Skip to main content

फोटोग्राफी - सिंहगड

लेखक मिंटी यांनी बुधवार, 20/08/2008 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही आमचा सगळा ग्रुप सिंहगडावर गेलो होतो मागच्या आठवड्यात्.......त्यावेळी तिथे काढलेले काही फोटो तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते........... हा सकाळी ७ ला काढलेला फोटो... दुपारी थोडे उन्ह पडल्यावर...........

जायचे होते कुठे पण...

लेखक शंकर पु. देव यांनी बुधवार, 20/08/2008 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
जायचे होते कुठे पण... गाव भलते लागले वाडवडिलांच्या घरावर नाव भलते लागले ॥ बाग ती गेली कुठे हे निवडुंग नुसते वाढले लावलेल्या त्या मुळावर घाव भलते लागले ॥ १ ॥ देवळाच्या दीपमाळा विकुनी कोणी टाकल्या आणि कळसालाही आता भाव भलते लागले ॥ २ ॥ गाव हे झाले जुगारी सर्व नाती संपली रोज या मातीत आता डाव भलते लागले ॥ ३ ॥

रावण राज

लेखक अमेयहसमनीस यांनी बुधवार, 20/08/2008 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
>:) शैक्षणिक संस्थांमध्ये वारंवार होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांवर उपाय म्हणून शिक्षकांनीच बंदूक घेऊन वर्गात सज्ज राहावे, असा ठराव टेक्‍सास राज्यातील एका शाळेच्या मंडळाने मंजूर केला आहे. असा निर्णय घेणारी ही अमेरिकेतील पहिलीच शाळा असून, वर्गात येणाऱ्या कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, या निर्णयाला पालकांनीही आक्षेप घेतला नाही. ~X( "हॅरॉल्ड इंडिपेंडंट स्कूल' असे या शाळेचे नाव आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे शाळेचे अधीक्षक डेव्हिड थ्वेट यांनी सांगितले.

लवचिक

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 20/08/2008 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
५० वर्शे झाली मराठी भाशेच्या प्रेमामध्ये पडुन. तसुभरही कमी झालेले नाही. रोजच्या कामामध्ये इंग्रजीचा जास्त वापर असतो. मला आवडो वा न आवडो. पालकांची आवड. काय करणार? किती लवचीक. किति सर्वसमावेशक. किती अर्थपुर्ण. अर्थामध्ये अर्थ. त्या अर्थामध्ये आणखीन एक अर्थ. इंग्रजीला जोडा आणखीन एक अर्थ.

वेदना

लेखक पंचम यांनी बुधवार, 20/08/2008 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
वेदना
त्या कोणत्या सावल्या होत्या ज्यांचा माझ्यावर अधिकार होता विस्कटलेल्या जखमांवर माझ्या नियतीचा प्रहार होता..... त्या सावल्याच होत्या की, ठिणग्यांचा पाऊस कारण झालेल्या जखमांनाही रेशमी किनार होता... आरक्त होऊनी पडले माझे शरीर खाली त्या जखमांनाही लागलेला सुरा धारदार होता..... वेदना कधी झाल्याच नाहीत त्या धारदार सुर्‍याच्या ज्याने दिल्या वेदना त्याचाच आधार होता...

अभिनंदन पुणे आणी पुणेकर्स

लेखक टारझन यांनी बुधवार, 20/08/2008 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या ३-४ दिवसांपासून मिपा वर जोरदार चर्चा सुरू आहे . डॉ. दाढेंच्या लेखाने विक्रमी 196 प्रतिसाद (या घडीला) गपापप खेचुन एक विक्रम आधिच प्रस्थापित केला आहे. त्याबाद्दल सर्व प्रतिसाद्यांचे, पुण्याचे आणि पुणेकरांचे मी अभिनंदन करतो. चर्चा जोरदार झाली कारण पुणेकर आणि पुण्याबद्दल असलेला त्यांचा अभिमान. कुठलाही देश,राष्ट्र, किंवा जागा परफेक्ट नाही. पुणं ही नसेल. ही गोष्ट सगळ्यांना मान्य. पण पुणे आपल्या ठराविक वैशिष्ट्यांमुळे आज जगात नाव राखुन आहे. पुण्याला सांस्कृतीक राजधानी ही सर्वमान्य जनतेने दिलेली पदवी. पण याचा बाकींना का विरोध कळलंच नाही. पुणे हे विद्येचे माहेरघर.

काश्मिरबद्दल अरूंधती रॉय : अनर्गल?

लेखक विसुनाना यांनी बुधवार, 20/08/2008 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
बुकर पारितोषक विजेत्या लेखिका आणि मानवी हक्क संरक्षण चळवळीच्या आघाडीच्या कार्यकर्त्या श्रीमती अरुंधती रॉय यांनी दिलेल्या एका मुलाखतीत "काश्मिरी लोकांना भारतापासून स्वातंत्र्य हवे असून भारतालाही काश्मिरपासून स्वातंत्र्य हवे आहे" असे विधान केले. भारताच्या स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत काश्मिरात स्वातंत्र्याचा धोशा लावला जातोय.परशूराम, शारदापीठ, सिंधू नदी, काश्मिरचे मुस्लिमकरण, श्रीनगर, भारताचे स्वातंत्र्य आणि फाळणी, टोळीवाल्यांबरोबरचे युद्ध, महाराजा हरीसिंग यांची शरणागती, काश्मिरची फाळणी आणि विलिनीकरण, प्रत्यक्ष

प्रो.देसाई काय म्हणतात.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 20/08/2008 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.बरेच दिवस तळ्यावर त्यांची भेट झाली नाही तेव्हां म्हटलं बरं तर आहे ना त्याना!. भाऊसाहेब वाचत बसले होते.मला पाहून त्याना बरं वाटलं असावं. मी म्हणालो, "भाऊसाहेब काय वाचता?विशेष काही तरी विषय असणार." भाऊसाहेब म्हणाले, "खूप दिवस टी.व्ही वर ग्रीनहाऊस इफेक्ट, एनव्हायरनमेंट,ग्लोबलवारमींग असे मोठे मोठे शब्द कानावर येतात.म्ह्टलं काय आहे प्रकरण म्हणून जरा इंटरनेटवर गेलो आणि ह्या विषयावर काही पुस्तकं चाळली.त्यातून रेकमेंड केलेलं हे पुस्तक लायब्ररीतून आणून वाचत होतो.काय म्हणता बसा चहा घ्या." मी म्हणालो, "भाऊसाहेब मी जरा घाईत आहे.तुमची फक्त खबर घ्यायला आलो होतो.तुम्ही

वेज फ्राय

लेखक चटोरी वैशू यांनी बुधवार, 20/08/2008 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! मी चटोरी वैशू.... मला मिपा खूप आवडली... आणि मी इकडे प्रवेश केला... माझी आवडती भाजी मी इथे देत आहे... बघा तुम्हाला आवडली तर... suggestions पण अपेक्षित आहे.... वेज फ्राय साहित्य : ३ बटाटे, १ पाव भेंडी, ५ मोठ्या मिरच्या, ८-९ पाकळ्या लसून, अर्धी वाटी मटार किंवा चवडीच्या शेन्गाचे दाणे, १/२ च. जिरे, १/२ मोहरी, हळ्द, मीठ, कोथिंबिर , तेल ३ टि.स्पून, मिर्चि पावडर चवीपुरता, १/२ गरम मसाला इ. कृती : बटाट्याचे सोलून पातळ पातळ काप करा (जास्त पातळ नाही किंवा जाड ही नाही... जे तेलात न करपता लगेच शिजतिल) . भेंडी ला मधुन चिर देवुन २ इंचाचे कापुन तूक्डे करा.