Skip to main content

उन्हाळा-१

लेखक दोयल यांनी सोमवार, 28/07/2008 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
होळी पेटली, पुरणपोळी खाऊन दुसरया दिवशी ची धुळवड खेळून झाली कि कपाटा वरचा टेबल फॅन खाली यायचा. रविवारी दुपारी जेवल्यावर त्याच्या आवाजच्या लयीत आपसूकच डोळे मिटायाचे. पांगारा लाल सडा घालायचा अंगणात, त्याच्या मखमली पाकळ्या आणि स्वर्गिय रंग.. आहा, भर दुपारी डोळ्यातून मनात उतरत जायचा.त्याचा मधहि तितकाच अफलातून असला पहिजे, पोपट (काहि काहि वेळा जंगली राखाडी पोपटंचे थवेच्या थवे उतरायचे पांगार्याच्या झाडांवर) बुलबुल, हळद्या, मैना, कोतवाल, धनेश, भारद्वाज, कवड्या असलेच आणि आणखीही अद्भुत पक्षी तिथे जमायाचे.

एक शून्य ......

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 28/07/2008 07:24 या दिवशी प्रकाशित केले.
कवड्या तुझी धाव आहे शुन्या कडून शुन्या कडे पंच्याऐंशी वाचनांनंतरही नि:शब्द जालाचे कडे ऐकून होतो मायाजाली दुर्लक्षील्या जातो जो नडे समजती अनुभवांती वेडे सरळास लाभती वाकडे प्रतीसाद आभास मायावी असतील काही सत्यही थोडे का अट्टाहास करशी भूलीचा जाणूनी पाखरू दूर जाया उडे

आगे बढो

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 27/07/2008 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
"खरंच,पाटी पुर्ण पुसून टाकल्यास जगात गुन्ह्यापासून झालेली होरपळ,आपण केलेली बदल्याची होरपळ, उघड उघड विसरून जावून जर का "आगे बढो" म्ह्टलं तर किती बरं होईल. " हल्ली त्यामानाने खूपच लोकांचे प्राण जातात.काहींचे अपघातात तर काहींचे मारामारीत,कांही मरतात आतंगवाद्दयाकडून वगैरे. हे शहरात जास्त होत असतं.

बुश:काल होता होता, `लाल'रात्र झाली...

लेखक अविनाश ओगले यांनी रविवार, 27/07/2008 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
बुश:काल होता होता, `लाल'रात्र झाली (आमची प्रेरणा: उषःकाल होता होता काळरात्र झाली !
Taxonomy upgrade extras

गणेशोत्सव

लेखक ऐका दाजीबा यांनी रविवार, 27/07/2008 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
टिळकांनी गणेशोत्सवाची स्थापना का केली? लोकांनी एकत्र यावे म्हणून. त्यांचा उद्देश साध्य झाला. लोक एकत्र आले. पण त्यांनी एकत्र येऊन काय केलं? गणेशोत्सवाच्या निमित्ताने दहा दिवस जो तमाशा चालतो, त्याबद्दल हा ऊहापोह. काही मंडळं निदान दहा दिवसांत काही वेळा तरी भजनं लावतात. पण विसर्जनाच्या दिवशी मात्र कहर होतो. अक्षरश: दारु पिऊन, "कोई मेरे साथ कोई रात गुजारे..." सारख्या गीतांच्या तालावर हे तथाकथित "गणेशभक्त" नाचत असतात. अरे, दारू पिऊन नाचायचंच आहे तर पब्ज मध्ये जा ना! त्यासाठी गणपतीची अशी विटंबना कशाला? खेदपूर्वक नमूद करावंसं वाटतं की टिळक जर आज हयात असते, तर त्यांनी आज गणेशोत्सव बंद केले असते!!

केळ्याचे धोणास (सांदण)

लेखक धनंजय यांनी रविवार, 27/07/2008 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्याच्या अमिताबाय सलत्री यांच्या "रुच्चीक" पुस्तकातून स्फूर्ती घेऊन : (शिवाय त्यात काय फरक करून मिपा ईशान्य यूएस कट्ट्यासाठी ही पाकृ केली, ते सोयिस्कर फरक.) साहित्य : अ.

पहाट

लेखक पंचम यांनी रविवार, 27/07/2008 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा लिहतो मी, तेव्हा लेखणीत उरतो मी, होऊन थेंब शाईचा, कागदावरी पसरतो मी...... जेव्हा पाहतो मी, तेव्हा स्वप्न सांधतो मी, होऊन ईंन्द्र्धनुश्याचे रंग, दाही दिशात सांडतो मी....... जेव्हा बोलतो मी, शब्द चोरतो मी, कधी हास्यांचे तर कधी आसवांचे दान फेकतो मी....... जेव्हा गातो मी, सप्तसुर होतो मी, होऊन भरलेले आभाळ जमिनीवर बरसतो मी....... जेव्हा नाव सांगतो मी, जरासा घाबरतो मी, बिनचेह-याच्या या गर्दीत स्वताची ओळख लपवतो मी.......
Taxonomy upgrade extras