Skip to main content

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ २ पान १ ते २

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 19/02/2021 00:40 या दिवशी प्रकाशित केले.

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ २ पान १ ते २

1 2

जेव्हा अदम्य ऐसी

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 18/02/2021 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा अदम्य ऐसी निद्रा कवेत घेते आकाशभाषितांना ध्वनिचित्ररूप येते अंधार भिनत जाता भवताल स्तब्ध होते संवेदनांस अवघ्या व्यापून साक्षी उरते दिग्बंध सैल होती तर्कास काम नुरते कालौघ थांबतो अन् आभास सत्य होते अज्ञातशा स्वरांचा अनुनाद ऐकू येतो एकेक जाणिवेचा अस्पष्ट बिंदू होतो निद्रा अशी कृृृृपाळू अंकी तिच्या मी क्लांत मी शून्य एरवी, पण निद्रेत मी अनंत
काव्यरस

"पोंक्शा ~~~~ येतोस का डबा खायला ?"...

लेखक kvponkshe यांनी गुरुवार, 18/02/2021 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हा मुलांचे दहावीचे वर्ष असते .... आम्हा सगळ्यांना प्रिलिम चे आणि नंतर च्या SSC परीक्षेचे वेध लागलेले असतात ... शाळेय जीवन अगदी काही आठवड्यांचे राहिले असते... अभ्यास करूच , पण उरलेल्या दिवसात खूप मजा करून घेऊ अशी भावना असते सगळ्यांची .... पण शालेय जीवन निरागस असते अशी एक फसणूक करणारी समजूत आहे ... वर्गात एक मुलगा असतो .... गोरा ... घाऱ्या डोळ्यांचा ... काटकुळा ... संवादिनी वर काळी दोन च्या स्वरात पण नाकात बोलणारा ... त्याची ती "पोंक्शा ~~~~ येतोस का डबा खायला ?" अशी खर्जातील पण सानुनासिक हाक मला चांगलीच आठवते ... त्याच्या आजी बरोबर तो एका वाड्यात राही ...

सांगली येथे राहणारे कुणी मिपाकर आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 18/02/2021 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दिनांक, 23-24-25 फेब्रुवारी, 2021, ह्या दरम्यान, मी आणि आमची सौ. सांगलीला येत आहोत. 24 तारखेला, संध्याकाळी 5-7 ह्या दरम्यान, एखादा छोटासा कट्टा करता येईल का? सांगलीत पहिल्यांदाच येत असल्याने, ह्या शहराविषयी खूप काही माहिती नाही. कळावे, लोभ आहेच, तो वाढावा ही विनंती ....

गाठोड

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 18/02/2021 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
खतपाणी घातलं निगा राखली झाडाची बिज होत चागंल तरी फळे मीळाली विषाची वाटल झाड आहे दुबळं त्याला द्यावी साथ देणार्‍याचा अदांज चुकला तुटायला आले हाथ जरी ऋणानुबंधाच्या गाठी तरी प्रारब्धाचा खेळ कर्मच नाही चांगल तर जुळणार कसा मेळ आपल घर आपणच बाधांयचे पेरललं तेच उगवायचे क्षणभराची विश्रांती घेऊन पुन्हा इथेच यायचे कोण कुणाला पुरायचं म्हणूनच आतल्या देवाला निरंतर जागवायचं आयुष्याच गाठोडे आपण आपलच पेलायचं १६-२-२१

Ford vs Ferrari हा सिनेमा जरूर बघा ...

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 17/02/2021 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
मी रोज रात्री, एक तरी सिनेमा बघतोच...पण कधी कधी चांगला चित्रपट मिळाला नाही तर, Avengers जिंदाबाद... मी Captain Marvel बघत होतो, तितक्यात मुलगा म्हणाला, की हा सिनेमा किती वेळा बघणार? कालच मी, Ford vs Ferrari बघीतला.जबरा पिक्चर आहे.मुलांना, Tenet, Inception,.वगैरे सिनेमे आवडतात.आम्ही कुणीच, खानावळीत जेवत नाही. मुलांची आवड माहिती असल्याने, लगेच सिनेमा बघीतला.संवाद हिंदीतून असल्याने, सिनेमा समजायला पण सोपा गेला. Fordच्या गाड्यांची मागणी घटत असल्याने,मागणी वाढवायची असेल तर, फोर्डने गाड्यांच्या शर्यतीत उतरावे, असा सल्ला, ली आयकोका देतो.

'असेल घडले' आज काही इतिहासात :(

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 16/02/2021 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
असेल घडले आज काही इतिहासात पकडून का ऐकविले पाहिजे ते प्रत्येकास? असेल घडले आज काही इतिहासात लेखांची माळ का लावली मिपाच्या शेतात? असेल घडले आज काही इतिहासात आदळते डोळ्यांवर मिपा उघडताच असेल घडले आज काही इतिहासात घडू द्या तिकडे चला आपण जगू वर्तमानात असेल घडले आज काही इतिहासात स्क्रोलचा पर्याय आहे अजूनी हातात

टूलकिट (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 16/02/2021 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
अगं.. माझं टूलकिट दिसत नाही, पाहिलंस कुठे? अग्गोबई..तुम्ही पण तसल्या भानगडीत आहात का काय? तरी सांगत असते राजकारण आणि कसले कसले ग्रूप तुमचे द्या सोडून..उद्या काही झालं तर आपल्या अंगाशी येईल. आणि मित्र कसले तुमचे? सगळ्यांना अॅडमिन ठेवतात मेले. अगं पण ऐकून तर..! काही बोलूच नका. मी म्हणते कसलं पर्यावरण.. काय धाड भरली आहे पर्यावरणाला? इथे स्टेटस अन् फेसबुक पोस्ट करण्याने चीन थांबवणार प्रदूषण करायचा? उगा आपलं.. आपण बरे, आपले काम बरे. काय सांगतेय? काय बघताय आ वासून! झालं तुझ बोलून? आता ऐक. मागच्या आठवड्यापासून बेल वाजत नाही दारावरची, ती दुरुस्त करण्यासाठी टूल्स पाहिजेत. देवा..

अफसोस : पाहायलाच पाहिजे.

लेखक साहना यांनी मंगळवार, 16/02/2021 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
वेबसिरीज च्या दुनियेत हल्ली सेक्स आणि शिव्या ह्यांचा सुकाळ झाला असला तरी अनेक वेळा थक्क करून सोडणाऱ्या सिरीज सुद्धा येत असतात. अफसोस माझ्या मते खूपच उच्च दर्जाची कलाकृती आहे. अफसोस मध्ये काहींचं उणिवा नाहीत असे नाही पण माझ्या मते भविष्यांत भारतीय कलाकार काय काय जबरदस्त कथानके आणणार आहेत त्याचा एक डेमो म्हणून हि सिरीज पाहावी. अफसोस ची कथा खूपच वेगवान आहे. नकुल ह्या युवकाची जिंदगी अगदीच खराब आहे. ह्याने ११ वेळा आत्महत्या केली पण प्रत्येक वेळी ह्याला कुणी ना कुणी वाचवले आणि वाचविण्याच्या नादांत ह्याचा जीव गेला. हा माणूस इतका दुर्दैवी आहे के ह्याने रेल्वे ट्रॅक वर झोपल्यास सुद्धा हा मरत नाही.

शुन्य टिंब एक

लेखक नीळा यांनी सोमवार, 15/02/2021 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे माफी मागणे. पहिल्यांदा ज्या आयडी चा अकाऊंट माम्ही हॅक केलाय म्हणजे नीळायांचा..सर माफ करा पण माम्हचा पण नाईलाज आहे…माम्हची कहाणी ऐकली की तुला कळेलच…समजुन पण घ्यालच. दुसरी गोष्ट म्हणजे ईतर सगळ्या वाचकांना…. माम्हची भाषा तोडकी मोडकी वाटते ना?…म्राठी हि काही माम्हची योनभाषा नाही…आणि माम्हच्या दुनिया मधल्या काही संकल्पना.. शब्द तुच्या भाषेत नाहीतच. तर थोड समजुन घ्या… हळूहळू सवय होईल, माम्हालाहि आणी तूलाही. ईथेच कहाणी षांगायच मुख्य कारण म्हणजे यक्क.