Skip to main content

राती आभाळ रडलं

लेखक अनिल भारतियन यांनी गुरुवार, 21/08/2008 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
राती आभाळ रडलं अंधारी नाही दिसलं जीर्ण न शीर्ण वसन काजळले माझे सदन वटवॄक्ष मायेचा वठला झरा वाळवंटी आटला या नीरव रेतीमधले टोचतात निवडूंगी भाले मन छिन्न न खिन्नही आभाळी नक्षत्रही नाही या सांजसयीच्या प्रहरा शोधिते तो सायंतारा ..!! अनिल
Taxonomy upgrade extras

स्वामी अभिनयाचा `ऑफर'विना भिकारी!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 21/08/2008 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
http://saknsak.files.wordpress.com/2007/12/qayamat_wpaper2.jpg चि त्रपटसृष्टी फार निर्दय आहे. ती नको त्याला डोक्‍यावर बसवते आणि गरज असेल त्याला बाहेर फेकून देते. याच नियमानुसार एका अतिशय गुणी, प्रतिभावंत कलाकारावर सध्या अन्याय होतोय. गेली काही वर्षं तो पडद्यावर फारसा दिसत नाहीये. पडद्यावर काही वेळा दिसतंय, ते फक्त त्याचं नाव. तो आता (अभिनयाला कंटाळून की काय?) निर्माता झालाय. "खेल', "रक्त', "भागम्‌ भाग', "मिशन इस्तंबूल'सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे (म्हणजे परदेशात चित्रित झालेले) चित्रपट त्यानं काढलेत.

बर्ट्रांड रसल, माझा सर्वात आवडता लेखक

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 21/08/2008 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर> बर्ट्रांड रसल (Bertrand Russell) हा माझा सर्वात आवडता लेखक असल्यामुळे माझी मतं आत्यंतिक (चांगली) असण्याची शक्यता वाढते. मला संदर्भ म्हणून हा लेख लिहायचा नाही, तर फक्त एक ओझरती ओळख म्हणून! माहितीजालावर त्याच्याबद्दल खूप जास्त माहिती अर्थातच आहे आणि अनेक मिपाकरांना रसल आधीच माहित असेल. तर हा लेख त्यांच्यासाठी ज्यांना रसलबद्दल माहिती नाही, किंवा फक्त नावच ऐकून आहेत. थोडी माहिती या माणसाबद्दल आणि थोडी त्याच्या काही पुस्तकांबद्दल!

छायाचित्र

लेखक शितल यांनी गुरुवार, 21/08/2008 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
घुबड सफेद मोर तुरेवाला कोंबंडा आफ्रीकन कोंबंडा

७.२७ ची लोकल

लेखक पद्मश्री चित्रे यांनी गुरुवार, 21/08/2008 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी तिला प्रथम कधी पाहिले आठवत नाही, पन त्या लोकल ला ती नेहेमीच असायची, त्याच मधल्या लेडीज फर्स्ट क्लास मधे. एकटीच. होती साधीच. तिच्या कानाला लावलेल्या यंत्रावरुन समजत होत की की ती मूक-बधीर होती. ती खुप उदास आणि एकटी वाटायची.. आम्ही रोज समोरासमोर उभ्या असायचो पण हसण्यापलिकडे आम्ची ओळख नव्हती. वेळ लवकर ची असल्याने आणि ट्रेन डबल फास्ट असल्याने गर्दी जरा कमीच असायची.. काही दिवस असेच गेले आणि एकदा ती धावत पळत लोकल मधे चढली डोंबिवली ला आणि लेडीज्-जेंट्स डब्याच्या पार्टीशन जवळ उभी राहिली. २/३ मिनिटातच तिथुन एक मुलगा आला.. तिच्यासराखाच- मूक बधीर आणि तिच्या चेहेर्‍यावर हसु आलं..

माझी फोटोग्राफी - महाबळेश्वर.....

लेखक मिंटी यांनी गुरुवार, 21/08/2008 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी....... कालच्या फोटोंना दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद........ :) खूप छान वाटलं सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून.......... तुमच्या प्रशंसेने प्रेरित होऊन काही फोटो टाकते आहे.... आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो तिकडचे फोटो...... आशा आहे हे पण फोटो तुम्हाला आवडतील.......

गणपती विसर्जन

लेखक अमेयहसमनीस यांनी गुरुवार, 21/08/2008 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी गणेशमूर्तींची उंची आणि समुद्रातील विसर्जनाच्य नियमाना सामान्य मुंबईकरांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. मुंबईतील तब्बल १९ संघटनांनी पालिकेकडे आपल्या विभागात विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधून देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने ही मागणी तत्काळ मंजूर करीत त्या विभागात कृत्रिम तलाव बांधून देण्याचे मान्य केले आहे. सागरी पर्यावरणाचा धोका लक्षात घेऊन वांद्रे, खार, चेंबूर, वरळी, प्रभादेवी, मालाड, अंधेरी, दहिसरसह सुमारे १९ विभागांतील नागरिकांच्या संघटनांनी कृत्रिम तलावांच्या मागणीसाठी नुकतीच महापौरांची भेट घेतली. या संघटनांची एक बैठक नुकतीच महापौर निवासात झाली.

मंदाची बाईआज्जी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 21/08/2008 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
एक्दा गप्पा रंगल्यानंतर कुठचा विषय कसा येईल, आणि त्यावरची चर्च्या कुठे पोहोचेल हे सांगणं कठीण. असच आम्ही एकदा गच्चीवर गप्पा मारत बसलो होतो.का कुणास ठावूक विषय काय होता आणि मंदाने तो कुठे नेला.विषय होता त्यावेळची जुनी माणसं आणि त्यांच्या संवयी बद्दल.मधेच कुणीतरी कोकणातल्या समुद्राचा विषय काढला,आणि त्यावर आणखी काही सांगण्य़ापुर्वीच मंदाचा हुंदका ऐकला. मंदाला तिच्या आजीची आठवण येवून ती थोडी भावनावश झाली.तिला आजीचा विषय घेवून काही तरी सांगायचं होतं. म्हणाली, "माझ्या आजीला आम्ही बाईआजी म्हणायचो.विणकाम आणि शिवणकामात बाईआजीचा हातखंडा होता.