मिपाकरांकडुन मदतीची अपेक्षा....
मिपाकरांकडुन मद्तीची अपेक्षा.....
कारण असे की मी आज अमेरीकेत घर(Single family house) विकत गेतले आहे. आज नवरात्रीच्या प्रथम दिवशी बँकेचे लोन close करणार, आणी गृह प्रवेश करणार आहे. भारतात गुरुजीना बोलावुन पुजा केली असती. पण ईथे कार्यकारी दिवस असल्यामुळे ते जमत नाही. तेव्हा कोणी मला थोडक्यात "गृह प्रवेश पुजा" या विधी कशी करायची, हे सांगीतले तर खुप मदत होईल.
वाचने
4880
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
ह्या विषयात मी नास्तीक आहे. क्षमस्व.
भौ, सर्व प्रथम नवीन घराबद्दल अभिनंदन. आम्ही या विषयातले जाणकार नाही. जाणकार मिपाकार मदत करतीलच.
तोवर या दुव्याचा काही उपयोग होतो का पाहवे.
-गणपा
In reply to शुभेच्छा.. by गणपा
धन्यवाद रे गणपा...चांगला दुवा आहे ... :)
मला तर स्वप्नातही भुक लागते....
तुम्ही अमेरिकेच्या कुठल्या भागात आहात?
बोकेसाहेब,
आईवडिल तिथे नसून जर भारतात असतील तर त्यांचं स्मरण करा, मनातल्या मनात त्यांना मनोभावे नमस्कार करा आणि करा गृहप्रवेश...! :)
शिवाय वाटल्यास,
लालबागच्या राजाला, आणि आई एकविरा मातेला, आणि हनुमंताला मनातल्या मनात दंडवत घाला आणि करा गृहप्रवेश...:)
आपला,
तात्या भिक्षुक.
अभिनंदन.
मी जेव्हा अमेरिकेतल्या आमच्या घरी गृहप्रवेश केला तेव्हा भारतातल्या भटजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही असे केले.
आधी थोडे सामान नेऊन ठेवले होते.पण रात्री तिथे झोपलो नाही.
चांगला दिवस पाहिला.
सकाळी आम्ही नविन घरी पोचलो.बरोबर कूंकू ओले करून,देव ,फुल, दूध ,पातेले ,गणपती चे स्टिकर घेतले होते.
किल्लीने दार उघडले.गणपती चे स्टिकर दारावर चिटकवले.
मी (घरची स्त्री म्हणून) ओल्या कूंकवाने दारावर शुभ लाभ लिहिले.मी उजवा पाय आधी घरात टाकला. मी आत आल्यावरच यजमान ,मुलगा घरात आला.
यजमानांनी हातातल्या ताम्हणातल्या देवांना घराचा काना न कोपरा दाखवला.मग देव टेबलावर ठेवले.सुपारी गणपती मानून पूजा केली.आरती केली.
पातेल्यात दूध तापवले व थोडेसे ओतू जाऊ दिले.(symbol of abundance).
नंतर थोडी खिर केली नैवेद्य दाखवला.
त्या रात्री पासून तिथे राहू लागलो.नविन घरात देवांना एकटे ठेवायचे नसते.
अधोरेखित केलेले महत्वाचे आहे असे भटजींनी सांगितले होते.
मीनल.
In reply to गृहप्रवेश by मीनल
मी उजवा पाय आधी घरात टाकला. मी आत आल्यावरच यजमान ,मुलगा घरात आला.
डावा आधी का नाही टाकलात? उजव्या पायाचे काही विशेष महत्व म्हणून?
माणसाला उजव्या पायाची जेवढी आवश्यकता आहे तेवढेच डाव्याचीही आहे ना?
तात्या.
In reply to मी उजवा by विसोबा खेचर
माणसाला उजव्या पायाची जेवढी आवश्यकता आहे तेवढेच डाव्याचीही आहे ना?
मग दोन्ही पाय एकदम टाकावे लागतील. आणि प्रथम पावलाबरोबर आपोआप साष्टांग नमस्कार घडला असता.
असो. :) घरात प्रवेश करताना. आई वडीलांचे स्मरण करा. अडीअडचणीत साथ देणार्या मित्राना आठवा. त्यांच्या शुभेच्छांवर तर आपण उभे असतो.
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
बोकोबा नवीन घरासाठी अभिनंदन रे :)
वर उपाय दिलेच आहेत. आणि दक्षिणा (कदाचित थोडी जास्त) द्यायची तयारी असेल तिकडेही भटजीबुवा मिळुन जातील रे.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल..
मी सिद्धीविनायकाचे पुजन केले अ त्यानंतर दुर्गामातेची पुजा केली. नवीन घरातच प्रसाद म्हणुन शिरा केला, व नैवेद्य दाखविला.
स्वर्गीय आईचे स्मरण केले, व देवाला म्हणालो जसे जमले तसे पुजन केले. काही चुकी झाली तर क्षमा कर.
शनीवारपासुन तेथे राहायला जाउ. :) :)
मी मेरीलँडला रहातो. ईथे साऊथ ईंडीयन भटजी मिळतात, पण त्यांची पुजा सांगायची पद्धत ऐकदम वेगळी असते.
म्हणुन विचार केला की मिपावर मदत मिळेल. आणी त्याचा फायदाही झाला.
मला तर स्वप्नातही भुक लागते....
मनापासून केलेली कोणतीही पूजा देवाला पावते.. मात्रा स्वस्तिक काढू नकोस बाबा! पोलिस दार ठोठवत येतील.
In reply to नवीन घरासाठी अभिनंदन by लवंगी
स्वस्तिक आपल्यासारखे (सुलट) काढले तर काय होणारे? ते नाझींचे उलटे असते.
नास्तीक...