

लेखक पुष्कराज यांनी रविवार, 29/06/2008 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
लाख चांदण्या लखलख करीती आणि तारका दळे उतरती आज पोर्णिमा उतरुन आलि कालिंदीच्या तटी खेळतो रास सखा श्रीहरी भरल्या मेघा परि सावळा मोरमुकुट शिरी मदनची दुसरा श्रृंगाराला स्वरात भिजवी अधरी धरुनी बासरी खेळतो रास सखा श्रीहरी गोप गोपिका जमले सारे टिपरी वरती टिपरी गाजे त्या नादाला भूलूनी आले शिवही यमुनातिरी खेळतो रास सखा श्रीहरी वाळ्वंटी त्या यमुनाकाठी रास रंगता हरी संगती तनमन अवघे विसरुन जावे प्रेम भरूनिया उरी खेळतो रास सखा श्रीहरी विषय नव्हे हा ही तर भक्ती विसरूनी रमणे देहासक्ती देवांनाही वेड लावते अशी रासमाधुरी खेळतो रास सखा श्रीहरी
Taxonomy upgrade extras

अळकुळी तनु

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 29/06/2008 05:36 या दिवशी प्रकाशित केले.
weekend दिवशी चिमुकली तनुली आईला म्हणाली weekdays दिवशी असता मी सकाळी उठलेली पाहुन तुला घरात नसलेली होई मी किंचीत अळकुळी मग घेई मज आज्जी जवळी पाहुनी माझ्या डोळी म्हणे मला ती नको होवू तू अळकुळी तुजसम तुझी आई असता अशीच घेही मी पण जवळी तिला त्यावेळी पण जवळी असे मी तिच्या वेळी अवेळी पक्षिण उडे आकाशी परी लक्ष असे पिल्लाशी आहे ना मी तुझ्या जवळी मग का होतेस तू अळकुळी येइल तुझी आई संध्याकाळी श्रीकृष्ण सामंत

नको म्हणू रे मनुजा!

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 28/06/2008 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
हाच ब्लॉग बरा का तोच ब्लॉग बरा ही कविता बरी की ती कविता बरी हा ज्याचा त्याचा चॉईस असतो. निर्मिती ही निसर्गाची मानवाला दिलेली देणगी आहे.निसर्गात सुद्धा व्हरायटी असते.पण कॉपी कधीच आढळणार नाही.दोन जुळ्या भावंडात सुद्धा किंचीत असा फरक असतो.हे निसर्गाकडून शिकण्यासारखं आहे. अनुवाद झाल जरी तरी तो कॉपी कॅट नसावा.
Taxonomy upgrade extras