खूप रागावलो मी कधी तर मग,
माझीच नक्कल करुन
हसवणारीस तू
आणि कधी स्वताच फ़ूरंगटून
बसणारीस तू
कोण खरी ?
कधी मग उगीचच साधी बस नाही मिळाली म्हणून
रडवेली झालेली तू खरी ..
की घाई घाईत तवा भाजला तरी
’काही नाही रे’ ’तू जा, उशीर झालाय ..घड्याळ काय शो साठी बांधलेस काय...’
म्हणून हसत पाठवणारी तू
खरी कोण ?
कधी दोन तासात ..फोन नाही केला म्हनून ..
चिडनारी तू ..
आणि कधी
’कित्ती वेळा फोन करतॊस रे..?’
’आज काम नाहीए का तूला ...ठेवतेय मी’
मला रागावणारी तू ...
कधी मग आशा - गुलजार ची गाणी
मला समजावून सांगणारी तू ..
की ..
कधी चल AC मध्ये बसून गप्पा मारुयात ..
म्हनून एखाद्या FLOP पिक्चर ला घेउन जाणारीस ..तू..
अगदी परवाचीच गोष्ट का गं?
रस्त्यावरच्या त्या पिल्लाला उचलून ..
जररा आत सोडून आलो तर,
’चल आता घरी जाउन हात धू ..’
की
त्याच संध्याकाळी ..
’काय मस्त होते ना रे ते पिल्लू’
’थोडा वेळ आणिक धरले असतेस तर ..
मी ही हात लावला असता ना ? अगदी मऊ असेल ना रे?’
नाराज होणारी तू
मी म्हनालॊ मग ..
’कशी अशी दोन्ही बाजूंनी बोलतेस’ तर..
’कूठल्या रे दोन बाजू .. ? मला confuse नकोस करु’, म्हणालीस ..
कोण .. confuse आहे गं ?
तू की मी की मग दोघंही.. ?
काल तूला मग विचारलेच ...न रहावून...
’खरचं यातली कोण "खरी" तू...
तेव्हा ..
’कित्ती observe करतोस .. रे मला ’ ..
म्हणून डोळ्यात पाणी आणनारी तू..
की लगेच डोळे ... नाक.. पूसून मग
’तू सगळया पोरींना अस्सेच का रे observe करतोस ..?’
डोळा मारत खिद्ळनारी तू ?
कोण खरी?
-निखिल पुरवंत ..(२९ सप्टेंबर ०८)
(purwant.blogspot.com)
मिसळपाव
प्रतिक्रिया
जब्ररा ...
निख्या .. मिसळपाव वर यायला वेळ लावलास लेका ...
तुझी विचारांचे मयुरपंख फार कुठे कुठे झेपावतात .. तुझी कविता वाचुन आम्हास 'इनो' शोधावा लागतो ...
हे एस-क्लास
अजुन येउन दे रे ...
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
नक्की रे
In reply to जब्ररा ... by टारझन
नक्की रे मित्रा ...
कविता आवडली.
मस्त कविता केली आहे.
:)
थेंक्स
In reply to कविता आवडली. by शितल
थेंक्स शितल ..
छान
आवडली कविता.
मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
आभारी आहे
In reply to छान by मनस्वी
आभारी आहे ..
आणि खराय .. डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली .. की मला acidity .. होत नाही ..
वा..व्वा...
हा काव्यरुपी प्रेमालाप फार आवडला बुवा. 'कोहंम्' सारखाच गहन प्रश्न. असं म्हणतात साक्षात ब्रह्मदेवालाही ह्याचे उत्तर माहित नाही. असो.
अभिनंदन.
आभारी आहे
In reply to वा..व्वा... by प्रभाकर पेठकर
आभारी आहे दोस्ता ..
मस्त आहे
कविता आवडली....
मस्त आहे
In reply to मस्त आहे by स्वाती राजेश
थेंक्स ..
छान...
निखिल, मस्तच आहे रे कविता. आवडली.
बिपिन.
अरे ही कविता मी वाचली आहे..
तू टारझन चा मित्र आहेस का?
त्याने ही काल मला दखवली होती कविता.
खूप आवडली होती..
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
मस्तच
निखिल..... एकदम गोड कविता आहे रे..!!
मस्त
कविता आवडली. मिपावर स्वागत. सभासदनावही छान आहे :)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
कविता आवडली.
मिपावर स्वागत !
लय मस्त
लय मस्त कविता..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
कविता आवडली
निखील स्वागत.
अजुन लेखन येउ दे.