Skip to main content

मिपाकरांकडुन मदतीची अपेक्षा....

लेखक खादाड_बोका यांनी मंगळवार, 30/09/2008 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांकडुन मद्तीची अपेक्षा..... कारण असे की मी आज अमेरीकेत घर(Single family house) विकत गेतले आहे. आज नवरात्रीच्या प्रथम दिवशी बँकेचे लोन close करणार, आणी गृह प्रवेश करणार आहे. भारतात गुरुजीना बोलावुन पुजा केली असती. पण ईथे कार्यकारी दिवस असल्यामुळे ते जमत नाही. तेव्हा कोणी मला थोडक्यात "गृह प्रवेश पुजा" या विधी कशी करायची, हे सांगीतले तर खुप मदत होईल.

कोण खरी

लेखक निखिलचं शाईपेन यांनी मंगळवार, 30/09/2008 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
खूप रागावलो मी कधी तर मग, माझीच नक्कल करुन हसवणारीस तू आणि कधी स्वताच फ़ूरंगटून बसणारीस तू कोण खरी ? कधी मग उगीचच साधी बस नाही मिळाली म्हणून रडवेली झालेली तू खरी .. की घाई घाईत तवा भाजला तरी ’काही नाही रे’ ’तू जा, उशीर झालाय ..घड्याळ काय शो साठी बांधलेस काय...’ म्हणून हसत पाठवणारी तू खरी कोण ? कधी दोन तासात ..फोन नाही केला म्हनून .. चिडनारी तू .. आणि कधी ’कित्ती वेळा फोन करतॊस रे..?’ ’आज काम नाहीए का तूला ...ठेवतेय मी’ मला रागावणारी तू ... कधी मग आशा - गुलजार ची गाणी मला समजावून सांगणारी तू .. की .. कधी चल AC मध्ये बसून गप्पा मारुयात .. म्हनून एखाद्या FLOP पिक्चर ला घेउन जाणारीस ..तू.. अगदी
Taxonomy upgrade extras

अजि म्यां बी बर्म पाहिले...

लेखक अरुण वडुलेकर यांनी मंगळवार, 30/09/2008 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
स्वर्गातल्या त्या सुरम्य उपवनात बहरलेल्या प्रजक्ताखाली भाईकाका मनातल्या मनात एक बंदिश जमवीत होते. तितक्यात वाघ मागेलागल्यासारखे धापा टाकीत रावसाहेब पुढ्यात येऊन ठाकले. " अहो पी यल्ल! हितं काय करताय एवढं सक्काळी, सक्काळी म्हणतो मी?" " कांही नाही हो. एक चाल बांधत होतो. कां? काय झालं?" " ते चाल लावायचं सोडून सोडा हो. खाली कुणी तरी करतंय हो ते काऽऽम." "अरे वा! खाली कांही नवीन मंडळी सांगितिक प्रयोग करताहेत असं कानावर आलं होतं. तुम्ही कुणाबद्दल बोलताय?" " कोण तर ते नवीन आहे बघा.

...संभवामी युगे युगे...पण आता कधी रे बाबा?

लेखक येडा खवीस यांनी मंगळवार, 30/09/2008 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीमद्व्भगवगीतेत श्रीकृष्णाने "जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म आणि अत्याचार वाढतील तेव्हा तेव्हा मी पुन्हा जन्म घेऊन त्यांचा संहार करेन" अशा अर्थाचे वचन दिले आहे. श्रीमद्भगवतगीता हा हिंदुंचा एक पवित्र धर्मग्रंथ असल्याने त्यातील प्रत्येक शब्द हा मंत्रस्वरुप आणि सत्य मानला जातो.

चमुन्डा मन्दीरात गर्दिच्या वेळी चेंगराचेंगरी होउन किमान ४० लोक मेले

लेखक विदुषक यांनी मंगळवार, 30/09/2008 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी राजस्थान मधील मेहरागड च्या चमुन्डा मन्दीरात गर्दिच्या वेळी चेंगराचेंगरी होउन किमान ४० लोक मेले काय चालले आहे हे ? http://www.bbc.co.uk/hindi/regionalnews/story/2008/09/080930_stampede_r… मांढरदेवी , हिमाचल (ठिकाणाचे नाव विसरलो आता ) आणी आता हे नविन १. लोक एखाद्या विशिष्ट दिवशिच अशी वेड्यासारखी गर्दी का करतात ? २. देव असेलच तर सगली कडे प्रत्येक दिवशी असायला पाहीजे ३.

ICICI Bank ???

लेखक छोटु यांनी मंगळवार, 30/09/2008 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा करां चा सल्ला हवा आहे !! काल पासुन असे एकण्यात येत आहे की ICICI या बॅंके मधे Money सुरशित नाहीय !! तुमचा सल्ला हवा आहे कारण माझी खुप गुंतवणूक काही आहे ICICI बॅंके मधे !!! मिपा चा छोटू !! [( [( [(

मातृमांगल्याचा महामहोत्सव.

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 30/09/2008 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
मातृमांगल्याचा महामहोत्सव आणि महाराष्ट्र्शारदेच्या चरणी एक छोटेसे कमळ.
आजपासून महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशभर मातृमांगल्याचा महामहोत्सव सुरु होत आहे. त्याचा सुंदर आढावा भाग्यश्री ताईंनी "आठवणीतलं नवरात्र" या लेखात घेतला आहेच. कृषी संस्कृती, मातृशक्ती आणि विद्याकलांची अधिष्ठात्री महासरस्वती यांच्या पूजनाचा त्रिवेणी संगम म्हणजे "शारदीय महोत्सव' आहे. आई जगदंबा भवानी ही अनेक प्रेरणांची स्त्रोत आहे. या अनेकविध प्रेरणेत शौर्य,शांती, भक्ति, बुद्धी, लेखन, कला इत्यादीचा समावेश होत असतो.

भेसूर रात्र (आणि आस्वाद)

लेखक लिखाळ यांनी मंगळवार, 30/09/2008 02:32 या दिवशी प्रकाशित केले.
भेसूर रात्र (आणि आस्वाद) काल अचानक मी बसलो उठून रात्री लक्षात आले मजला अमावस्या ती सर्वपित्री कुठलेच नव्हते आवाज कुठलाच रव नाही थरथरत्या फांद्या अन् झाडाला झोप नाही पिंपळावरील मुंजा हसतो भेसूर तेव्हा सळसळत्या पानांचा उच्चार अस्फुट होई भुंकती मध्येच तेव्हा रस्त्यावरील कुत्री ऐकण्यासाठी त्यांना कानांची लक्तरे उरली ... १. वरील कविता अक्षरगणवृत्तात आहे की मात्रावृत्तात की मुक्तछंदात यावर प्रकाश टाकावा ही विनंती. २. कवितेचा नक्की आशय काय असे कुणी विचारल्यास आम्ही पानभर लिहायला तयार आहोत. ३. या कवितेत लपलेला सामाजिक आशय सापडला का?

नारळाच्या वड्या

लेखक शाल्मली यांनी मंगळवार, 30/09/2008 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
नारळाच्या वड्या साहित्य :- एका नारळाचा चव जेवढा चव आहे तेवढी साखर २ मध्यम आकाराचे बटाटे (उकडून व साले काढून) थोडी वेलची पूड थोडी जायफळ पूड एका ताटाला तूप लाऊन तयार ठेवावे. कृती :- बटाटे कुस्करुन एकजीव करुन घ्यावेत. एका कढईमध्ये नारळाचा चव, साखर व कुस्करलेले बटाटे घेउन, मध्यम आचेवर ठेवावे.