Skip to main content

घेतली मिठीत आम्ही---

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 03/07/2008 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
घेतली मिठीत आम्ही मेघातली त्या वीज ती ठाउक हे होते जरी की आंम्हास हो जाळेल ती जाळणे हे काम तिचे तक्रार नाही आंम्हास हो घेतली होती मिठीत कौतुक त्याचे आंम्हास हो चटका जरी बसला असा पण हौस नव्हती भागली फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही वीज होती घेतली
Taxonomy upgrade extras

कणिक चकली

लेखक वैशाली हसमनीस यांनी गुरुवार, 03/07/2008 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
:P साहित्य--दोन वाट्या कणिक,एक डावभर लोणी,एक चमचा जिरे,मीठ्,हळद,तेल,पाव चमचा तिखट कृति--प्रथम कणिकेत लोणी ,जिरे,चवीपुरते मीठ्,हळद, तिखट घालावे. नंतर पाणी घालून पुरीइतके घट्ट पीठ भिजवावे.तो कणकेचा गोळा एका पात्तळ फडक्यात बांधून कुकरमधून वाफवून घ्यावा. गोळा पुन्हा चांगला मळून घ्यावा. नंतर चकल्या पाडून तळाव्यात. ह्या चकल्या अतिशय खुसखुशीत लागतात. वि.सू.-लोणी जास्त झाल्यास चकली तळणे अशक्य होते.

(स्वप्न)

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 03/07/2008 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा धोंडोपंतांची सुरेख गझल स्वप्न भेटण्याची काय पण ही रीत आहे? बुकलुनी म्हणते वरी ही प्रीत आहे आज पण घेऊन झाडू स्वागताला बायको अमुची उभी वस्तीत आहे राहिली आता न मजला शुध्द साधी मोडले पेकाट मी निपचीत आहे आठवण गेली तुझी चुकवून ठोका मी पुन्हा आता तिच्या धास्तीत आहे "केशवा"पुन्हा नको ते स्वप्न पाहू कालचा इतिहास हा स्मृतीत आहे ----केशवसुमार

स्वप्न

लेखक धोंडोपंत यांनी गुरुवार, 03/07/2008 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
भेटण्याची काय पण ही रीत आहे? टाळुनी म्हणतेस वरती प्रीत आहे गांजलेल्या माणसांच्या स्वागताला झोपडी माझी उभ्या वस्तीत आहे राहिल्या आता न चिंता कोणत्याही मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे आठवण गेली तुझी देऊन झोका मी पुन्हा आता गडे मस्तीत आहे ये भविष्याचे पुन्हा चल स्वप्न पाहू कालचा इतिहास त्या रद्दीत आहे ----धोंडोपंत आपटे
Taxonomy upgrade extras

(छंदात छंद तो प्रवासछंद --)

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 03/07/2008 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
(छंदात छंद तो प्रवासछंद, फिरण्या मन हे उल्हासिते ! ) चालः राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी ! -------------------------------------------------- छंदात छंद तो प्रवासछंद, फिरण्या मन हे उल्हासिते ! घेऊन बॅग, विसरुनी काम, ही वर्षा सहल सजते ! त्या सहलीच्या या आठवणींची गुंजी सतत राही ! आम्ही हो प्रवासी, सृष्टिचे आम्ही हो प्रवासी !! पावसाचा हा शिडकावा सकाळी लवकर निघताना ! ओल्या चिंब कपडयानी गाडीमध्ये बसताना !! हा दरवळणारा गंध मैत्रिचा मस्ती भरपुर होई !
Taxonomy upgrade extras

मिपावर लिहीणं धोक्याचं!

लेखक पिवळा डांबिस यांनी गुरुवार, 03/07/2008 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
("सोळावं वरीस धोक्याचं" या लावणीवरून स्फूर्ती घेऊन,) मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || कथा-लेख मी कसा लिहू? प्रवासवर्णन कसा करू? जागोजागी उभे "समीक्षक", निशाण बांधून मोक्याचं | मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || ओढ लागली खरडीची धम्या-डॉन्याच्या गंमतीची इनोबाही इथे नाचतो, बँडेज सावरत गुढघ्याचं | मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || तात्याची खादाडी खरी वरदा टाईम-पास करी नाना चेंगट गुह्य उकलती, "समभागां"च्या मटक्याचं | मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || चतुरंगाची बुद्धिबळं विजुभाऊचं स्वप्न खुळं स्वातीबाई कट्लेट तळते,
Taxonomy upgrade extras

उद्वेग विसरून कसं चालेल?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 03/07/2008 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात केव्हातरी मुखवटे चढवावे लागतात रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर भंगलेल्या तोंडाचेही मुके घ्यावे लागतात मी असा असतानाही मी तसा आहे ह्याचं नाटक करावं लागतं पण मग हे नाटकच आहे हे विसरून कसं चालेल? कसले कसले असले तसले झाले की मग असले तसले कसले कसले होतात आणि मग मी माझ्याच हिंमतीवर आलो आणि माझ्याच हिंमतीवर रहाणार असे म्हणताना ही हिंमत तात्पुर्ती आहे हे विसरून कसं चालेल? अंधार दूर करणारा प्रकाश पाहून कंदीलाचे आभार मानावे लागतात पण मग कंदील हातात धरून प्रकाश दाखवणाऱ्याला विसरून कसं चालेल? गेले ते गेले आणि राहीलेले पण जाणार असे म्हणताना आपण पण राहील्यातले आहो हे विसरून कसं चालेल? ज

पानी तेरा रंग कैसा?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 03/07/2008 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
"ज्ञान निर्मितीच्या क्रियेमधे जसं तू पहाशिल तसं तुला दिसत जातं.शास्त्रिय जगात एका पद्धतीत विचार करून मुलभूत शोध लागून ते शोध जवळ जवळ स्थापित झालेच आहेत असं समजून जाता जाता परत तेच शोध दुसऱ्या पद्धतीने विचार करून तेव्हड्याच हिरिरीने स्थापित करून दाखवले गेले आहेत. देवाचं अस्थित्व आहे आणि देवाचं अस्थित्व नाही हा पण त्यातलाच प्रकार असावा." मी आणि प्रो.देसाई तळ्यावर गप्पा मारत बसलो होतो.समोरून दोन उमदे तरूण येताना पाहिले.त्यात प्रो.देसायांचा नातू होता हे नक्की समजलं.पण दुसरी व्यक्ति कोण हे ते दोघे जवळ यई पर्यंत कळलं नाही.नंतर समजलं तो त्याचा मित्र होता. ह्या पुर्वी भाऊसाहेबांच्या नातवाने देवाचं अस

(...मी खरा की तू खरा?)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 03/07/2008 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रदीप कुलकर्णी ह्यांची '...मी खरा की तू खरा?' ही अप्रतिम गजल अनेक प्रश्न उभे करुन गेली आणि त्या प्रश्नांना वाचा फुटली ह्या काव्यातून! ........................................ ...मी खरा की तू खरा ? ........................................ बॉस मज माझा विचारी - मी खरा की तू खरा ? ही पुरे झाली 'हुशारी' - मी खरा की तू खरा ? मध्यरात्री काल मी जे काम त्याचे उपसले... आज तो म्हणतो दुपारी - मी खरा की तू खरा ? उत्तराची मेल नाही धाडता आली मला... प्रश्न आला तोच भारी - मी खरा की तू खरा ? शेवटी घोळात मी!

अध्यक्षपदाची फिल्डिंग!

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 03/07/2008 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी साहित्य संमेलन सान फ्रान्सिस्कोमधे होणार की नाही, हे अजून नक्की होत नसल्यानं भल्याभल्या कवी-साहित्यिकांच्या डोळ्याला डोळा नाही. महामंडळाचे पदाधिकारी- म्हण्जे कौतिकराव- गेल्या काही दिवसांपास्नं सदस्यांची यादी खिशात घेऊनच फिरतायत. ५१ जणांची नावं फायनल करून निमंत्रणाचा कागद त्यांच्याकडे पोहोचेपर्यंत कौतिकराव कुणालाच भेटणार नाहीत, असं महामंडळाचे भालदार-चोपदार सांगत सुटल्यानं साहित्यिक वर्तुळात खळबळ उडालीय. एक बरे झालेय. आम्च्या रत्नांग्रीकरांनी हा विशय लावून धरला, हे आम्हाला एकदम आवडले. संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी मंडळी नकोत, असा मातब्बर साहित्यिकांचा जुना आग्रह होता.