Skip to main content

दिड दिवस सुर्य....!!!

लेखक चिऊताई यांनी मंगळवार, 30/09/2008 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी असे ऐकले आहे कि १७ ऑ़क्टोबर २००८ रोजी सुर्य ३६ तास म्हणजे दिड दिवस आकशात दिसणार आहे, हे खर आहे का?

"मी" माझ्या शरीरापेक्षा भव्य आहे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 29/09/2008 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं असं झालं,नलू प्रधान मला अचानक खूप दिवसानी एका समारंभात भेटली.तिची आणि माझी लहानपणची ओळख.ती आणि तिचे आईवडील आणि तिची आजी आमच्या शेजारी राहायची. श्री.वा.य.प्रधान एअर लाइन्स मधे पायलट होते.काही दिवसाने त्यांचं कॅनडात मॉन्ट्रीयल इथे पोस्टींग झालं.नलू त्यावेळी सहा वर्षाची होती.नलू तशी दिसायला खूपच क्युट होती.पण बिचारी एक हाताने अपंग होती.आता मला ती भेटली तेव्हा ती मोठी बाई झाली होती.तिला दोन मुलं होती.तिचा पती फॉरेनर आहे.एका चांगल्या कंपनीत व्ही.पी.

सौभाग्याचे रंग-सौरंगी

लेखक रामदास यांनी सोमवार, 29/09/2008 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
दोन आठवड्यापूर्वी सकाळी हिंदुस्थान टाईम्सची कॅफे पुरवणी चाळत असताना जहांगीर आर्ट गॅलरीतल्या एका चित्र प्रदर्शनाचा फोटो पाहीला. फोटो पाहिल्यावर मी मंत्रमुग्ध झालो.पाच दहा मिनीटं माझ्या डोळ्यासमोर रंगपट उलगडत गेला. तपशील वाचल्यावर कळलं की ही चित्रं प्रदर्शनाचं नाव सौरंगी आहे आणि कलाकाराचं नाव आहे शंकर देवरुखे. त्या चित्राची मोहीनी एव्हढी जबरदस्त होती की त्या दिवशीचे बाकी सर्व कार्यक्रम रद्द करून मी जहांगीर आर्ट गॅलरीकडे पळत सुटलो. मनात अनेक शंका होत्या. आर्टीस्ट भेटेल का? आपण जर दाद दिली तर ऍकनॉलेज करेल का? जहांगीरच्या प्रदर्शनाची एक खासीयत असते. आर्टीस्ट फार व्यस्त असतो.

बंदिनी

लेखक जयवी यांनी सोमवार, 29/09/2008 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
जन्मजात लाभली बंधने जगातली कुशीत जरी पहुडली कोवळी कुमुदिनी ती एक बंदिनी, ती एक बंदिनी तरुणाई चिवचिवते स्वप्नी पंख पसरते जनकाच्या परी सदनी पराधीन नंदिनी ती एक बंदिनी, ती एक बंदिनी सप्तपदी चालता जोडवी हासती नजरकैद कुंकाची असून हृदयस्वामिनी ती एक बंदिनी, ती एक बंदिनी सांजकाली जीवनी पुत्र सुकाणू धरी पुनश्च वाट चालते पायी बेडी घालुनी ती एक बंदिनी, ती एक बंदिनी जयश्री
Taxonomy upgrade extras

एवढंसं आभाळ

लेखक जयवी यांनी सोमवार, 29/09/2008 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
कालच झी टिव्ही वर "एवढंसं आभाळ" हा सिनेमा बघितला. दिग्दर्शकानं फार सुरेख हाताळलाय हा नाजूक विषय. प्रतिक्षा लोणकर, आनंद शिंदे आणि ऋत्विक नाडकर्णी ह्यांच्या नैसर्गिक अभिनयाने अधिकच वास्तविक सुद्धा वाटतो. आई वडिलांचा घटस्फोट झालाय म्हणजे नक्की काय झालंय हे सुद्धा न कळण्याइतका भाबडा मुलगा....जेव्हा ते सगळं आपल्या कुवतीप्रमाणे समजून घ्यायचा प्रयत्न करतो... तेव्हा त्याची होणारी चिडचिड, सोबत आई-वडिलांची अगतिकता....... आणि मग अचानक त्याला मिळालेला मार्ग... असं काहिसं कथानक. प्रत्येक छोट्‍या मुलाचं आभाळ त्याच्या आई-वडिलांच्या आभाळातच असतं.....आणि तो तेच आभाळ आपलं समजत असतो.

स्वप्नसुंदरी

लेखक अनिरुद्धशेटे यांनी सोमवार, 29/09/2008 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नसुंदरी हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा भरला होता, तोच हात मेंदीने, तेव्हा रंगला होता ! नथनीचा तुझा त्यावेळी डौलच न्यारा होता, गालावरील लालीचा रंग लाजरा होता! डोळ्यांमध्ये निरागसता पराकोटीची जपलेली, गोष्ट माझ्या प्रेमाची तव ओठी लपलेली ! वाळवंटातही कोठेतरी हिरवळ थोडी असावी रखरखत्या या जीवनात माझ्या सावली तुझी मिळावी ! अनिरुद्ध
Taxonomy upgrade extras

धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 29/09/2008 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजूच्या फर्माईशीवरून हा लेख लिहीत आहे... धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना वार्‍यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना... उत्तरायण चित्रपटातलं एक अप्रतीम गाणं! 'धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना..' या पहिल्या ओळीत शुद्ध गंधाराचा व शुद्ध रिखभाचा सुंदर संवाद आहे. 'धुंद होते शब्द सारे' तल्या शुद्ध गंधाराला 'भावना' या शब्दातून शुद्ध रिखभाने फार सुरेख होकार भरला आहे. त्यामुळे गाण्याची ही पहिली ओळच फार छान वाटते, फ्रेश वाटते.. वार्‍यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना.. क्या बात है..

खरंच का आपण इतके भयंकर आहोत?

लेखक येडा खवीस यांनी सोमवार, 29/09/2008 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
आज दुपारी एका गॅरेजमध्ये गाडी दुरुस्तीसाठी उभा होतो. बाजुने एक कुत्री दबकत दबकत चालली होती, तिचे माझ्या हालचालीकडे लक्ष होते...नेमके मी जिथे उभा होतो तिथुनच तिला जायचे असल्याने अर्थातच तिला जाण्यासाठी वाट द्यावी म्हणुन मी जरा सरकलो, त्यावर दचकुन ती मागच्या मागे पळत सुटली...हे पाहुन मला सखेद आश्चर्य वाटले... इतकी वर्षे माणसांबरोबर राहुनही कुत्री-मांजरे किती भितात आपल्याला? माणुस हा इतका भयंकर प्राणि आहे का? मानव जातीच्या उत्क्रांतीबरोबर आज समस्त जगावर स्वत:चे अनभिषिक्त साम्राज्य माणसाने उभं केलय.

आठवणीतलं नवरात्र

लेखक भाग्यश्री कुलकर्णी यांनी सोमवार, 29/09/2008 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्रौत्सवात सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक गावचा नवरात्रोत्सव हा निरनिराळा असतो. मिरजेत असताना सोवळ्यातला स्वयंपाक हा विषय सोडला तर इतर कर्मकांड फारशी नव्हती. आजी गं. भा. होती. तर आजीचे मोठे दीर दशग्रंथी ब्राह्मण. त्यांना तर आजीच्या हातचे पाणी देखील चालायचे नाही. पण म्हणून माझ्या मैत्रिणी इतर जातीच्या आहेत (म्हणजे ब्राम्हणेतर) म्हणून त्यांना घरी मज्जाव नव्हता. मी ही त्यांच्याकडे मुक्त संचार करत असे. गावात एक अंबाबाईचं मोठं मंदिर होतं. (आजही आहे) वर्षभरातून कधी तरी त्या मंदिरात जाणारे आम्ही मात्र नवरात्रात दररोज जायचो. मंदिराच्या बाजूला जत्रा भरायची.

चल ग सजणे

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 29/09/2008 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
चल ग सजणे कश्शाला रड्ते रडताना, डोळ्यातले का़जळ वहाते चल ग सजणे कश्शाला रडते बाबा कळ्वळतात हाताना चोळ्त्तात म्हण्तात कशाला पाठीवले पोरीला परदेशात ती तिथे मी इथे भेट कशी रे चल ग सजणे, कश्शाला रड्ते स्पष्टिकरण : ही कविता ओळखा आणि बक्षिस मिळवा असे म्हणण्याइतका मी बावळट नाही आहे. भड्कमकर मास्तरांना खरड पाठ्विली होती , "मूद्देसुद घिसाड्घाई न करिता लेख कसे लिहावे ह्याचे गायडंस कराल का?" ह्या विषयावर. पण त्यांचे उत्तर आलेले नाही . कदाचित विद्यार्थी मंजूर नसावा. आण्खी एका सदस्याना विचारले(मराठी चे लज्जत पापड) पण त्याच्या घरी १० वी व १२वी आहे.
Taxonomy upgrade extras