Skip to main content

श्रद्धा हाच मानवी जीवनाचा महत्त्वाचा ऊर्जास्रोत असतांना रामसेतूचा विध्वंस का ?

लेखक सनातन यांनी शुक्रवार, 31/10/2008 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धा हा मानवी जीवनाच्या अनेक ऊर्जास्त्रोतांमधील एक महत्त्वाचा ऊर्जास्त्रोत आहे. याला डावलून कोणतेच सामाजिक शास्त्र पुढे जाऊ शकत नाही. या ऊर्जेने मानवी जीवन सुखी होण्यास अथवा आलेली दु:खे भोगण्यास मदत होते. विज्ञानाची इच्छा, त्याचा उपयोग मानवी जीवन अधिक सुखी करण्यासाठीच आहे. विज्ञान हे एक माध्यम आहे, ते ध्येय नव्हे. ध्येय तर समाजाचे जीवन अधिक आनंदी करणे हेच आहे व असलेही पाहिजे. यासाठी त्या समाजाला काही घटना, काही वस्तू, वास्तू व व्यक्‍ती उपयुक्‍त ठरतात. सेतूसमुद्रम प्रकल्पासाठी सत्तेतील काहिजन त्यांच्या सहकार्‍यांसह धिंगाणा घालत आहे व रामसेतू उद्ध्वस्त करून श्रद्धांवरच घाला घालत आहे.

मिसळपावासंबंधी एक बातमी - (संपादित केले आहे)

लेखक संकेत यांनी गुरुवार, 30/10/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
विनाकारण वादविवाद वाढवणारी आणि चुकीची माहीती देणारी लिंक असल्याने बातमी संपादित केली आहे.

मुलीला आपली आई माहित हवी.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 30/10/2008 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
रेवती त्यांच्या भावंडात सर्वात लहान.तिला त्यामानाने आईचं सूख मिळालं नाही.आणि ह्याबद्दल तिला नेहमीच वाईट वाटत असतं.ती नेहमी म्हणते माझी आई असती तर मी तिला एका मागून एक प्रश्न विचारले असते. असं मला ती म्हणाल्या नंतर मी तिला विचारलं, " असे कोणकोणते प्रश्न तू तिला विचारले असतेस?" त्यावर ती म्हणाली, "आईला हसायला केव्हा यायचं?ती लहान होती तेव्हा कुणा देवाची प्रार्थना करायची?एखाद्या वाईट दिवशी ती कशी वागायची.?तिला लहानपणी गाणं गायला आवडायचं काय?रस्त्यावरून चालताना ती डाव्या बाजूने चालायची की उजव्या.?

जॉली

लेखक निखिलचं शाईपेन यांनी गुरुवार, 30/10/2008 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो ... कथा प्रकाशित करायला .. मिपावर काही तांत्रिक ..अडचण आहे.... तरी सध्या इथे वाचा आणि कळवा ... नंतर पोस्ट करतोच आहे.. इथे.... http://purwant.blogspot.com/2008/10/blog-post.html निखिल

मग मी असा ..शांत ...

लेखक निखिलचं शाईपेन यांनी गुरुवार, 30/10/2008 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
http://2.bp.blogspot.com/_9X0j7S4MiZw/SQnOxxeLa1I/AAAAAAAAAKs/bRims_stODs/s1600-h/mag+me+asa+shant.JPG किंवा ...क्लीक करा.. http://2.bp.blogspot.com/_9X0j7S4MiZw/SQnOxxeLa1I/AAAAAAAAAKs/bRims_stO… OR http://purwant.blogspot.com/ फोटो नी कविता एकत्र यावी म्हणून ..लिंक टाकली आहे. -निखिल
Taxonomy upgrade extras

कारी...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी गुरुवार, 30/10/2008 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
परवाचा लक्ष्मीपूजनाचा दिवस. एरवी एकटाच असतो. दिवाळीनिमित्त 'फ्यामिली' आली आहे इथे. ज्या दिवशी ते आले नेमकं त्या दिवसापासून रोज घरी जायला उशिर होत होता. दिवसभरात बायकोचा २-३ वेळा फोन येऊन गेला होता, आज लक्ष्मीपूजन आहे, आज तरी वेळेत ये घरी. त्या प्रमाणे थोडा लवकरच निघालो होतो. टॅक्सी पण मिळाली पटकन. म्हणलं आज खरंच चांगला दिवस दिसतोय. मस्त मूड होता. घरी जाऊन काय काय करायचं त्याचा विचार चालू होता. मस्त मुलींबरोबर मस्ती करायची, दाबून जेवायचं असले सुखासीन विचार चालले होते. एकीकडे टॅक्सी ड्रायव्हर साहेबांनी पण बोलायला सुरुवात केली. इथले बव्हंशी टॅक्सीचालक पाकिस्तानी आणि त्यातल्या त्यात पठाण आहेत.

संवाद-४ [ही मालिका नाही]

लेखक चाणक्य यांनी गुरुवार, 30/10/2008 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, हि काही कथा नाही किंवा कुठल्या कथेचा भागही नाही.हा आहे संवाद... दोघांमधला...दोन मित्रांमधला, प्रियकर- प्रेयसी मधला... दोन माणसांमधला....! हे संवाद मी जसे सुचले तसे लिहिले आहेत. यातुन काही सांगायचे वगैरे नाही. त्या त्या क्षणी जे विचार मनात येतात ते कागदावर उतरवतो. ते बरोबर असतीलही किंवा नसतीलही. या संवादातल्या पात्रांना नाव नाहीत, किंबहुना त्याची गरज भासत नाही इतके लहान संवाद आहेत हे. हे संवाद कुठलीही पार्श्वभुमी न देता अचानक सुरु होतात. एखादं गाणं जसं अंतर्‍यापासुन सुरु व्हावं तसं.

माझी गोष्ट

लेखक मूखदूर्बळ यांनी गुरुवार, 30/10/2008 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल माझ्या आयुष्यात काही तरी वेगळ घडतय. वेगळ म्हणजे नक्की काय ते अस सुसंगत पणे नाही सांगता येणार पण तरीही एक प्रयत्न करतो. आता हेच बघा ना मी कोण हे सांगायच्या आधीच तूम्हाला दूसरच काहीतरी सांगायला सुरूवात केली. अस हल्ली सारख घडतय. माझ मन थार्‍यावर नाही. कसली तरी टोचणी लागून राहीलीये मनाला. आता राहील मी कोण्?.सांगतो. माझ नाव राकेश. देसाई वकिलांकडे मी असिस्टंट म्हणून सुरूवात केली. ते त्यांच्या निव्रुत्ती नंतर ही अजून तिथेच आहे. आज काल त्यांचा मुलगा वकिली बघतो. कधी तरी माझा सल्ला विचारतो. आता माझी चाळीशी आलीये. म्हणजे काही फार वय नाही. Life begins at 40 म्हणतात ते काय उगाच?

मराठी शब्दकोष

लेखक रम्या यांनी गुरुवार, 30/10/2008 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्लिश-इंग्लिश, इंग्लिश-मराठी, शब्दकोशाप्रमाणे मराठी-मराठी शब्दकोष बाजारात उपलब्ध आहेत का? असल्यास उत्तम शब्दकोश कोणता? जाणकारांनी माहीती द्यावी. धन्यवाद