लेखकनीतायांनी बुधवार, 10/09/2008 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
तु आयुष्यात आलास
श्रावणधारा सारखा
आषाढ्घनासम काळोख्या
मनात पेरलेस
चमचमते प्रीतिचे थेंब
आता तु नसलास तरी...
त्याच प्रीतीचे अकुंर आलेत मनभरुन
कधी कधी वहातात डोळ्यातून
अश्रुची फुले होउन.....
नीता
लेखकविनायक प्रभूयांनी बुधवार, 10/09/2008 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
गेली ३५ वर्ष ही अपराधीपणाची भावना काहीकेल्या पाठ सोडत नाही. नकळत झालेली चूक. वय पण लहान. आई मल्टीपल ऑर्गन फेल्युअरने के.ई.एम. मध्ये दाखल होती. आईचा छोटा म्हणुन माझी ड्युटी कायम हॉस्पिटलमध्ये. त्या २१ दिवसात डॉक्टर ह्या संस्थेवरचा विश्वास उडाला. शिकाउ मंड्ळीनी केलेले आईच्या देहाचे हाल याची देहा याची डोळा बघितले. आजही तो एक अविभाज्य भाग असतो डॉक्टर होण्याचा हे माहित असुन राग डोक्यातुन जात नाही.
आई जाण्यापुर्वी चार दिवस -रेसिडेन्ट डॉक्टर तपासुन गेले. एक्स-रे आणि इतर तपासणी करता आईला वॉर्डातुन हलवायचे होते.
आईला सारखी ग्लानी येत होती.
लेखकनाटक्यायांनी बुधवार, 10/09/2008 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
सालाबाद प्रमाणे यंदाही आमच्या घरी (बे एरिया, फ्रिमाँट) येथे रविवारी गौरीपूजन व भोजनाचा कार्यक्रम झाला. गौरीचा सगळा स्वयंपाक मी व आमच्या सौं. नी सकाळी ५:०० वाजता ऊठून सोवळ्यात केला होता. मिपातर्फे आमचे जुने मित्र 'एक' सहकुटुंब हजर होते. त्याची काही छायाचित्रे येथे देत आहे. सध्या फक्त गौरींचीच छायाचित्रे देत आहे. जमल्यास दर्शनाला आलेल्या ईतर मित्रांची सुध्दा टाकीन...
आमच्या सौ.
लेखकवेदनयनयांनी बुधवार, 10/09/2008 05:04 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतिच मटा वर ईथे बातमी वाचली. सुन्न झालो. असे का व्हावे - कारण काय?
एके काळी वर्षा रिडिफ वर लिहीत असत; ते मला खुप आवडे. पण गेल्या पाच-एक वर्षात त्या काय करीत ह्याचा पत्ता नाही. कुणाला माहित असल्यास जरुर सांगा.
लवकर बर्या होत हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
रोहित
लेखकबेसनलाडूयांनी बुधवार, 10/09/2008 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
सॅन होजे-सॅन फ्रान्सिस्को व परिसर बे एरियामधील मिसळपाव सभासदांचा कट्टा आयोजित करण्याचा मानस आहे. सर्किटराव व एक शी बोलणे झाले असून २७ सप्टेंबर २००८ अशी प्रस्तावित तारीख आहे. वेळ - स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४ ते ७ (प्रस्तावित)
प्रस्तुत प्रस्तावाचे/काथ्याकुटाचे उद्देश पुढीलप्रमाणे -
०. कट्ट्याची तारीख आणि वेळ सोईची नसल्यास पर्यायी तारीख आणि वेळ सुचवणे. जास्तीत जास्त सहभागींच्या सोईनुसार अंतिम तारीख आणि वेळ निश्चित करणे. सध्या उपलब्ध माहितीनुसार वरील तारीख आणि वेळ प्रस्तावित केली गेली आहे.
१. कट्टा कोठे भरवावा, याबाबत विचारविनिमय. इच्छुक सहभागींनी सूचना केल्यास उत्तम.
लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी मंगळवार, 09/09/2008 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
वेंगुर्ले या शब्दाचा अर्थ
"वेंगेत मारून उरले ते वेंगुर्ले".
वेंग म्हण्जे "कंबर".म्हणजेच "कंबरेवर ठेऊन उरले ते"
प्रेक्षणीय स्थळं पहाण्याची ज्याना आवड आहे त्यानी वेंगुर्ल्याला अवश्य भेट द्यावी.
लेखकवैशाली हसमनीसयांनी मंगळवार, 09/09/2008 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातून मलेशियात येताना लवकर परत न येण्याची खात्री असल्यामुळे,टिटवाळ्याला जाऊन फायबरची सुबक,सुंदर गणेशमूर्ति विकत घेऊनच(गणपतिची किंमत पैश्यात करणे अशक्य म्हणून सांगत नाही) विमानांत बसलो.मलेशिया मुस्लिम देश असल्यामुळे थोडी भीती वाटत होतीच.पण त्या गणेशानेच सारे कांही निभावून नेले.कस्टम अधिकार्याने आमच्याकडे लक्षसुध्दा दिले नाही.उलट टॅ़क्सी मिळवून दिली.गणेशकॄपा !