Skip to main content

प्रकाशचित्रे : सुख वाटे जीवा...

लेखक विसुनाना यांनी गुरुवार, 30/10/2008 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
"जाता पंढरीशी सुख वाटे जीवा..." हे तर खरंच! पण माझं पंढरपूर मात्र निसर्ग आहे. डांबरी सडका, काँक्रीटी इमारती, वाहनांचा गदारोळ,मोबाईलचा पाश, पोटापाण्याची चिंता, समाजातील पांढरपेशे उच्चभ्रू वर्तन यांपासून अधूनमधून दूर जातो. कोणी आपल्याला ओळखत नाही आणि आपणही कोणाला ओळखत नाही अशा ठिकाणी वृक्षवल्लींसोबत वारी करतो. निसर्गाशी गळाभेट होते.

मनोगत दिवाळीअंक

लेखक कौंतेय यांनी गुरुवार, 30/10/2008 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षॉ देखिल मनोगताने दिवाळी अंक प्रकाशीत केला आहे. इथे http://www.manogat.com/diwali/2008/index.html पहायला मिळेल. वैविध्यपुर्ण लेख/ कविता ह्यांची रेलचेल असणारा भरगच्च अंक वाचायला मिळतो आहे. अंकाची सजावट आणि तांत्रिक सफाई देखिल वखाणण्याजोगी आहे. येत्या काही दिवसांसाठीतर ही परवणीच असणारच आहे. पुढच्या दिवाळी पासुन मिसळपावने देखिल खास त्यांच्याच शैलीत चटपटीत चमचमीत अंक काढून आम्हा वाचकांना मेजवानी द्यावी. तुम्हाला कसा वाटला मनोगतचा दिवाळी अंक ते जरुर कळवा!

पालखी

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 30/10/2008 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वप्रसिद्धी: मनोगत दिवाळी अंक २००८ 'अनिवासी (पण) भारतीय' म्हणुनी दुखर्‍या किती ओळखी डॉलरने भरले खिसे पण मने प्रेमास का पारखी? आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा (विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी) आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी? 'आधी तू, मग मी' करीत बसलो, खोळंबली ना सखी! दुर्दैवा, इतके नकोस विसरू बाबा स्वत:ला कधी! माझे नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी आणखी? आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी

(आशिक मी अन माल भेटली होती 'कविता')

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 29/10/2008 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
अनिरुद्ध अभ्यंकरांची 'आवरताना काल मिळाल्या काही कविता' वाचली आणि आम्हाला भेटलेल्या काही 'कविता' डोळ्यांसमोर तरळून गेल्या!

भाऊबीज

लेखक mina यांनी बुधवार, 29/10/2008 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमराज पूजन केले जाते. या पूजेला ‘यम द्वितीया असे म्हटले जाते. या दिवशी बहिण आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळवे यासाठी पूजा करते. भाऊबीजेच्या दिवशी काय करावे? सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल लावून स्नान करावे. बहिणीने खालील मंत्र बोलून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. भ्रातस्तवानुजाताहं भुंक्ष्व भव मिमं शुभं।प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषत:।। तसेच भावाला गोड जेवण घालून त्याच्या कपाळावर टिळा लावावा. त्यानंतर भावाने बहिणीच्या पाया पडून तिला भेटवस्तू द्यावी.

अजाणता !

लेखक चाफा यांनी बुधवार, 29/10/2008 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
वैतागुन समिधाने हातातली डिझाईन्सची वही बेडवर टाकली. पुन्हा पुन्हा मन लाउन काढलेल्या तिच्या डिझाईन्स आत्ता तिला फ़ारच टाकावू वाटत होत्या, उद्याच तिला एका लग्नाच्या मेहंदीची ऑर्डर होती आणि तिच्याकडे अजुनही ज्या साठी ती ईतकी प्रसिध्द होती तश्या आगळ्यावेगळ्या डिझाईन्स नव्हत्या. तिच्या अप्रतिम डिझाईन्समुळेच तर ती नावा रुपाला आली होती, मोठ्या मोठ्या लग्नाच्या ऑर्डर तिला मिळत होत्या. पैसा ही महत्वाची बाब होतीच पण आता तिला प्रसिध्दीही मिळत होती.

Earth is flat.

लेखक कशिद यांनी बुधवार, 29/10/2008 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
me aathach he mahiti wacchi soory me english madhe marathi lihit aaje..pan mala rahaw le gele nahii plz hey tumhi sagle waacha ani thar wa ki aapla jag gol aahe ki sapaat http://theflatearthsociety.org/ saglya prashnachi uuttra welii aahet.. tumahala kaay waatat ki he website ani he mahiti khari aahe... me lahan aahe mala kahi kalat nahii baharwlela (akshay kashid)

पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...१

लेखक प्रभाकर पेठकर यांनी बुधवार, 29/10/2008 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी माझ्या वडिलांचे के. ई. एम इस्पितळात ऑपरेशन झाले. मी ६-७ वर्षांचा असेन. वडील इस्पितळात असताना आम्ही त्यांना भेटायला आई बरोबर इस्पितळात जात असू. तसेच इतरही बरेच नातेवाईक तिथे यायचे. मला इस्पितळाचे वातावरण आवडायचे. प्रत्येकाला स्वतंत्र पलंग, पलंगा शेजारी पांढर्‍या रंगाचे छोटेसे लोखंडी कपाट. त्यात सफरचंद, केळी, मोसंबी अशी विविध (आणि भरपूर) फळे. कितीही खा.. कोणी काही बोलणार नाही. माझे वडील विशेष खायचे नाहीत, मला आणि ताईलाच द्यायचे. तिथे खाण्यावरून आईसुद्धा ओरडायची नाही. नाहीतर घरी, 'काय मेला सारखं सारखं खाय खाय करतो? आत्ता जेवलास नं?' असे ओरडायची.

आजीची काठी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 29/10/2008 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजी, आजाला काठीवीना चालण्याचे आपले मनोदय सांगत असताना,ते संभाषण तानुच्या कानावर पडते.स्वपनाळू तानु दुसऱ्या दिवशी आपले स्वप्न आजाला सांगते. चिमुकल्या तानुला स्वप्न पडे पाहाटेला आजी आणि काठी एकमेकांशी बोलताना काठी म्हणे आजीला नको सोडू कधी मला संगतीत राहून तुझ्या महत्व आलेच मला आजी सांगे काठीला नकोच घालू गळ मला इतक्या वर्षाच्या सोबतीने आला कंटाळा तुझाच मला ऐकून त्यांच्या संभाषणाला म्हणे तानु स्वत:ला स्वप्नांत का असेना पाहीन माझ्या आजीला काठीवीना चालताना श्रीकृष्ण सामंत
Taxonomy upgrade extras