Skip to main content

एका सुन्दर मुलीसाठी

लेखक अनिरुद्धशेटे यांनी बुधवार, 17/09/2008 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
सुन्दर सुन्दर ओ तुझे जणू ऊषेची लाली शोभते डोळयतील इशारे बघुन ते भाळी कुन्कू लाजते कानात ग डूल तुझ्या कुन्द्कळ्यातुन झळके स्मित नाकातील नथनी गाते माझ्या प्रीतीचे गीत ! वार्याशी जणु झिम्मा खेलती बटा या भालप्रदेशी कानातुन किणकिणती पदके ही जणु खजुराहोची नक्षी ! केस तुझे ग गर्भरेशमी वाराही त्यातुन मोहुन वाहे वेडा होउन प्रत्येकजण हा चेहरा तुझाच पाहे ! अनिरुद्ध
Taxonomy upgrade extras

भरलेल कारल..

लेखक बेधुन्द मनाची लहर यांनी बुधवार, 17/09/2008 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- २-३ मध्यम आकराची कारली २ इन्चावर गोल कापुन घ्यावित,बिया काडून टाकाव्यात, आल्-लसुन पेस्ट ४ चमचे, सुके खोबरे अर्धा कप, मिर्चि पुड २ चमचे, मिठ , थोडासा गुळ, अर्धा लिन्बु , चिरलेली कोथिम्बिर, २ चम्चे गरम मसाला , तेल, क्रुती :- प्रथम एका बाउल मधे आल्-लसुन पेस्ट +सुके खोबरे + आवश्यक मिर्चिपुड + चविपुरत मिठ +चिरलेली कोथिम्बिर+२ चम्चे गरम मसाला+ गुळ + १ चमचा तेल घेवुन एकत्र करावे. वरुन लिन्बु पिळावे. हा तयार झालेला मसाला कारलेच्या प्रत्येक तुकड्यात भरावा.

सर्किट सांता क्लाराबा (कि क्लॉज) हे वागणं बरं नव्हं

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 17/09/2008 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय क्लाराबा, आपल्या सुपिक भांडारातुन निघालेल्या सुपिक कल्पनेला लवुन नमस्कार. प्रुस्ठभागावर हात ठेउन.(नविन पद्धत). कळ्विण्यास आनंद होत आहे कि आपल्या ह्या झक्कुने इथे बरीच धूम उडाली आहे. उदा. काही दंत वैद्य दात उपटायचे धंदे सोडुन आपलेच केस उपटत आहेत. तुमच्या प्राणघातक अटींचा परिणाम. ६० ऐवजी ८० असते तर कल्पनाशक्तीच्या उत्तुंग भरार्या पहायला मिळाल्या असत्या असे वाट्ते. तुम्ही डिग्री ओफ डिफिक्ल्टी वाढ्वुन काही जणाचा ग्रुह्पाठ बोंबल्विलेला आहे. इथे काही बालकानी आपल्या अटी पुर्ण वाचलेल्या नाहीत असे निदर्शनास येते. चांगल्या कथेला एखाद्या शब्दाची सुट असावी.

काही माणसं

लेखक ग्रीष्म यांनी बुधवार, 17/09/2008 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणस काही माणस जगत असतात मरणाच्या आशेने, थोडेच असतात वेडे जे चालत जातात सरळ मरणाच्या दिशेने. दगडाला वेदना टाकिचे घाव सोसतांना, त्या मूर्तीला यातना ह्या बडव्याना पोसताना. अहो वर्दिला दुखः नको त्याना सलामी, बंदुकी ढाळतात अश्रु नशिबी दहशतवादाची गुलामी. माइकचा कंठ दाटे भ्रष्ट मंत्री खोकताना, लाउड स्पिकराचा जीव जाई खोट्या घोषणा ओकताना. गेंड्यालाही शरम वाटे ह्यांची जाड कातडी बघताना, डासही मुकतात जिवाला रक्त्त यांचे शोषताना. खादीला लाज वाटे ह्या नंग्याना झाकताना, खाकीचा उर फाटे त्या दंग्याना थोपताना. तिरंग्याचा घुतातो प्राण पार्थिव त्यांच झाकताना. स्मशानाला नकोसा जीव प्रेतांचा दुख: सोसताना
Taxonomy upgrade extras

दुहेरी फायदा- (लघुकथा )

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 17/09/2008 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रपतीभवनातून एक वटहुकूम जारी करण्यात आला. या वटहुकूमाद्वारे सर्व लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचारी यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक लस टोचून घेणे, अनिवार्य करण्यात आले. वर्तमानपत्रातून आवेदन दिलं गेलं. निविदा मागवण्यात आल्या. कमी किमतीच्या निविदेवर शिक्का मोर्तब करण्यात आलं. त्यांना ऑर्डर देण्यात आली.लसीचे शिशे आले. डॉक्टर आले. या सगळ्या गोष्टी इतक्या झटपट घडल्या , की प्रथम कुणाला काही कळंलच नाही. शासकीय अखत्यारीतील कदाचित ही पहिलीच गोष्ट असेल, इतकी झटपट घडलेली !

काटा रुते कुणाला

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 17/09/2008 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
लाचलुचपतीचे विडंबन..... काटा रुते कुणाला? काटा रुते कुणाला? चरबीच जाड आहे. मज "फ़ूल" हे समजती, हा कृरभाग आहे ........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला? सांगू कसे कुणाला ते स्वच्छ शुभ्र बगळे चिरकाल चरणे त्यांचे, साहतात लोक सगळे ........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला? काही करू कसे मी? सारेच साव ठरले. भरतात पोतडी ते आडदांड बोके सगळे ........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला? ह्या शर्मवंचितांना काटा कधी रुतेना पाहूनी लूटमारी मज बोच सलत आहे ........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला? काटा रुते कुणाला? काटा रुते कुणाला? चरबीच जाड आहे. मज "फ़ूल" हे समजती, हा कृरभाग आहे ........ रुते कुणाला?
Taxonomy upgrade extras

लघुपाककृतीस्पर्धा

लेखक गणा मास्तर यांनी बुधवार, 17/09/2008 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नमस्कार, अनोख्या पाककृती ज्यांना करता येतात त्यांच्यासाठी ही लघुपाककृती स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहे. स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे १) पाककृती जास्तीत जास्त २० मिनिटांत करता येण्याजोगी हवी. २) घटक पदार्थांमध्ये साबुदाणा, कडीपत्ता, कोथिंबिर चिंच, गुळ, हिंग, सोडा, अंडी, कैरी यांचा समावेश नसावा. ३)खाद्यपदार्थ हा नाष्ट्यासाठीचा पदार्थ हवा.

झानटामाटीक ब्रेड.

लेखक लक्ष्मीकान्त यांनी मंगळवार, 16/09/2008 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रेडचे तुकडे करुन घ्यावे कान्दा बारीक चिरुन घ्यावे ,टोमाटो बारीक चिरुन घ्यावे प्रथम कडईत तेल गरम करुन त्यात जीरे घाला.नन्तर थोडि कोथिम्बीर व कडीपत्ता घाला. कान्दा लालसर तला.मग टोमटो घाला ,चविप्रमाने तीखट व मिठ घाला. सगल्यात शेवटि ब्रेड्चे तुकडे घाला.व ५ मिनिटे वाफवुन घ्या. टी वी पहात हा नाश्ता खावुन पाहा.