नारळाच्या वड्या
नारळाच्या वड्या
साहित्य :-
एका नारळाचा चव
जेवढा चव आहे तेवढी साखर
२ मध्यम आकाराचे बटाटे (उकडून व साले काढून)
थोडी वेलची पूड
थोडी जायफळ पूड
एका ताटाला तूप लाऊन तयार ठेवावे.
कृती :-
बटाटे कुस्करुन एकजीव करुन घ्यावेत.
एका कढईमध्ये नारळाचा चव, साखर व कुस्करलेले बटाटे घेउन, मध्यम आचेवर ठेवावे. हे मिश्रण सतत ढवळावे.
मिश्रण आळत आले की (कढईच्या बाजूला साखर-साखर दिसायला लागली की योग्य वेळ आली आहे असे समजावे.)
गॅस बंद करुन मग त्यात वेलची पूड आणि जायफळ पूड मिसळावी.
मिश्रण शेगडीवरुन खाली उतरवून पाच मिनिटे चांगले घोटावे.
तूप लावलेल्या ताटावर मिश्रण पसरवून वाटीने थापून घ्यावे. गरम असतानाच वड्या पाडाव्यात.
टिप्पणी : या वड्यांमध्ये बटाटा घातल्याने त्या खुसखुशीत होतात.
वडीचा आस्वाद घ्या :)
--शाल्मली

याद्या
7902
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
हा अगदी
ऐकले आहे
In reply to हा अगदी by रेवती
वा!!
अरे वा.
.
In reply to अरे वा. by शितल
बटाटा-नारळ
मी एकदाच खाल्ल्या होत्या.
मस्त..
.
In reply to मस्त.. by स्वाती दिनेश
आभार !