गणपती विसर्जन
लेखनप्रकार
महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी गणेशमूर्तींची उंची आणि समुद्रातील विसर्जनाच्य नियमाना सामान्य मुंबईकरांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे.
मुंबईतील तब्बल १९ संघटनांनी पालिकेकडे आपल्या विभागात विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधून देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने ही मागणी तत्काळ मंजूर करीत त्या विभागात कृत्रिम तलाव बांधून देण्याचे मान्य केले आहे.
सागरी पर्यावरणाचा धोका लक्षात घेऊन वांद्रे, खार, चेंबूर, वरळी, प्रभादेवी, मालाड, अंधेरी, दहिसरसह सुमारे १९ विभागांतील नागरिकांच्या संघटनांनी कृत्रिम तलावांच्या मागणीसाठी नुकतीच महापौरांची भेट घेतली.
या संघटनांची एक बैठक नुकतीच महापौर निवासात झाली. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी चौपाट्यांवर गणेशमूर्तींची होणारी विटंबना कुणाही श्रद्धावंतांच्या मनावर आघात पोचवणारी आहे त्यामुळे पालिकेचा कृत्रिम तलाव उत्तम पयार्य असल्याचे अनेक मंडळांनी या बैठकीत सांगत महापौरांच्या पर्यावरणवादी भूमिकेला पाठिंबा दिला.
आपली काय भूमिका आहे ?
वाचने
3747
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
चांगलि सुरुवात
.
शिवसेनेचा विरोध अनाकलनीय
उत्तम!
In reply to उत्तम! by मनस्वी
नाही होणार तसे बहुधा....
बुद्धी दे गणनायका...
- हे पाणी नंतर कुठे जाणार आहे?
- ते जर जमिनीत जाणार असले तर त्याच्यामुळे होणारे प्रदुषण हे समुद्रातील प्रदुषणापेक्षा जास्त भयावह असू शकते.
- जर पाणी नंतर नाल्यात सोडले जाणार असले तरी ते जमिन आजूबाजूचे पर्यावरण आणि नंतर समुद्र/खाडी/मिठी नदी /इतर नैसर्गिक प्रवाह पण प्रदुषित करणार. ते पण जास्त कॉन्सट्रेटेड पाण्याने. काही झाले तरी समुद्रात डायल्यूशन पटकन होते. याचा अर्थ मी काही करू नये असे म्हणत नाही आहे. पण जर या गोष्टींचा विचार केला नसला तर रोग आणि इलाज दोन्ही भयंकरच रहाणार आहेत.
- जर पाणी नंतर सांडपाण्याच्या पातळीइतके शुद्ध करून सोडणार असले तर त्याची काय व्यवस्था केली गेली आहे? त्या शुद्धीकरणासाठी पैसे ठेवले आहेत का कृत्रिम तलाव तयार करण्यासाठीच (आणि पर्यायाने त्या कंत्राटदारांना देण्यासाठी) पैसे ठेवले आहेत?
थोडक्यात ह्या बातमीमुळे उत्तरे कमी आणि प्रश्न जास्त तयार होत आहेत असे वाटले. आता बाकी गणेश मुर्ती आणि त्यामुळे होणार्या प्रदुषणासंदर्भात मला काय वाटते ते थोडक्यात -In reply to बुद्धी दे गणनायका... by विकास
हा घ्या दुवा ....
मुंबईच्या
घरगुती गणेशमुर्ती