पहिल्या पाहुण्या संपादकाचे स्वागत...!
राम राम मंडळी,
आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की आमच्या या आवाहनाला साद देऊन आपल्या मिपा परिवाराचे एक सन्माननीय सभासद मुक्तसुनीत यांनी मिपाचा सर्वप्रथम पाहुणा सांपादक होण्याचे मान्य केले आहे. सोमवार दि ७ जुलै रोजी मिपाचा पहिलावहिला संपादकीय अग्रलेख तुम्हाआम्हा सर्व मिपाकरांना वाचायला मिळणार आहे.
आम्हाला खात्री आहे की मिपाकरांना निश्चितच काही चांगले विचार वाचावयास मिळतील.
अग्रलेख हा लेखनप्रकार निश्चितच एका आव्हानात्मक व अतिशय जबाबदारी असलेला प्रकार आहे अशी आमची धारणा आहे. तो केवळ नुसता एक लेख नव्हे! अग्रलेख लिहिणार्या लेखकाची दृष्टी अतिशय व्यापक असली पाहिजे व एखाद्या प्रकरणाचा सर्वतोपरी व सांगोपांग विचार करण्याची व ते विचार मांडण्याची हातोटी त्याच्याकडे असली पाहिजे.
लोकमान्यांच्या,
"सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?"
या अवघ्या एका अग्रलेखाने अक्षरश: खळबळ माजवली होती ही अग्रलेखाची ताकद आहे!
असो...
मुक्तसुनीत यांनी सुरवात केलीच आहे परंतु त्यानंतरही स्वत:हून काही मंडळी पुढे येतील व मिपाच्या संपादकीय अग्रलेखाची ही कल्पना अशीच चांगल्या प्रकारे राबवली जाईल असा विश्वास आम्ही बाळगतो. या निमित्ताने मिपाने एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आहे ते आपल्यासारख्या मायबाप मिपाप्रेमींच्या पाठबळ आणि भरवश्यावरच!
आम्ही समस्त मिपाकरांतर्फे मुक्तसुनीत यांचे आभार मानतो व त्यांना मनापासून शुभेच्छा देतो....
शुभं भवतु!
आपला नम्र,
तात्या अभ्यंकर.
आता जाता जाता थोडं ह घ्या - :)
मुक्तसुनीत यांना एकच जाहीर परंतु नम्र विनंती -
त्यांच्या पहिल्याच अग्रलेखाचे शीर्षक,
"तात्याचे डोके ठिकाणावर आहे काय?"
असे असू नये असे मनपासून वाटते! :)
आपला,
(टिळकभक्त!) तात्या.
वाचने
13085
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
फारच छान
उपक्रमाला
अरे वा
छान !!!
वा!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to वा! by नंदन
+१
वा!
मुक्तसुनीत ह्यांना शुभेच्छा !
वा वा!
In reply to वा वा! by चतुरंग
असेच म्हणते...
शुभेच्छा!
In reply to शुभेच्छा! by विकास
असेच म्हणतो
स्वागत
वाचायला उत्सुक
शुभेच्छा
हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छा
शुभेच्छा!
हार्दिक शुभेच्छा.....
मुक्तसुनी
वा!
आतुरतेने वाट - - - - -
है
मंडळी !
In reply to मंडळी ! by मुक्तसुनीत
मुक्तराव,
त्यापेक्ष
पाहुणा संपादक
शुभेच्छा.