प्रत्येक व्यक्ती सन्मानाला पात्र असते.
आज प्रो.देसाई खूप दिवसानी आपल्या नवीन मित्राबरोबर तळ्यावर आले होते.माझी ओळख करून दिल्यानंतर आम्ही नेहमी प्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा करायला सुरवात केली.त्यांचा हा माझा नव्याने ओळख झालेला मित्र आपली नोकरीत
असतानाचे काही अनुभव सांगण्याच्या ओघात एका मजेदार किस्याला त्यानी हात घातला.ते एका सॉफ्टवेअर कंपनीचे सि.इ.ओ होते ते ओघाओघाने मला कळलं.
ते म्हणाले,
"कामानिमीत्त मी एका शहरातून दुसर्या शहरात जाताना बरेच वेळा त्या कंपनीची गाडी येऊन मला त्यांच्या मिटींगच्या जागी घेऊन जायची.पण कधी कधी मला एअरपोर्टवरचीच टॅक्सी करून जावं लागायचं.असंच एकदा बंगलोर एअरपोर्टवर टॅक्सीत बसल्यावर ड्राईव्हर बरोबर हलो-ह
मिसळपाव